आम्ही चुकलो...


सकाळची वेळ......मानसी लवकर ऊठून  पोर्चमध्ये रांगोळी काढत होती. तोच तिची आई आवाज देते "काय ग मानसी तुला परीक्षेच काही गांभीर्य आहे की नाही? अभ्यास करायचा सोडून खूशाल रांगोळी काढत बसलेयस..."

"अग आई अभ्यास करणारच आहे ग पण तुला माहित आहे ना सकाळी दारासमोर रांगोळी काढल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही."

"दिवस सुरू होत नाही म्हणे....एवढीच हौस आहे तर ये इकडे जरा स्वयंपाक करू लाग. नाहीतरी अभ्यासात तरी कुठे ऊजेड पाडतेयस....."

शेवटच्या वाक्याने मानसी मनातून खजील होते व तिच्या रूममध्ये जायला निघते तोच......
तिचे बाबा "मानसी मला जरा चहा दे आणि मग बस दिवसभर नाराज होऊन, नाहीतरी तु दुसर काय करू शकतेस..."

यावर मानसी काहीच बोलत नाही आणि किचनमधून चहा आणयला जाते तर तिथे परत आईच्या जळजळीत कटाक्षाला सामोर जाव लागत.....

मानसी मान खाली घालून तिथून पाय काढते व बाबांना चहा देते तर बाबा "बसा आता अभ्यासाला."

मानसी "हो" म्हणून आत जाते....रूमचा दरवाजा पॅकबंद करते आणि डोळे मिटते. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. आई-बाबांच्या बोलण्याने ती दुखावली जाते.....डोळे पुसते आणि एक मोठा श्वास घेऊन अभ्यासाला बसते. मानसीला सवय झालेली या सर्वाची....आई-बाबा तिला नेहमीच घालूनपाडून बोलायचे. त्यांच म्हणन होत की मानसीच्या अंगात अजिबात हुशारी नाही, अंगात चपळपणा नाही...ती खुप घाळ आहे......अस नाही कि आई-बाबा तिच्यावर प्रेम करायचे नाहीत पण मानसीकडूनन त्यांच्या खुप अपेक्षा होत्या...पण त्यांच्या अशा बोलण्यानेच  मानसीचा  आत्मविश्वास कमी  झालेला असतो. तिला स्वतत: लाही अस वाटायला सुरूवात होते की  बाबा खरच आपल्याला काही येत नाही.
हे झाल अभ्याबाबत पण बाकी रांगोळी काढणे, चिञ काढणे, गाण म्हणने, विणकाम, भरतकाम, स्वयंपाक करणे या गोष्टींंत तिचा हात कोणीच धरू शकत नव्हत.....पण आई-बाबांना तिच्या अंगी असणार्‍या या गुणांच कौतुक वाटायच नाही. त्यांच्यामते अभ्यास करून पुढे जावून करिअर करण महत्त्वाच. त्यांना मानसी ही एकटीच मुलगी होती साहजिकच त्यांना अस वाटायच आपल्या मुलीने रॅंक मध्ये याव, डाॅक्टर, ईंजिनीअर व्हाव....

बघता-बघता मानसी कशीतरी तिच ग्रॅज्युशन पूर्ण करते....व घरचेही तिच लग्नाच पाहतात.  आय.टी. कंपनीत कामाला असणारा राघव नावाचा मुलगा मानसीला पसंंत करतो. मानसीचे आई-बाबा खुष होऊन  लगेच तिच लग्न लावून देतात. त्यांच्यामते राघवसारख्या हुशार मुलाने त्यांच्या मानसीला पसंत केल हे आपलच नशीब चांगल म्हणायच....खरतर राघवच स्वत: ला नशीबवान समजत होता त्याच्याशी एवढ्या सार्‍या कला असलेली मुलगी लग्न करणार होती....कारण मानसीला बघायला गेल्यावर त्याने घरातल्या विविध वस्तू पाहिल्या होत्या ज्या कि मानसीने स्वत: बनवल्या होत्या......राघवच  मत बरोबर ऊलट होत त्याच्या मते माणसाच्या अंगी कला असण महत्वाच आहे.....
लग्न होऊन मानसी सासरी जाते....आई-बाबा हळहळतात...कस होणार आपल्या भाबड्या मुलीच ही चिंता त्यांना असतेच....पण मानसीच नशीब म्हणून की काय तिचा नवरा राघव हा खुप चांगला होता. सालस आणि शांत अशा मानसीला तो खुप छान सांभाळून घेत असतो. प्रत्येक गोष्टीत मानसीच भरभरून कौतुक करत असतो. मानसी तु स्वयंपाक छान करतेस, आजचा नाश्ता मस्त झालाय, तु देवपूजा तर किती छान आणि प्रसन्न करतेस, घर तर किती टापटीप ठेवतेस......मानसीने स्वत:च अस कौतुक पहिंल्यांदाच अनुभवलेल....त्यामुळे मनातून खुप खूष असायची.....राघव तिला प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन द्यायचा....तसतसा मानसीचा हरवलेला आत्मविश्वास वाढत चाललेला.

"मानसी तुझ ड्राईंग खुप छान व रेखीव आहे तु ड्राईंग क्लास घे...त्यासाठी लागेल ती सर्व मदत मी करेन."

"अहो...पण मला जमेल का ते..."

"न जमायला काय झाल.......तु खुप हूशार आहेस आणि तुझी ड्राईंगही सडेतोड आहे. ऊद्यापासूनच सुरू करूयात क्लास...घरच्या घरी घे."

मानसीलाही मनातून काहीतरी करण्याची ऊमेद निर्माण होते..."हो चालेल बघूयात सुरू करून."

राघवच्या प्रोत्साहन देण्याच्या गुणामुळे त्याच फ्रेंडसर्कल खुप मोठ होत....तो स्वत: च्या परीने त्यांच्या ड्राईंग क्लासची अॅडवर्टाईज करतो...आणि रिस्पाॅन्सही छान मिळतो. बघता-बघता मानसीचा ड्राईंग क्लास फुल भरून जातो.......घरातील हाॅलमध्ये जागा पुरत नसते विद्यार्थ्यांसाठी....राघव त्याच्या एका नातेवाईकाचा हाॅल विकायचा असतो, तो घेतो....आणि त्याला एकदम प्रोफेशनल बनवतो.....आता हाॅलच उद्घाटन करण्यासाठी मानसीला सुचवतो व मानसीही होकार देते.....उद्घाटनाची तारीख ठरते. राघव मानसीला माहित न होताच तिच्या आई-बाबांनाही फोन करून बोलवतो उद्घाटनासाठी.....आई-बाबांना आपली मानसी क्लास वैगेरे घेऊ शकते यावर विश्वासच नाही बसत...पण जे होतय ते खुप सुखकारक असत त्यांच्यासाठी......
उद्घाटनाचा दिवस ऊजाडतो. सगळ्यात अगोदर मानसीचे आई-बाबा हजेरी लावतात. त्यांना पाहून मानसीला खुप आनंद होतो. ती आई-बाबांना मिठी मारते आणि तीचा ड्राईंग क्लासचा हाॅल दाखवत असते.....तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास, बोलण्यातील प्रोफेशनलपणा पाहून आई-बाबा भारावून जातात...नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात.....
"मानसी बेटा आम्हाला माफ कर...आम्ही तुझी कला कधी समजून घेऊ शकलो नाही....तुला पाठिंबा द्यायचा ठेवून आम्ही नेहमीच तुला बोल लावले....माफ कर आम्हाला" अस म्हणून आई-बाबा मानसीच्या डोक्यातून हात फिरवत असतात...

"आई-बाबा अस नकात म्हणून...तुम्ही माझ्या काळजीपोटीच अस बोलत होतात. कुठल्याही आई-वडिलांना वाटतच की आपल्या मुलीने  मुलाने खुप शिकाव, स्वतच्या पायावर ऊभ राहव....हूशारीने वागाव...ऊद्या मला मुल झाल्यावर मीही हीच अपेक्षा ठेवेन ना..."

तेव्हड्यात राघव तेथे येतो.."काय चालल्यात गप्पा?"

"काही नाही जावईबापू....आम्ही जे करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवला....मानसीला तिचा हरवलेला आत्मविश्वास मिळवून देण्यात मदत केलीत..."

"नाही हो आईबाबा ......मी काही केल नाही...तुमची मुलगी आहेच अगोदरपासून आॅलराऊंडर...." अस म्हणून मानसीचा हात हातात घेतो आणि आई-बाबांच्या हातात देतो....समाप्त.

प्रिय वाचकहो लाईक, कमेंन्ट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा....आणि हो माझ्या रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद.

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

All copyrights are reserved.Post a comment

0 Comments