तो आणि त्याची फिटनेस डाॅक्टर...

"बघ ना माझ पोट कमी झाल आहे." मनोज आरशात स्वत:च्या शरिराला न्याहळतच.
"होहो कमी काय पुर्णच पोट गेल आहे." जिभ दाखवत निशा.
बायको सकाळी-सकाळी गरिबाला टोमणे मारू नकोस. खरचं बघ थोड तरी कमी झाल्यासारख वाटत आहे. बघ ना टी-शर्ट पण लूझ बसतोय.

हा....हा...दोन दिवस तु चालायला काय गेलायस लगेच चरबी गायब? तेही ऊद्या तिसर्‍या दिवशी तरी तु जाशील की नाही गॅरंटी नाही. म्हणे पोट कमी झाल हुहहहहू........

बघच तु आता ऊद्यापण जातोच आहे. आजतर माहितयं दहा किलोमीटर चाललो आहे. किती घाम आलाय....मस्त मोकळ वाटतय...

अरे तुला प्रत्येकवेळी तेच सांगते मी पहिल्या-दुसर्‍याच दिवशी एकदम एवढं चालत जावू नकोस ना....राञी परत पाय दुखतायेत म्हणून बसतोस. सुरूवातीला रोज थोड-थोड चालायला हव. तु प्रत्येकवेळी असच करतोस मुड झाला व्यायम करायचा की दोन दिवस जायच नी त्यावर परत पुढच्या महिन्यात वा चार-पाच महिन्यांनीच परत तेच सुरू ....आत्ताही तु नवीन सुरूवात केली आहेस. मग एकदा का तु कंंन्टिन्यू चालायला जाशील तेव्हा हळूहळू वाढवत ने चालण्याच अंतर....

बायको यावेळी मी नक्कीच कंन्टिन्यू करणार आहे. तु बघशीलच एका महिन्यात दहा किलो वजन कमी करणार आहे...

बरं नवरोबा.....बघुयात तु ऊद्या वाॅकिंगला जातोयस का? त्यावरून ठरवूया...

येस.....पाहूयात ऊद्या....

मनोज आणि निशा दोघे नवरा-बायको. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. त्याचाच परिणाम कि काय मनोजची तब्येत खूप वाढलेली. वजन कमी व्हायच नावच घेईना.....ते कमी करण्यासाठी आणि निशाच्या आग्रहाखातर तो व्यायामाचे विविध प्लान आखत पण प्रत्यक्षात करायची वेळ आली की झालं प्लानचे बारा वाजणार! एक-दोन दिवस करायचा व्यायाम आणि तिसर्‍या दिवशी 'ये रे माझ्या मागल्या....' होऊन परत प्लान पाण्यात जाई.......

मनोज साॅफ्टवेअर कंपनीत जाॅब करी. त्यामुळे आॅफिसला जाईपर्यंत आवरण्यात वेळ जातो आणि आॅफिसहून घरी आल्यावरती कंटाळा येतो अशी कारण सांगूनही मनोज व्यायाम करण  टाळायचा...त्यावर निशाच त्याला एक सांगण असायच की जर तु व्यायाम करू शकत नसशील तर निदान खाणं तरी  प्रमाणात  आण...अस बोलताना निशाला वाईट वाटायच पण काय करणार पुढ  जावून ब्लडप्रेशर, डायबिटीस असे आजार मनोजला ऊद्भवू नयेत अस तिला वाटायच..कारण एकदा वेळ निघून  गेल्यावर नंतर त्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता....

..निशाला मनोजची खुप काळजी वाटे. त्यामुळे ती मनोजने व्यायाम करावा; यासाठी त्याच्या हात धुवून मागे लागी....मनोजही प्रयत्न करी पण त्याच्या आळसामुळे ते काही शक्य होत नव्हत......त्यामुळे या वाढलेल्या वजनावरून त्या दोघांच्यात सारखे वाद व्हायचे आणि अर्थातच जिंकायची ती निशाच....पण निशाला फक्त मनोजबरोबरच्या वादातच नाही तर मनोजच वाढलेल वजन कमी करण्यात जिंकायच होत....तिच्यासाठी तेच खुप मोठ आव्हान होत.....

काहीही झाल तरी मी मनोजच वाढलेल वजन त्याच्याकडून कमी करून घेणारच असा निश्चय करून निशा मनाशीच ठरवते की आपण मनोजशी भांडण करूयात म्हणजे त्याची सगळी कामे त्यालाच करावी लागतील निदान त्यामुळे तरी त्याची थोडीफार हालचाल करावी लागेल. मग प्लान बी आपण हा प्लान ए सक्सेस झाल्यावर ठरवूयात...

झालं व्यायामाचा तिसरा दिवस ऊजडलेला असतो माञ मनोज अजून झोपेतच...मग निशाला कारणच सापडत भांडायला. ती ऊगीचच झाले का तुझे नव्याचे दोन दिवस...तु काही वजन कमी करशील अस वाटत नाही म्हणून मनोजला खिजवते....तु कधीतरी पाॅझिटिव्ह बोल माझ्याबद्दल अस म्हणून मनोजदेखील चिडतो. दोघघांत भांडण होत आणि स्वत:स्वत:ची कामे करण्याच ठरत...निशाचा प्लान ए सक्सेस होतो.....

निशाचा वाढदिवस जवळ आलेला असतो पण दोघजण बोलत नसतात.....मनोज ठरवतो निशाच्या वाढदिवसाला आपण सरप्राईज देऊन  तिला बोलत करूया...तो दिवस ऊजाडतो. मनोज निशाला मस्त बर्थडे सरप्राईज देतो आणि तिला तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवय अस विचारतो. निशाला तेच हव होत कारण तिथंच तिचा प्लान बी होता....ती मनोजला म्हणते तु रोज वाॅकिंगला जायचस व मी तुझ्यासाठी डायट प्लान बनवला आहे तो फाॅलो करायचास ओके.....मनोज थोडा विचारात पडतो पण बर्थडे गिफ्ट द्यायला तर हव म्हणून निशाला प्राॅमिस करतो.

दुसर्‍या दिवशीपासून निशा मनोजला लवकर ऊठवते...बिचारा मनोज त्याला ऊठवत नसत पण निशा तोंंडावर पाणी मारून त्याला ऊठवते....झोपेची तंद्री गेल्यावर मनोजला त्याने निशाला केलल प्राॅमिस लक्षात येत....निशा लिंबू टाकून कोमट केलेल्या पाण्याचा ग्लास मनोजला प्यायला देते...निशाला हग करून बिचारा जातो वाॅकिंगला.....आल्यावर परत ग्रीन टी तयारच असतो त्याच्या स्वागताला.....नंतर एक अर्ध्या तासाने नाश्ता करणे...चपाती-भाजी, सॅलेड असा टिफीन बनवून देते आणि आॅफिसमध्ये चहा,काॅफी, स्नॅक्स टाळ अशी सक्त वाॅर्निंगच देते मनोजला...नुसती वाॅर्निंगच नाही तर मनोजला लंच टाईमला व संध्याकाळच्या स्नॅक टाईमला फोन करून आठवण करून देते, दिलेला टिफीन व्यवस्थित संपवायचा ते....तिने च्यवनप्राशची बाॅटलही दिलेली असते जी की आॅफिसमध्येच ठेव तुझ्या ड्राॅवरमध्ये आणि चार-पाचच्या दरम्यान भूक लागली खा अस सांगून दिली होती....राञी आल्यावर पण निशाचा स्वयंपाक तयार असतो, तिनेही स्वयंपाकाची वेळ बदलेली होती...कारण राञीचा डिनर सात ते आठ दरम्यान हवा.... झोपेच्या वेळेत व डिनरमध्ये दोन तास ग्याप हवाच....झोपण्याच्या अर्धा तास अगोदर दोन चमचे आवळा ज्यूस एक ग्लासभर पाण्यात मिक्स करून देते मनोजला...पचनासाठी चांगला असतो आवळाह ज्यूस प्लस अॅंटीएजिंग त्यामुळे निशा रोजच घेत होती....तस पाहिल तर मनोजमुळे निशाचही चांगल रूटिन बसल होत..

निशा जणू मनोजची  फिटनेस डाॅक्टरच झाली होती.....मनोजच्या सर्व गोष्टी वेळेत व्हाव्यात यासाठी ती खूप कष्ट घेत होती...बायकोला दिलेल व्यायाम करण्याच प्राॅमिस पूर्ण करण्यासाठी आणि त्यामागचा तिचा हेतू व कष्ट पाहून मनोजचाही वजन कमी करायचा ऊत्साह वाढला होता.....रोज नित्यनेमाने लवकर ऊठून राञी लवकर झोपेपर्यंत हा व्यवस्थित डायट आणि एक्सर्साइज निशा मनोजकडून फाॅलो करून घेत होती....त्यामुळे मनोजच्या तब्येतीत बराच फरक जाणवू लागला होता. तो स्वत: त्यालाही जाणवत होता....खुप मोकळ मोकळ वाटत होत त्याला. चालताना त्याला जो दम भरायचा तो आता भरत  नव्हता...

पाहता-पाहता एक महिना ऊलटून गेला होता...... दिवसेंनदिवस मनोजच वाॅकिंग डिस्टन्स वाढतच होत आणि पोट कमी होत चाललेल.....निशा मनातून खुप सुखावली होती..तिला तीच बर्थडे गिफ्ट मिळाल होत आणि मनोजच अति वाढलेल वजन कमी झाल होत....

मनोजच्या आॅफिसमधील सर्वजण मनोजच्या या अचानक मेंन्टेन झालेल्या तब्येतीच नवल करत होते...आणि मनोज तुझ्या फिटनेसच सिक्रेट आम्हालाही सांग म्हणायचे....तेव्हा मनोजला खुप भारी वाटायच आणि याच सगळ क्रेडिट बायकोला जात अस म्हणून निशाच कौतुक करायचा आणि म्हणायचा माझी बायकोच माझी फिटनेस डाॅक्टर आहे...!


प्रिय वाचकहो, माझ्या प्रत्येक लेखाला,कथेला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळत.... लाईक, कमेंन्ट, शेअर करून तुमचा प्रतिसाद असाच वाढो हीच सदिच्छा....धन्यवाद !

हो आणि माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला फाॅलो करायला विसरू नका बररं...

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

Post a comment

0 Comments