इकडे आलीस की हवा तेवढा आराम कर...आज घरात जरा वेगळच वातावरण झाल होत....थोडस तणावग्रस्त. मानसीच आणि तिच्या दीराच जरा खटकल होत. जास्त काही नाही क्षुल्लक कारण होत पण दोघांच्याही मनाला लागल होत. एरवी वहिनी व करणारा सौरभ आज जरा खट्टू होऊन बसला होता. इकडे मानसीला वाटत होत की हो बाबा चिडले असेल मी, पण मलाही वैताग आलाय या कामाचा.....मग मला थोडस समजून घेतल बिघडल कुठ?

खरतर भांडण झालेल मानसीच आणि तिच्या सासुबाईंच पण माझ्या आईला वहिनी का बोलली म्हणून सौरभला राग आला होता.....त्यावरून सौरभ व मानसीच खटकल.....आणि शेवटी फिरून या परास्थितीला कारणीभूत कोण असेल तर तो कोरोना....आणि त्यामुळे झालेल लाॅकडाऊन! नाहितर सौरभ तरी बंगलोरहून कशाला येतोय गावी....घरात मानसी, तिचा नवरा राघव, सासु, सासरे, दीर सौरभ आणि सगळ्यांना चेतना देणारी मानसी व राघवची छोटी पापडी ओवी.

ऐरवी मानसी आणि राघवही बाहेरगावीच होते नोकरीसाठी....सौरभही बंगलोरला आय.टी. कंपनीत. गावाकडे फक्त सासु-सासरे राहयचे.राघव व मानसीची चक्कर असायची गावाकडे अधुन-मधून....पण ती अशी कितीदिवस राघवच्या आॅफिसला सुट्टी असेल तेवढीच....फारतर चार दिवस....सणासुदीला म्हटल तर फक्त दिवाळी सात दिवस बस्स ! सौरभची वर्षातून फक्त दोन वेळा चक्कर असायची. तिकडे मिञ-मेञिणींमध्येच गुंग असायचा तो....आता या लाॅकडाऊनमध्ये पहिल्यांदाच एवढे दिवस गावी थांबला होता तो.

मानसीलाही एवढा स्वयंपाक करायची कधी सवय नव्हती. तशी वेळच आली नव्हती लग्न झाल्यापासून. पण या लाॅकडाऊनमुळे पुरती अडकली होती मानसी किचनमध्ये....नाही म्हणायला सासुबाईंची मदत असायची पण सगळ तीलाच पुढ होऊन कराव लागे....सासुबाईंना वयाच्या मानाने तितकस काम होत नव्हत.....असच मग कोणत्यातरी गोष्टीत दोघींच खटकल; तस कारणही क्षुल्लक होत थोडक्यात जनरेशन गॅप...त्यामुळे थोडफार मतभेद झाले....

पण सासु-सुनेच नात असच असत ना थोडस नमकीन ! दुसर्‍यादिवशी दोघी विसरल्याही भांडण पण सौरभ माञ अजून मानसीशी बोलत नव्हता....मानसीला या गोष्टीच वाईट वाटत होत की निदान वडीलधार्‍या नात्याने सासूबाईंनी तरी दीराला समजावून सांगाव की तु आमच्या मध्ये कशाला पडून अबोला धरतोयस....एकञ राहयच म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच त्यात काय एवढ...विसरून जायच असत सगळ. पण सासूबाईंनीही अस केल नाही....नवर्‍याला काही सांगाव तर तो बिचारा मध्येच बळीचा बकरा बनायचा म्हणून त्यालाही नाही सांगितल...आणि मानसीला अशी सवय नव्हती घरात अबोला पाहयची....तिला ऊगीच घरात परक असल्याच फिल होत होत....आणि अशा परकेपणात आठवण कोणाची येणार तर ती नक्कीच माहेरची......मानसी माहेरच्या आठवणीत गुंग झाली...कारण माहेरी कितीही भांडण झाली तरी परकेपणा कधीच जाणवत नाही....ती स्वतच्याच मनाशी,

"घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात,

माहेरी जा सुवासाची कर बरसात

......

आले भरूनी डोळे पुन्हा गळा नी दाटला

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला !"

अशी कविता म्हणतेय तोवर आईचा फोन येतो..."हॅलो आई बोल ना गं तुझीच आठवण काढलेली..."

मुलीच्या आवाजातील नाराजी आईने लगेच हेरली "काय ग मानसी तब्येत ठीक आहे ना?"

"आई तुम्हाला भेटायची खूप ईच्छा झालेय...ओवीपण सारख मामा, आजीकडे चल म्हणतेय"

"खरच ओवी की ओवीची मम्मा ? " अस म्हणून मानसीची आई जरा मानसीचा मूड ठीक करायचा प्रयत्न करते...

पण हसायच सोडून मानसीला रडूच येत...

"अग वेडाबाई रडायला काय झालय....कोरोनाच संकट गेल की भेटणारच आहोत की आपण"

"हो...." म्हणून मानसी आईला घरातली सगळी हकिकत सांगते....आईला मानसीच्या नाराजीच कारण समजत..

आई "अग मानसी....एवढ कशाला मनाला लावून घेतेयस...एकञ कुटूंब म्हटल्यावर चालत एवढतेवढ...तुझा दीर बाहेर राहतो, त्यामुळे त्याला घरातल्या बर्‍याच गोष्टींचा अनुभव नाही. ऊद्या त्याच लग्न झाल्यावर समजेल त्याला हळुहळू.....आणि एवढे दिवस छान निभावलस सगळ आता आणखी थोडे दिवस....तुच घरातल्यांना संभाळून घे आणि त्यांना कोरोनापासून दूर ठेव."

मानसी "बररं आईसाहेब ठीक आहे; घेते समजून सर्वांना....पण अग मला कंटाळा आलाय घरातल्या कामाचा...अस वाटतय आजारी पडतेय की काय..."

"या लाॅकडाऊनमुळे सगळ्या सासरवाशीन मुलींची हीच अवस्था आहे....थोडे दिवस आणखी थांबाव लागणार आहे....सगळी परिस्थिती नीट झाली की पहिला इकडे ये आणि हवा तेवढा आराम कर...."

आईच्या समजावण्यामुळे मानसीला खुप आधार वाटतो....व तीच्या एकाच 'इकडे आलीस की हवा तेवढा आराम कर' या वाक्याने मानसी खुप सुखावते....मानसीच्या मनात येत की आपली आईही करतेयच की लाॅकडाऊन मध्ये घरी काम...तरीही ती स्वतचा थकवा बाजूला ठेवून आपल्या आरामाची काळजी करतेय....कस असतय ना शेवटी माहेर ते माहेरच....असा विचार करतच मानसी किचनमध्ये जावून गाणी गुणगूणतच स्वतसाठी मस्त स्पेशल चहा ठेवते....व चहा घेतघेत खिडकीतून बाहेर बघत माहेरच्या आठवणीत रमून जाते.


प्रिय वाचकहो, कथा आवडल्यास नावासह शेअर करायला हरकत नाही.....तुमच्या प्रितिक्रिया नक्की कळवा....तुम्हीही मिस करत असाल ना तुमच माहेर? कमेंन्ट करून नक्की कळवा.....धन्यवाद

कथेच्या प्रकिशणाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव असतील....

©माधुरी दिपक पाटील(सांगली)
फोटो_साभार_गुगल

Post a comment

0 Comments