काळजी वाटते तुझी...


असा कसा रे तु? म्हणतच मानसी रागानेच बेडरूम मध्ये निघून जाते. राघव तिला समजावण्यासाठी तिच्या मागून जातो पण तो दारात पोहचणार तोवर मानसी जोरात दार लावून घेते.......राघव हताश होऊन हाॅलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो. हे नेहमीचच झालेल. राघवच दुसर्‍या लोकांची मदत करण आणि मदत करण्यामुळे मानसी कडे त्याच दुर्लक्ष होण आणि त्यामुळे मानसीच त्याच्यावर रागावण...

मानसी आणि राघवच लग्न होऊन चार वर्ष झाली होती. दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम. त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा होता. त्यांच्या लाडोबाच नाव यश. यशही त्याच्या मम्मी-पप्पांसारखाच हट्टी. तस पाहिला गेल तर राघव खूप जपायचा मानसी आणि यशला. साधी मानसी आजारी पडली तरी स्वयंपाक बंद, खानावळीचा डबा सांगायचा किंवा मग  हाॅटेलिंग.  आॅफिसला रजा टाकायचा. दिवस-राञ मानसीच्या ऊशाशी बसून राहयचा. यश किंवा मानसी आजारी पडली की त्याला चैनच नाही पडायची. मानसी तर रोज देवाचे मनापासून आभार मानायची की तिला एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय......

राघव एका साॅफ्टवेअर कंपनीत जाॅब करायचा. त्यामुळे पुण्यासारख्या सिटीत राहव लागत होत पण राघवला मुळातच गावाकडे-गावाच्या लोकांकडे राहयची आवड. माञ मानसी त्याऊलट तिला खेड्यापेक्षा शहरात राहयला आवडायच. तिच म्हणणं शहरात खूप काही करण्यासारख असत आणि एवढ शिकून, चांगला जाॅब असताना हे सर्व सोडून गावाकडे शेती तर करू शकत नाही ना. बर्‍याचदा या कारणावरून त्या दोघांचे खटके ऊडत. मानसीच म्हणन होत की ती दोघ होती तेव्हा गावाकडे सारख जाण्याला काहीच प्राॅब्लेम नव्हता. ती दोघ जायचीही सारखी राघवच्या आई-वडिलांसाठी. पण यश झाल्यापासून तिच मत जरा बदलेल,,त्याला कारणही तसच होत की सारख या गावाहून त्या गावी करण्याने, ईकडच-तिकडच वातावरण, पाणी बदलल्याने यश आजारी पडायचा. शहरातून गावी गेल्यावर हमखानस सर्दी होणारच आणि ती सर्दी जाईपर्यंंत  परत गावाहून शहराकडे गेले असता परत सर्दी, ताप......झाल त्यात  पंधरा दिवस जायचे. तोपर्यंत परत  सासु-सासरे गावी कधी येणार आहे,, आम्हाला करमत नाही, यशला पाहयच आहे अस म्हणून राघवला ईमोशनल ब्लॅकमेल करायचे. झाल अशी सर्दी जातेय नाही तोपर्यंत राघवचा फोन बॅग आवरून ठेव आपल्याला गावी जायच आहे.

झाल परत आवरा-आवरी परत सर्दी, परत सिटी नी परत व्हिलेज...जणू सर्कलच बनल होत. या सगळ्याप्रकारामुळे मानसी एवढी थकायची की बस्स. गावी गेल की तिथल काम आणि रिटर्न पुण्याला आल की तिथली आवराआवरी...अक्षरश: वैतागलेली.
राघव तिला सगळ्या गोष्टीत मदत करायचा पण मग दोघेपण थकले जायचेच ना. मानसीच एवढच म्हणन होत की राघवने स्वत:ची आणि त्याच्याबरोबर माझी व यशचीही धावपळ करू नये. यशला जरा कळायला लागल्यावर जाणारच आहोत की आपण. पण आत्ता सध्या त्याच्या तब्येतीसाठी तरी हे सारख-सारख जाण टाळूयात. राघवला वाटायच ही आत्ताच अस म्हणतेय मग थोड्यादिवसांनी तर काय सांभाळणार माझ्या आई-वडिलांना....दोघांत या कारणामुळे जरा वाद होतच. कधी-कधी मानसीला तिच्या सासु-सासर्‍यांचाही राग येई. कारण ते अनुभवी आहेत म्हटल्यावर निदान त्यांनी तरी राघवला सांगाव एवढी धावपळ कशाला करतोयस मानसीची नी यशची......पण कुठल काय ती दोघ एवढी आरदंड होती की मानसीच्या तोंडावर एक आणि राघव समोर एक अस वागायची, जेणेकरून राघव त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवेल आणि मानसीला ओरडेल....बरोबर हेच घडायच. मानसी आपली स्पष्टवक्ती तिला हे असल सहन व्हायच नाही. ती सांगायची राघवला सासु-सासरे मला कुरकूर करतात पण राघवचा विश्वास नाही बसायचा. या गोष्टीचा तर मानसीला खूप ञास होत होता...तिला काळजी वाटायची राघवची कारण स्वत:च्या स्वार्थापोटी त्याचे आई-वडील मानसी व यश तर राहिलेच पण राघवचाही विचार नाहीत करायचे. त्यांच एकच असायच आम्ही अडाणी असून तुला एवढ शिकवल, तुझ्यासाठी आम्ही खूप त्याग केला आहे....अस बोलल्यावर काय राघवचा नाईलाज होई...पण मानसीला आश्चर्य वाटे ते तिच्या सिसू-सासर्‍यांच कारण त्यांचा दुसरा मुलगा आणि सून यांना ते कधीच कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करत नव्हते. त्यांना म्हणायचे तुमच तुम्ही दोघ निवांत रहा बाकी आम्हाला काही नको.
मानसीचे दीर आणि जाव देखील असेच राघवच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. ती दोघपण  सरळ-सरळ घराची सगळी जबाबदारी मानसी व राघव वर टाकायचे. राघवला सर्व कळून तो दूर्लक्ष करायचा माञ त्याची मानसी कडून अपेक्षा असायची की तिने तरी साथ द्यावी. मानससीला मान्य होत की लाईफ पार्टनरकडून अपेक्षा करायला हवी.. पण तिला काळजी वाटायची ती सगळ्याबाजूने पिसल्या जाणार्‍या राघवची.

मानसीला खूप काळजी वाटायची राघवच्या सरळ आणि शुद्ध स्वभावाची. कारण आॅफिसमध्ये म्हणा किंवा फ्रेंडसर्कलमध्ये म्हणा कोणाला मदतीची  गरज पडली की मदत करायला राघव सगळ्यात पुढे......याचाच फायदा बरेचजण घ्यायची. आम्ही अडचणीत आहोत म्हणून राघवला कामाला लावायची आणि स्वत: निवांत करायची. मानसी खूप समजावून सांगे राघवला परंतु राघवच एकच मत होत, आपण आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत करायची; बाकी लोक कशी का असेना. त्यावर मानसी त्याला मला तुझी खूप काळजी वाटते रे राघव. तुझ्या या मदती मुळे कदाचित एक दिवस तु माझ्या आणि राघव पासून दूर तर जाणार नाहीस? तुला लोक फसवून कोणत्या संकटात तर अडकवणार नाहीत नाही ना? यावरही राघवच ऊत्तर तयार असे.  तो म्हणायचा देव वरून सर्व पाहत असतो, तोच माझ्याकडून सर्व करून घेतोय. मला काहीही नाही होणार आणि मी तुझ्या आणि  यशपासून लांबही नाही जाणार. पण किती काही केल तरी मानसीच्या मनात त्याच्या विषयची काळजी कायम राहयची......!

प्रिय वाचकहो तुम्ही माझे लेख वाचून मला प्रतिक्रिया कळवतात त्याबद्दल धन्यद. तुम्हालाही कधी मानसी सारखा अनुभव आला आहे का? तुमच्या कुटूंबात किंवा आजुबाजूलाही राघव सारखी निस्वार्थी व्यक्ती आहे का ज्याची तुम्हाला काळजी वाटते? कमेंन्ट करून नक्की कळवा.

©माधुरी सोनवलकर-पाटील

कथेच्या प्रकाशणाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असतील....धन्यवाद!

Post a comment

14 Comments