तिचा भुतकाळ...."मला लाज वाटतेय तुला माझी बायको म्हणायला" राघव रागाने.

"माझ जरा ऐकशील का अरे मी जाणूनबुजून नाही केल...." मानसी रडतच.

"काय ऐकू तुझ ? ऐकायला काही राहयलं आहे का आता...माझ आयुष्य खराब केलस...मला फसवलस..."

"अरे पण राघव मी तुला सगळ खर सांगणारच होते त्यादिवशी...मी प्रयत्नही केलेला पण माझ्या आणि तुझ्या घरच्यांनी वेळच नाही दिला....."

मला तुझ काही ऐकायच नाही म्हणून राघव घरातून बाहेर पडतो...मानसी स्वत:च्याच नशीबाला दोष देत रडत बसते....खुप एकटी पडली होती ती आज....

मानसी आणि राघवच लग्न होऊन दोन वर्ष झाल होत. त्यांना एक वर्षाचा मुलगाही असतो. खुप सुखाचा संसार चालू होता दोघांचाही.....राघव खुप काळजी घ्यायचा मानसीची.....राघवची तिच्या बद्दलची काळजी पाहूनच मानसीही त्याच्या प्रेमात पडली होती....पण अाज सगळच विखुरल गेल होत....मानसी कडे फक्त पश्चात्ताप ऊरला होता. भुतकाळात तीने एका मुलावर केलेल प्रेम तिला आज खुप सार्‍या यातना देत होत. एवढा फुललेला संसार असा विझताना तीला आतून मरणयातना होत होत्या....

राघवशी मानसीच लग्न हे तीच्या घरच्यांनी तिला केलेल्या ईमोशनल ब्लॅकमेलिंगमुळे झाल होत....खरतर तीला हे लग्न करायचच नव्हत पण आई-वडीलांमुळे केलेल....खुप मनापासून प्रेम केलेल तीने एका मुलावरती...तोही वेल सेटल होता...पण प्रोब्लेम होता फक्त कास्टचा...घरचे intercast लग्नाला तयार नव्हते कारण मानसीच्या पाठी अजून तीन बहिणी होत्या, त्यांच्या लग्नाला प्राॅब्लेम नको म्हणून घरच्यांनी मानसीला साफ नकार देऊन राघवच्या स्थळाला होकार दिला व लगेच लग्नही लावून दिल....राघवला पाहताचक्षणी मानसी पसंत पडली होती.....होतीच ती तशी निरागस, सालस, शांत व सुंदरही........!
लग्न ठरल पण मानसी आतून पूर्ण हलली होती. खूप प्रामाणिक होती ती, प्रेम एकावर व लग्न एकाबरोबर हे मान्य नव्हत तिला.....पण..पण....नशीबापुढे आणि घरच्यांसमोर तीच काही चालल नाही....तिने एकदा प्रयत्नही केलेला तिच्या पास्टविषयी राघवला सांगण्याचा पण तु हे लग्न नाहीस केल तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती वडीलांनी....त्यामुळे तीने तीच पुढच आयुष्य देवावर सोपवल व वेळच आपल्याला यातून बाहेर काढेल अशी मनाची समजूत घातली....
तिने लग्नाच्या आदल्या दिवशी या सगळ्या गोष्टी एका डायरीत लिहून काढलेल्या....व तीच डायरी आज राघवला मानसीच्या कपाटात मिळाली...आणि अनर्थ घडला....राघवच्या जागी कदाचित मी असते तरी मलाही असाच ञास झाला असता त्यामुळे राघव त्याच्या जागी योग्य आहे अस मानसीला वाटत होत....अस नाही की लग्नानंतरही मानसीला तिच्या पास्टविषयी सांगायचच होत पण केवळ हा आजचा दिवस पाहयला नको म्हणून ती गप्प होती...
राञी राघव घरी येतो....त्यालाही मानसी शिवाय करमत नसत पण तिचा रागही येत होता.....कारण लग्न झाल्यापासून त्यानेही मानसीच्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेम आणि काळजीच पाहिली होती.....पण तिचा भूतकाळ त्याला मनातून अस्वस्थ करत होता....तो मानसीशी न बोलताच मुलाला खेळवतो व त्याला फिरवून झोपवतो आणि स्वत: न जेवताच झोपतो....मानसीला तर तिच पूर्ण आयुष्यच हरवल्यासारख वाटत.....
दुसर्‍या दिवशी तो लवकर ऊठून मानसीला न सांगताच त्याच्या बहिणीला भेटायला जातो....कारण त्याच्या मनाचा कोंडमारा बहिणीकडे जावूनच मोकळा होणार होता......बहिण रमा त्याच शहरात राहत असते. तिचा नवरा नेमका काही कामानिम्मित बाहेरगावी गेला होता....राघवला घरी आलेल पाहून तिला खूप आनंद होतो पण दुसर्‍याक्षणी मानसीला का नाही आणल ? तुझे डोळे एवढे लाल का झाल्यात अस म्हणून ती विचारपूस करत असते तोपर्यंत राघव तिला रडतच जोरात मिठी मारतो आणि सर्व हकीकत सांगतो.
ईकडे मानसी ऊठते तर राघव घरात नसतो...त्याचा फोन ट्राय करते तर तोही बंद लागतो...ती खूप घाबरते, तिच्या मनात खुप विचार येतात....आणि रडूही येत....आपल्यामुळे राघव खूप दुखावला गेलाय...मला माफ कर राघव म्हणून तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात...ती शुन्य नजरेत जावून बसते आणि एकसारखा राघवचा फोन ट्राय करत असते....
रमा "राघव पहिला तू रडायच बंद कर....तुला सांगू तु खूप नशीबवान आहेस, मानसी सारखी प्रामाणिक बायको मिळाली तुला, तीला तुला सगळ सांगयच होत म्हणून तिने लिहून ठेवलेल पण केवळ तुझी अशी अवस्था तीला पाहयची नव्हती म्हणून तुने सांगीतल नाही तुला.....अरे तुला आठवत नाही का माझ्या लग्नाच्यावेळी असच काहीस घडलेल आपल्या घरी......तुम्हा सगळ्यांचा विरोध होता माझ्या प्रेमवाहाला, मी तुमच नव्हतेच ऐकणार पण या धक्क्याने पप्पांना अॅटॅक आला आणि नाईलाजाने मला तुझ्या जिजूंशी लग्न कराव लागल....पण खरच ते बर झाल कारण आज मी खूप खुष आहे......मला आठवतही नाही लग्नाअगोदर मी कोणा मुलावर प्रेम केल होत.....स्ञिया असतातच रे अशा....नवर्‍याच्या प्रेमात पूर्णपणे रमणार्‍या.....त्याला पूर्णपणे वाहून घेणार्‍या. ज्याच्याशी लग्न करतात त्यालाच आत्मबलिदान देतात....."

रमाच बोलण खरच पटत राघवला....त्याला हेही पटत की प्रेम करण हा नक्कीच गुन्हा नाही....फक्त त्यामध्ये  निर्मळता असावी आणि ती मानसी कडे होती. त्याच्या बहीणीबाबतीत असच घडल होत मग आपण तिला समजून घेतल तर मग मानसीला का नाही....तो डोळे पुसतो व रमाला थॅंन्क्यू ताई म्हणून निघतो....
तोच रमाला मानसीचा फोन येतो..रमा स्पिकर आॅन करते,,,,तिकडून मानसी रडतच "रमाताई अहो राघवचा फोन लागत नाहीये,,,घरातून केव्हाचा बाहेर पडलाय तो...अस मला न सांगता कधीच जात नाही...प्लीज तुम्ही काॅल करून वा तुम्हाला माहीत असेल अशा ठिकाणी कोठे गेला असेल तर काॅल करून विचारा प्लीज...." हुंदके देतच फोन ठेवते.
राघवला मानसीची आर्तता सहन होत नाही. तिला एवढ व्याकूळ होऊन कधी रडलेल त्याने पाहिल नव्हत...तो रमाचा निरोप घेऊन लगेच घरी जातो.....घरी जावून पाहतो तर मानसी सोफ्यावर डोक ठेवून झोपलेली असते. तिच्या अश्रूंनी सोफ्याचा कव्हर भिजला होता. राघव तिला ऊठवण्यासाठी हात लावतो तर तिच पूर्ण अंग गरम झाल होत. ताप आला होता तिला..तिची ही अवस्था पाहून राघवला स्व:चाच राग येतो.....तो तिला ऊठवून घट्ट मिठीत घेतो आणि साॅरी म्हणतो....व दोघेही एकमेकांचे अश्रु पुसतात....आणि कितीही संकट आली तरी एकमेकांना सोडून जायच नाही अशी शपथ घेतात.

कथेतून सांगायच म्हणजे, समोरची व्यक्ती भूतकाळातील चूका स्वीकारून दुसरा चान्स मागत असेल तर द्यायला काही हरकत नाही.....कारण आज मानसी वर वेळ आली होती, काल राघवच्या बहिणीवर आणि कदाचित ऊद्या मानसी व राघवलच्या मूलीवरही येऊ शकते...त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहताना पालकत्त्वाच्या नजरेने पाहिल्यास नक्कीच सकारात्मक निर्णय घेतले जातील......तुमचे अभिप्राय कळवा...नक्ककी फाॅलो करा....

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

Post a comment

0 Comments