"ते काय आपल्या हातात आहे होय...."

दुपारची वेळ....समीधा तिचा नवरा संदिप आणि त्याची बहिण म्हणजेच समीधाची नणंद कुसुम गप्पा मारत बसलेले......कुसुमताई अधुनमधून यायच्या माहेरी कारण त्यांच सासर अर्ध्या तासाच्या अंतरावर.....भावजी(कुसुमचा नवरा) सोडून जाई त्यांना.....

कुसुमताई आणि भाऊ संदिप यांच्या वयात तसा बराच फरक होता. संदिपला चार वर्षांची मुलगी होती तर कुसुमताईंची मुलगी निशाच लग्न होऊन नुकतच एक वर्ष झाल होत....
निशाच सांसर देखील जवळच होत. कुसुमताईंच सासर, माहेर आणि मुलगी निशाच सासर अशी तिन्ही गाव जवळ-जवळच होती. अर्ध्या तासाच्या अंतरावरती....बोलता-बोलताच निशाचा विषय निघाला...कस बर चालल आहे ना निशाच....सासरची माणस कशी आहेत, निशाला करमत का वैगेरे....कुसुमताईही सांगत होत्या लेकीच्या सासरविषयी...कारण निशाच लग्न होऊन जरी वर्ष झाल असल तरी संदिप आणि समीधा नोकरीनिम्मीत शहरात राहत होते...गावी आले तरी तेवढच....त्यामुळे लग्नानंतर निशाची आणि त्यांची प्रत्यक्षात अशी भेट झाली नव्हती.....

कुसुमताई माहेर जवळ असल्यामुळे ज्याप्रमाणे अधुनमधून वाटेल तेव्हा माहेरी येऊन जायच्या. त्याचप्रमाणे निशा देखील येऊन जात असेल; असा समीधाला वाटल म्हणून तिने सहजच विचारल "निशा काय पाहिजे तेव्हा येत असेल तुम्हाला भेटायला हो ना कुसुमताई?"
पण समीधा विचारतेय नाही तोवर "आता ते काय आपल्या हातात आहे होय...." अस म्हणून संदिप मोकळा झाला.

आणि कुसुमताईही त्याच्या हो ला हो करत  "हो बाबा लग्न झाल्यावर सासरच्यांनी म्हणल तसच रहाव लागतय. त्यांच्याच हातात जातय सगळ.."

समीधा तिघांसाठी चहा ठेवायला किचनमध्ये जाते.

माञ समीधाच्या मनात संदिपच वाक्य तसच घोळत राहत की 'आता ते काय आपल्या हातात आहे होय'...अरेच्चा इथ हातात असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच कुठे येतो. निशाच्या मनाचा काही विचार आहे की नाही....कुसुमताई किती सहजच म्हणून गेल्या की लग्न झाल्यावर आपल्या हातात काही नाही. आपल्या मुलीला सासरच्यांनी म्हटल माहेरी जा तरच जायच ते म्हटले आता नाही जायच नंतर जा, तर नाही जायच....

पण याऊलट माझ आहे मला हव तेव्हा संदिप सोडतो माहेरी आणि मी न्यायला ये म्हटल की येतो...मग हाच संदिप निशा बद्दल अस कस बोलू शकतो.....हेच कुसुमताईंनाही लागू होतय...त्याही हव तेव्हा येतात माहेरी......मग निशाच्या बाबतीत तिच्या सासरच्यांना काहीच का बोलत नाहीत?
निशा, संदिप आणि कुसुमताईंंना चहा देते......तिच्या चेहर्‍यावरच प्रश्नचिन्ह पाहून संदिप समिधाला विचारतो "काय ग कुठल्या विचारात आहेस?"

समिधा "काही नाही पण मी बोलले तर तुम्हाला वाईट तर नाही वाटणार म्हणून बोलू की नको असा विचार करतेय..."

"अग त्यात काय एवढ बोल..." संदिप

निशाच्या बाबतीत तुम्ही असा विचार का करत आहात, तिच्या बाबतचे सगळे निर्णय तिच्या सासरच्यांनीच का घ्यायचे....कुसुमताईंनी आणि भावजींनी(निशाचे वडील) का नाही ?
संदिप जरा विचारात पडतो, कारण हा प्रश्न त्याला अनपेक्षित होता.....मुलीच लग्न झाल्यावर हे असच असतय हे गृहित धरूनच तो बोलला होता...."अग मग काय ऊगीच आपण तिच्या सासरच्या गोष्टीत नाक कशाला खुपसायच....निशा आता त्यांची झालेय...मग तिच्याबद्दलचे सगळे निर्णय तेच घेणार...."
निशा कुसुमताईंकडे वळते "कुसुमताई तुम्ही निशाच्या आई ना मग तुम्हालाही वाटत असेल....तुम्हाला निशाची किंवा निशाला तुमची आठवण आली की भेटाव मग तुम्ही का नाही बोलत तिच्या सासरच्यांना....."
कुसुमताई "अग तुला नाही कळणार ते....तुझी मुलगी मोठी होऊन तिच लग्न झाल्यावर तुला सगळ्या प्रश्नांची ऊत्तर मिळतील....."
निशा "नंतर नको आहे मला....निशाही माझी भाची आहे...मला तिची काळजी वाटतेय त्यामुळे तिची ही सासरच्यांकडून होणारी घुसमट मला नाही बघवत..."
संदिप "हो मान्य आहे मलाही तुझ...पण समिधा अस डायरेक्ट नाही बोलता येत व्याहींना....आपली मुलीला आयुष्य काढायच आहे तिथं....ऊगीच आपल्या बोलण्याने व्याही दुखावले तर निशावर त्याचा राग निघायला नको..."
कुसुमताई "खुप नाजुक गोष्टी असतात...अस तडकाफडकी बोलता येत नाही. न जाणो त्यांनी त्याचा ञास आपल्या मुलीला द्यायला नको...."

समिधाला खरच खुप ञास होत होता या सर्व गोष्टींचा....कारण एवढा शिकला सवरलेला संदिप देखील आपल्या भाचीला परक्याच धन मानून, सासरची लोक जे म्हणतील तसच निशाला राहव लागूल अस मानून चाललेला....ऊद्या आपल्या मुलीच्या वेळीही संदिप असच मुग गिळून गप्प बसला तर.....

कुसुमताई "अग समिधा तु ऊगीच जास्त विचार नको करूस....हे वर्षानुवर्षे चालत आल आहे...यात मी देखील अपवाद नाही...हळूहळू होत सगळ नीट..."

समिधा "म्हणजे मला समजल नाही? हळूहळू म्हणजे कधी?"
कुसुमताई "माझ नवीन लग्न झालेल तेव्हा माझ्या सासरचे लोकही असेच होते....संदिपला विचार तो कितीवेळा न्यायला आलेला मला पण माझ्या सासरच्यांनी नाही पाठवला मला सासरी....संदिप भरल्या डोळ्याने माघारी आला आहे कितीतरीवेळा....पण आता बघ नवरा स्वत: मला हव तेव्हा सोडून जातो आणि परत मला पाहिजे तेव्हा न्यायला येतो."

समिधाच्या प्रश्नाच समाधान होईल अस ऊत्तर हव होत तिला......एव्हाना संध्याकाळचे पाच वाजतात. कुसुमताईंचे मिस्टर त्यांना न्यायला येतात व कुसुमताईही संदिप व समिधाचा निरोप घेतात आणि पोहचल्यावर कळवते म्हणून निघतात......

राञीची वेळ....संदिप मुलीला कडेवर फिरवून झोपवतो...पाहतो तर समिधा बाल्कनीत विचार करत बसलेली. संदिपला तिच्या  अशा विचारामागच कारण माहित होत.....तोही खुर्ची घेऊन तिच्याजवळ जावून बसतो. अग समिधा ऐकतर मग अस बर्‍याच मुलींच असत म्हणजे "आपल्या हातात आहे होय"....अस नांदायला गेलेल्या आपल्या मुलीविषयी बोलायला कुठल्याच आई-वडिलांना आवडत नाही......पण त्यामागे ज्याची-त्याची वेगळी कारण असतात...

ऊदाहरण सांगायच झाल तर तुझ्या माहेरची परिस्थिती चांगली आहे म्हणजे आपली जशी आहे तशीच वा थोडी जास्त त्यामुळे तुझ्या घरच्यांचा थोडा वचक बसतो माझ्यावर...आपोआपच मी तुला कोणत्याही प्रकारच बंंधन घालताना माझ्या मनात तुझ्या घरच्यांचाही विचार येतो. त्यामुळे तुझ माहेरी येणजाण तुझ्या मनावर असत...पण निशाच ऊलट आहे कुसुमताईची परिस्थिती मध्यमवर्गीय आणि निशाच्या सासरची श्रीमंत....अर्थातच विषयी कोणतेही निर्णय घेताना तिच्या नवर्‍याला वा सासरच्यांना निशाच्या माहेरच्यांचा विचारही केला जात नाही.....आज समिधाला काहीतरी वेगळच ज्ञान मिळाल होत...हे अप्रत्यक्षरित्या अस असत हे तिला पहिल्यांदाच समजत.....आता तिच्या हेही लक्षात येत की समिधाची आई हव तेव्हा तिच्या माहेरी जायची,, कधीकधी समिधाला तिच्या बाबांजवळ ठेवून पण बाबा काहीच बोलायचे नाहीत कारण समिधाच्या मामाने समिधाच्या बाबांना नोकरीला लावल होत.

समाजात असेही बरेच प्रकार असतात यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बरेचजण भरडले जातात...त्यातही स्ञियांना जास्तच सहन कराव लागत....मुलीच्या माहेरची परिस्थिती गरीब असल्या कारणाने लग्नानंतर कोणतेही निर्णय घेताना तिला माहेरचा आधार राहत नाही.....आणि आई-वडिल देखील आता आपल्या हातात काय आहे अस म्हणून बाजूला होतात. तर काही ठिकाणी मुलीच माहेर श्रीमंत असेल आणि सासरची परिस्थिती गरीब असेल तर काही मुलींचा (सगळ्याच म्हणत नाही) सासरी वचक असतो....तर बरोबरीच्या रिश्तेदारीत बर्‍यापैकी समझौता आढळून येतो......काही ठिकाणी श्रीमंत सासरकडचे मुलीच्या गरीब माहेरी आर्थिक मदत देवून त्यांना आपल मिंदे करतात जेणेकरून सुनेच्या माहेरच्या लोकांनी  मुलीच्या संसारात कसलाही हस्तक्षेप करू नये म्हणून....पण अशा गोष्टीमुळे मुलींचे हाल होतात...त्या मुलीवर चुकून काही संकट आलच तर केवळ आमच्या हातात आहे होय आता अस म्हणणार्‍या पालकांमुळे  तिला माघार घ्यावी लागते. सासर-माहेर दोन्ही लोकांची मन सांभाळताना लग्न झालेली मुलगी नाहक भरडली जाते. ज्या घरी तिला आयुष्य काढायच असत अस सासर, तिथही तिला ठाम असे निर्णय घेऊ दिले जात नाहीत आणि ज्या ठिकाणी तिने निम्म आयुष्य काढलेल असत त्याही ठिकाणी तीला परक करून टाकलेल असत.....याऊलट आई-वडिलांनी मुलीच्या चांगल्या निर्णयांना साथ दिली तर त्या मुलीवर होणारे अन्याय रोखले जातील. निदान आपल्या पाठीशी कोणीतरी ऊभा आहे; हे मानसिक सुख तरी तिला मिळेल.

प्रिय वाचकहो तुम्हालाही असेच काही अनुभव आले असणारच आहेत तर प्लीज कमेंन्ट करून नक्की कळवा आणि असेच विविधअंंगी लेख वाचण्यासाठी मला फाॅलो करा.....धन्यवाद.

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल
Post a comment

0 Comments