निदान त्या चार दिवसांत तरी तिला समजून घेऊया...सकाळची वेळ....मानसीची घरातील आवराआवरी चालू होती......पहिल्यांदा चहा-नाश्ता, नंतर राघव आणि यशचा टिफिन, देवपुजा, सासर्‍यांसाठी वेगळीच भाजी, सासुबाईंच्या पारायणासाठी प्रसाद.....ती पटपट आवरत असते खरी पण तीला खुप थकल्यासारख जाणवत होत...कंबर आणि पायाचे गोळे दुखत होते तिचे....

तोपर्यंत मानसीचा नवरा राघव "अग मानसी डबा पॅॅक केला की नाही....ऊशीर होतोय मला."

"हो आई....मलाही लवकर निघायच आहे..आज एक्र्स्टा लेर्क्चस आहेत स्कुलमध्ये...दे पटकन डबा आणि बाॅटल." यशची हाकही येते. मानसी आणि राघवचा मुलगा.

"हो आणतेय"....म्हणून मानसी दोघांचे डबे आणि बाॅटल घेऊन हाॅलमध्ये येते..... यश शुज घालत-घालत मम्मी बॅग मध्ये ठेव माझ्या अस म्हणतो तर राघव घराबाहेर पोहचून गाडी काढत असतो....मानसी पळत जावून त्याला डबा देते....त्यावर थॅंन्क्यू म्हणायच सोडून राघव तिच्याकडे असा काही कटाक्ष टाकतो कि मानसी आज त्याला बिनाडब्याचीच पाठवणार होती.....तरीही घराबाहेर पडणार्‍या माणसाला हसून बाय कराव या तिच्या सवयीने ती राघव आणि यशला हसत बाय करून लवकर या अस म्हणते.....

झाल परत घरात येते तर घरात अजून कपडे-भांडी करण बाकी होतच....ती कपडे मशीनला लावते...व भांडी धुवायला घेणार असते पण थोड पोटातही दुखू लागत....तिला कळत की पाळी आलेय...ती कॅलेंडर पाहते तो खरच एक महिना होऊन गेलेला असतो...ती मनाशीच म्हणत असते काय ही पाळी पण बरोबर महिन्याला येतेच येते....आणि सरळ बेडरूममध्ये जावून बेडवर अंग टाकते...कारण तिचे पाय आणि कंबर खुप दुखत असतात...सकाळपासून तीने कसतरी आवरलेल असत.....

रेखाताई (मानसीच्या सासूबाई)स्वत:च आवरून शेजारच्या मंदिरात पारायणासाठी जायला निघतात...प्रसादासाठी मानसीला आवाज देतात, तर मानसी काही ओ देत नाही....त्या किचनमध्ये जावून पाहतात तर भांडी घासायची तशीच पडली होती......घरात कोणाचा आवाजही नव्हता...रेखाताई मानसीच्या बेडरूममध्ये डोकावतात तर मानसी पोट धरून पाय पोटाशी आणून झोपलेली होती....रेखाताईंना समजत की मानसीला पाळी आलेय....कारण एरवी सगळ घर चकाचक करून बसणारी मानसी अशी किचनमध्ये पसारा ठेवून कधीच झोपत नाही....

त्या तिथून माघारी वळतात तोच त्याना सुरेशकाका आवाज देतात "अग मानसीला विचार माझी भाजी झालेय का? बसू का मी जेवायला बारा वाजून गेले....गोळ्या खायच्यात मला." मानसीचे सासरे..त्यांना बीपीचा ञास असल्यान त्यांच्यासाठी वेगळीच अळणी आणि कमी तिखट भाजी करावी लागे..

रेखाताई त्यांना खुणेनेच शांत बसा अस म्हणून त्यांच्या जवळ जातात....व त्यांना जेवायला बसा ताट आणते म्हणतात.....

सुरेशकाका मानसी कुठेय विचारतात.....तेव्हा रेखाताई त्यांना मानसीची तब्येत ठीक नाहीये, म्हणून ती झोपलेय अस सांगतात.

"तु पारायणाला गेली नाहीस अजून?"

"अहो निघालेले.....पण आता नाही जात...मानसीची तब्येत ठीक नाही व बहुतेक ती काही न खाताच...झोपलेय. हव तर ती ऊठल्यावर जाईन....नाहीतरी देव काही म्हणत नाही ऊशिर का झाला...वेळेवर यायच मंदिरात.." अस म्हणून दोघेही हसतात.

रेखाताई सुरेशकाकांना जेवायला वाढून किचनमध्ये जातात व भांडी घासायला घेतात.....

"अग झाल माझ जेवण....हे ताट ऊचल बघू." सुरेशकाका

"हो का....मग आणून ठेवा ईकडे किचनमध्ये....आणि हो जेवलेल्या टेबलही साफ करा......"

"काय हे....तुझ तु कर...मी चाललो पेपर वाचायला..."

"मोठे आले पेपर वाचणारे....मानसीची तब्येत बरी नाहिये ...ती बरी होईपर्यंत निदान पाच-सहा दिवस तरी आपली काम आपणच करायची..."

सुरेशकाकांना समजत मानसीच्या तब्येतीच कारण मग तेही स्वत:च काम करतात...व रेखाताईंना मानसीची काळजी घे म्हणून सांगतात...यावर रेखाताई "मानसीची काळजी सर्वांनी मिळून घ्यायची आहे....राघव आणि यश संध्याकाळ घरी आल्यावरती त्यांनाही बोलते...याविषयी.."

सुरेशकाका "बरर बाई...ठीक आहे." म्हणून हातात झाडू घेऊन घर झाडायला घेतात.

एव्हाना मानसीचा एक डुलका होतो आणि ती दचकून ऊठते...."अरे बापरे...अशी कशी झोपले मी...आईंचा शिरा...बाबांचे जूवण...किचनमधली भांडी...सगळ जागच्या जागी  पडलय...." अस म्हणतच ती किचनकडे वळणार तोवर तिला बाबा म्हणजेच सुरेशकाका घर झाडून कचरा सुपलीत भरताना दिसतात....किचनमध्ये पोहचते तर रेखाताई चहा बनवत असतात आणि भांडी घासून लख्ख झालेली असतात...

मानसी झोपेच्या तंद्रीतच "आई तुम्ही अजून गेला नाहीत?"

तिला मध्येच तोडत रेखाताई  "नाही गेले.....हे घे चहा...पहिला चहा घे आणि नंतर फ्रेश हो....मग आपण दोघी जेवण करूयात..."

"पण बाबा जेवले का?"

"हो वाढल मी त्यांना....भांडी, झाडू मारण पण झाल..."

मानसी डायनिंग टेबलवर बसून चहा घेते....आल घालून बनवलेला चहा मानसीला आवडतो माहीत होत सासुबाईंना.

"आई चहा छान झालेला...पण तुम्ही कशाला ञास करेन घेतला....माझ मी आवरल असत की.."

"नाही मानसी.....आम्हाला ञास होतो आणि तु रोज आमच्यासाठी ञास घेतेस त्याच काय? निदान तुझ्या या पाच-सहा दिवसात तरी आम्ही तुला मदत करायलाच हवी."

मानसी खुप सुखावते....खरच तिला मदतीची गरज असायची तिच्या पाळिच्या दिवसांत...."थॅंन्क्यू आई...मला समजून घेतल्याबद्दल..."

"चल हो फ्रेश....जेवन करूया....भूक लागलेय मला....आज काम केल ना मी" अस म्हणून दोघी खळखळून हसतात.

संध्याकाळी मानसी टेरेसवर गेल्यावर राघव व यशलाही रेखाताई नीट समजावून सांगतात सर्व...."राघव व यश आजपासून तुम्ही तुमची सर्व कामे करायची मग ते डबा, बाॅटल भरण असो वा अंघोळिला जाताना टाॅवेल नेण असो.......कपडे धुवायला टाकण असो वा ते ईस्ञी करण असो....हा आणि हे फक्त त्या चार-पाच दिवसातच नव्हे तर रोजच करायच आहे."

राघव, यश व सुरेशकाकाही हे सगळ मान्य करतात....कारण जर सुरेशकाका वयस्कर असून घरातील कामात मदत करत असतील....तर राघव नाही म्हणू शकत नाही...कारण खर्‍या अर्थाने संसार त्याचा चालू आहे....सुरेशकाकांनी त्यांचा प्रपंचा केलाय....आणि जर आपल्या आजोबांना व पप्पांना घरात काम करताना यश पाहत असेल...तर आपसुकच त्याच्या अंगी घरातील कामात मदत करण्याच बीज पेरल जाईल.....

एक स्ञीच स्ञीला समजून घेवू शकते....असच घरातल्या प्रत्येक स्ञीने पुढाकार घेऊन दुसर्‍या स्ञीला तीच्या पाळीच्या काळात वा एरवीही समजून घेतल तर कितीतरी प्रश्न सुटतील....महत्त्वाच म्हणजे पाळी हा ञास नसून ती देवाने दिलेली देणगी आहे....हे पटेल. मग ती स्ञी तुमची जाव, सुन, नणंद, भावजय कोणीही असो...तिला समजून घेऊया....

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद !

आणि हो माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबूक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा.

All copyrights are reserve.

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल


Post a comment

2 Comments

  1. Khup chaan watale wachun 🙂 ek strich dusrya stri LA samjawun gheu shakto👌

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर....धन्यवाद मॅॅम.

      Delete