स्वतला माफ करूया.....स्वतसाठी


                   का म्हणून मी ञास करून घेते स्वतला.  प्रत्येकवेळी मलाच का अपराधीपणाची भावना वाटते. माझी चूक नसतानाही मला अस का वाटत की माझचं चूकल का? मीच काही चूकीच वागले का? माझ्या अंतर्मनाला खुप वेळा मी हा प्रश्न विचारल्यावर आणि खूप अनुभवानंतर मला मिळालेल ऊत्तर म्हणजे मी स्वतवर दाखवलेला अविश्वास....

आज मी माझी स्वतचीच माफी मागतेय.....स्वतच्या मनाला कायम दुसर्‍याचा विचार करून दुखवल्याबद्दल. समोरचा मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या बोलून जातो आणि मी फक्त विचार करत राहते की जाऊदे ज्याच त्याच्यापाशी, आपण दुर्लक्ष करूयात.....पण दूर्लक्ष करता येत अस? ठिक आहे एकदा दुर्लक्ष करू शकतोय, दोनदा दूर्लक्ष करू शकतोय पण तिसर्‍यांदा नाही ना करू शकत.....आपल्यालाही भावना असतात. आपणही माणूसच आहे. आपलही मन दुखावल जात....आपण काही मशीन नाही...बर हे लोक कधीकधी तर विनाकारणच आपल्याला टार्गेट करतात आणि हव ते बोलतात. अशा लोकांच आपण काहीच करू शकत नाही यासाठी परत एकदा मी माझीच माफी मागतेय.

बरं मग आपण समोरच्याला प्रतित्तुर दिलच तर तो त्याची चुक असूनही ऊलट आपल्यालाच चूकीच ठरवतो. कारण एव्हाना त्यालाही सवय झालेली असते त्याने बोलण्याची आणि आपण ऐकण्याची....मग ती व्यक्ती या अट्टाहासाला पेटते की या व्यक्तीने मी केलेला अपमान सहन करायलाच हवा.आणि चुकून जर त्या व्यक्तीकडून आपला अपमान न होता आपल्या प्रतित्तुतरामुळे त्याचाच अपमान झाला तर ती व्यक्ती बिथरते....आपल्यावर चूकीचे आरोप लावते. आपणाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करते....पण कस आहे ना "each action has equal and opposite reaction" या नियमाप्रमाणे चूकीच्या सगळ्या गोष्टी ऊलटून त्याच्याकडेच येतात....तेव्हा माञ त्या व्यक्तीला तोंड दाखवायला देखील जागा राहत नाही....अशावेळी आपण त्या व्यक्तीची माफी मागावी की त्याचा सगळा गर्व हाणून पाडल्याबद्दल.


असच काहीस आहे; आपल्यावरती अती हक्क गाजवणार्‍या लोकांच.......कधीकधी बेस्ट फ्रेंड सुद्धा आपल्यावर एवढा हक्क दाखवते की आपल स्वातंञ्य हिरावल जात....तेव्हा ज्याच्यावर हा अतिरीक्त हक्क दाखवला जातोय त्याने या मैञीच्या तुटण्याची माफी मागावी आणि बिनधास्त या मैञीतून बाहेर पडाव....तसच काही नात्यांच्या बाबतीतही आहे; जो करतो  त्याच्याकडूनच लोक करून घेतात व त्यानेच केल पाहिजे अशी मनाची धारणा ठेवतात. एखादवेळी करणार्‍याने नकार दिलाच तर त्याला समजून न घेता त्याला दुषणं देतात. अशावेळी त्यांची माफी मागा आणि सरळ इथूनपुढे माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका अस म्हणा. त्यांनाही ञास नको आणि तुम्हालाहि नको.

शेवटी काय तर ज्या व्यक्ती स्वतला आपल मानतात त्या व्यक्ती आपल्याकडून चुका झाल्या तरी माफ करतात पण जे लोक आपल्याला कधी स्वतच मानतच नाहीत ते आपण कितीही चांगल केल तरी त्यात चूका काढतात.......!

कित्येकवेळा असही होत की आपण समोरच्याचा खुप आदर करत असतो पण काही कारणास्तव आपण रागाला जाऊन काहीतरी वेडवाकड बोलतो....तर त्यासाठी नक्कीच त्या समोरच्याची माफी मागायला हवी.....आणि समोरच्यानेही आपली माफी मागायला हवी का तर आपला आदर करणार्‍या व्यक्तीला आज आपण स्वतला बोलावयास भाग पाडल म्हणून.....लेख थोडासा खोल विषयावर आहे पण व्यवस्थित वा पुन्हा वाचाल तर समजून जाईल.

प्रिय वाचकहो, माझे असेच मनाचा ठाव घेणारे लेख/कथा वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद.

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

All copyrights are reserved.


Post a comment

0 Comments