तिच्यासाठी स्वातंञ्य म्हणजे....?

रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस...संध्याकाळची वेळ...माधवी आणि दिनेश मस्त काॅफी पीत गप्पा मारत बसलेले.....दोघही एकमेकांना टोमणे मारत  मधूनच एकमेकांच कौतुक करत होते....लग्न होऊन चार वर्ष झालेली......पण दृष्ट लागावी असाचं संसार चाललेला दोघांचा..कारण होत दोघांचा स्वभाव...एकमेकांवर असलेला विश्वास....आणि माधवी आणि दिनेशने एकमेकांना दिलेली मोकळीक अर्थातच स्वातंञ्य !

......पण स्वातंञ्य म्हणजे स्वैराचार नव्हे.....माझ्या मते  "स्वातंञ्य म्हणजे समोरच्या व्यक्तीच स्वातंञ्य अबाधित ठेवून,त्याला न दुखावता,त्या व्यक्तीचा आदर करणे, त्यावर हक्क गाजवणे, त्याच्यावर प्रेम करणे होय..."

कसं असताना आयुष्य एकदाच मिळतं....ते कस असं भरभरून जगता याव ! कोणी-कोणावर बंधनं लादू नयेत. तु हे करायचं नाही किंवा तू ते करायचं नाही हे ठरवणारे आपण कोण ? पण म्हणतात ना " धरल तर चावतंय आणि सोडल तर पळतंय " या एकाच गोष्टीच्या भीतीने शक्यतो आपल्या प्रिय व्यक्तीच स्वातंञ्य हिरावलं जात......ही झाली एक बाजू पण काही लोक स्व:तच्या  अहंकारापोटी दूसर्‍या व्यक्तीचं स्वातंञ्य हिरावतात , तर काहीजण स्वार्थापायी, तर काहीजण स्वत:चा कमीपणा लपवण्यासाठी...एक ना अनेक कारणे सापडतील आपल्याला........

म्हणूनच प्रत्येकाचा संसार सुखाचा व्हावा असं वैयक्तिक स्व:ला वाटत असेल तर अगोदर एकमेकांना थोडीशी स्पेस म्हणजेज मोकळीक द्यायला हवी ! 

             इथं अस बिलकूल नाही की फक्त पुरूषांनीच स्ञियांना स्वातंञ्य द्यावे तर स्ञियांनी देखील पुरूषांवर तेवढाच विश्वास दाखवायला हवा.....महत्वाच म्हणजे हे स्वातंञ्य तोपर्यंतच अबाधित राहील जोपर्यंत त्या दोन्हीही व्यक्ती आपल्याला मिळालेल्या स्वातंञ्याची जाण ठेवून एकमेकांचा विश्वास जपतील ! हे झाल वैयक्तीक.....पण जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा बोलण्याच आपल मत मांडण्याच स्वातंञ्य हव ना.....देशाचा प्रतिनीधी निवडताना मतदानाच स्वातंञ्य हवचं ना कदाचित म्हणूनच संविधानाने अगोदरच त्याची तरतूद केली असावी..आणि याच स्वातंञ्या मुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे !

माझ्या मते सर्व गोष्टींच स्वातंञ्य हवयं....खाण्याचं, हवे तसे कपडे घालण्याच,हव तेव्हा फिरायला जाण्याचं, लिहण्याच स्वातंञ्य - कोणाच्याही भावना न दुखवता...तशी list खूपच मोठी होईल......म्हणजे बघा काही जणींच्या सासरी nonveg खात नसतील पण हीला तर खूप आवडतयं ना तर तिच्या सासरच्या लोकांनी तिला nonveg बनवू द्याव आणि खाऊही द्याव , आमच्यातं चालत नाही.....अस व्हायला नको बरोबर ना ? एवढी short कपडे कशाला दूसरे dress नाहीत का तुला or साडीच घालायची लोकांची नजर चांगली नसते वैगेरे अशे कयास नको ! एव्हढ्या राञी घराबाहेर कशाला पडायच, आजकालची दूनिया केवढी खराब आहे.....अरे द्याना स्वसंरक्षाणाचे प्रशिक्षण !

शेवटी काय तर या सगळ्यात मला वैयक्तिक स्वतंञ्य खूप महत्वाच वाटतयं.......खरतरं स्वातंञ्य या शब्दातच किती ताकद आहे....भरभरून मोकळीकतेचा feel येतोय...त्यामुळेच कदाचीत या article मध्ये माझ्याकडून या शब्दाची वारंवार पुनरावृती झालेय........

तर प्रिय वाचकहो 'माझ्यासाठी स्वातंञ्य म्हणजे काय' हे मी तुम्हाला सांगीतल आहे....तुम्हीही like, share आणि comment करून तुमच्यासाठी नक्की स्वातंञ्य म्हणजे कस असाव याविषयी नक्की कळवा......आणि हो असेच लेख/कथा वाचण्यासाठी रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला फाॅलो करायला विसरू नकात...धन्यवाद!

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

Post a comment

2 Comments