गोड बातमीचा स्वीकार....


"Any country that accepts Abortion is not teaching its people to Love but to use Violence to get what they want"

मदर टेरेसा यांनी या ओळींतून मुल अबोर्ट करणे ही गोष्ट जगाच्या संस्कृतीची जडण-घडण होत असताना किती घातक आहे हे दाखवून दिल आहे. जर तुम्ही पोटातील बाळ जगात येण्याअगोदरच त्याचा संहार करत असाल तर मग जे अगोदरपासूनच जगात ह्यात आहेत अशांना एकमेकांनपासून किती धोका असू शकतो....हेच त्यांना यातून दाखवायच आहे...त्यामुळे मुल जन्माला येताना पालकांनी किती जबाबदार असायला हव, मुलांना सकारात्मक विचारानेच जन्म द्यायला हवा. चला तर मग पाहुया मानसी आणि राघव एक पालक म्हणून कशाप्रकारे आपल्या होणार्‍या मुलाप्रती कर्तव्य पार पाडतायेत....

"मानसी काय निर्णय घ्यायचा तुच ठरव. नंतर काही प्रोब्लेम नको आणि हो तु याबतीत जो काही निर्णय घेशील, त्यात मी तुझ्या बरोबर असेन" राघव ड्राईव्ह करत-करतच माधवीशी बोलत असतो.

मानसीचे डोळे पाण्याने भरलेले असतात आणि एक हात पोटावरती ठेवतच, "राघव मला हे बाळ हवय. आपल पहिलच पिल्लू आहे हे आणि माझा निर्णय हा आहे की हे पिल्लू मला पाहिजे."

राघव मानसीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि ठरल तर मग आपल बाळ लवकरच या जगात येणारय म्हणून तोही माधवीच्या पोटाला हात लावून हातानेच येणार्‍या-पोटातील बाळाच्या जणू अंगावरून हातच फिरवतोय अशा भावनेने मानसीच्या पोटावरून हात फिरवतो...!

मानसी आणि राहूलच लग्न होऊन तीनच महिने झालेले असतात...आणि आज अचानक सकाळपासून माधवीच्या ऊलट्या सुरू झालेल्या होत्या म्हणून राघव व मानसी हाॅस्पिटलमध्ये येतात तर तिथे चेकअप केल्यावर समजत  मानसी प्रेग्नेंट आहे....तस पाहिल तर त्या दोघांनाही हे अनपेक्षितच होत.....त्यामुळे दोघेही डाॅक्टरांशी सल्लामसलत करतात....डाॅक्टर दोन पर्याय देतात; गर्भ एक महिन्याचा झाला आहे. त्यामुळे तुम्ही अबोर्ट करू शकता किंवा गर्भ सुस्थितीत असल्याने तुम्ही त्याला जन्म देऊ शकतात....

खरतर मानसी आणि राघवने टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या-आल्याच एकमेकांना डोळ्यानेच अभिनंदन केल होत आणि थॅंन्क्यू देखील म्हटल होत......पण डाॅक्टरांच म्हणन ऐकून यावर थोडासा विचार करावा म्हणून दोघे पहिल्यांदा गणपती मंदिरात जातात व देवाचे आशीर्वाद घेतात.......पण न बोलताच गाडीत बसतात मग नन राहवून राघव मानसीला विचारतोच....कारण राघवला बाळ हव होत पण मानसीच मतही त्याच्यासाठी तेवढच महत्त्वाच होत....पण मानसीचीही तीच अवस्था असते, तीला बाळाला जीवदान द्यायच होत. त्यामुळे तीचा होकार कळतो तेव्हा राघवच्या आनंदाला पारावार राहत नाही...लगेच तो गाडी थांबवून स्वीट्स घेतो...राघवच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि तो करत असलेला बालीशपणा जणू मानसीला वेगळाच आनंद देऊन जातो....कारण त्याने स्वीट्स बरोबर मानसीला आवडणारी चिलीमिली आणि कॅडबरी देखील आणलेली असते तेही न सांगताच...

मानसी आणि राघवने सारासार विचार करून आनंदाने goodnews चा स्विकार केला होता. त्यात त्यांना  कोणी घरातील वयस्कर लोकांनी सल्ला दिला नव्हता वा कोणीही फोर्स केला नव्हता बाळासाठी...दोघेही साॅफ्टवेअर कंपनीत जाॅब करत होते. तरीही लग्नानंतर लगेच तीन महिन्यांत मानसी प्रेग्नेंट राहूनही राघव व मानसीने एका निष्पाप जीवाला या जगात आणण्याची तयारी दाखवली. abortion चा विचारही त्यांनी मनात डोकावू दिला नाही..... आणि मुलगा होवो वा मुलगी आम्ही तिच किंवा त्याच अगदी ऊत्साहाने स्वागत करणार आहोत जणू असा मनाशी ठाम निश्चय केला दोघांनी.....

प्रिय वाचकहो मला या कथेतून हेच सांगायच आहे कि मानसी आणि राघवप्रमाणे नवीन लग्न झालेल्या वा आपल्या करिअरच्या मागे धावणार्‍यांनी मुल जन्माला घालण्याबाबत सकारात्मक विचार करावा. कारण आजही अशी भरपूर कपल्स आहेत जे मुलांसाठी प्रयत्न करतायेत पण त्यांना दुख पदरी पडत आहे...तसेच IVF व IUF यांसारख्या महागड्या आणि सहनशील ट्रिटमेंटना सामोर जाव लागत आहे.....काहीजण असे पण असतात जे कि आम्हाला अजून खूप फिरायच आहे, व्यवस्थित सेटल व्हायच आहे म्हणून abortion करतात...पण एकच सांगावस वाटत आहे ऊगीच आपल्याला मिळालेल्या पालकत्वाला नाहक क्षणभंगूर सुखासाठी नाकारू नकात.....बाकी गोष्टी करण्यासाठी अख्ख आयुष्य आहे आपल्यासमोर....योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही....पालकत्व खरच खुप सुखदायी आणि खुप काही शिकवणार आहे.....समाप्त.

अशाच कथा/लेख वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद.

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

All rights are reserved.

Post a comment

0 Comments