खरचं ती नवर्‍याच्या पैशांवर जगतेय....भाग १


साधना आणि मानसी अगदी काॅलेजपासूनच्या मैञिणी. निशाही त्यांचीच मैञिण....पण साधना आणि मानसीच जरा जास्तच जमायच. पुढे काॅलेज संपल्यानंतर लग्नही झाली तीघींची.......आणि काय योगायोग म्हणायचा तिघींच सासरही एकाच शहरात....तस त्यात आश्चर्य करण्यासारख एवढ काही नव्हत कारण तिघेंचेही नवरे आय.टी. कंपनीत कामाला त्यामुळे तिघीही पुण्यातच आल्या....त्याचबरोबर लग्न झाल्यावरती काहीदिवसांनी साधना व निशा या दोघींनीही कंपनीत जाॅब जाॅईन केला.....घरी राहिली ती फक्त मानसी.


काॅलेज संपल्यावरही मानसी व साधना होत्या एकमेकिंच्या कान्ट्यॅक्ट मध्ये.....पण निशाचा आणि त्यादोघींपैकी एकीचाही काॅन्ट्यॅक्ट नव्हता.....पण एकाच सीटीत असल्याने आणि साधना व निशाचा नवरा एकाच कंपनीत काम करत असल्याने कंपनीच्या एका फंक्शन मध्ये त्यांची भेट झाली. दोघींनाही भारी वाटत अस अचानक एवढ्यावसांनी भेटल्यावर.

निशा "काय ग साधना कशी आहेस? कुठे राहतेस? जाॅब करतेस की घरीच असतेस?"

साधना "मी मजेत...तु बोल कशी आहेस? मी इथ जवळच  याच एरिआत राहते......पंधरा-वीस मिनीटे लागतात ईथून.....हो मी जाॅब करते."

"अरे वा....आपण जवळच राहतो मग....आणि पेमेंन्ट किती पडतं तुला? तुम्ही रेन्टने राहतात की स्वत:च्या फ्लॅटमध्ये?"

साधनाला हा प्रश्न जरा आॅडचं वाटला. एकतर किती दिवसानंतर पहिल्यांदाच भेटलोय आणि लगेज पेमेंन्ट किती? नी रेन्टच की स्वतच घर? वैगेरे....पण एवढ्यादिवसांनी भेटल्यामुळे आणि ऊगीच विषय वाढायला नको म्हणून साधना निशाच्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तर देते....

पुढे निशा मानसीबद्दल विचारते तेव्हा तिला समजत मानसी साधनाच्याच सोसायटीत राहते.....आणि जाॅबच विचारल असता तिला समजत मानसी जाॅब करत नाही. ती घरीच असते.....ती गोष्ट निशाला जरा खटकतेच....की एवढ शिकूनही मानसी घरी का बसलेय....ती लगेच साधनाला विचारते, "काय ग मानसी जाॅब का नाही करत? तिला बरा घरी दिवस जातो?"

यावर साधना विषय बदलते...कारण तिच्या मते हा काही काॅलेजकट्टा नाही की आपल घरही नाही, अशा गप्पा मारत बसायला.....आपण एका कार्पोरेट कंपनीच्या फंक्शनमध्ये आलोय, तेही नवर्‍याबरोबर......त्यामुळे साधना निशाच्या प्रश्नांची ऊत्तर देणे टाळते.....माञ त्या दोघींमध्ये एकमेकींच्या फोन नंबरची देवाण-घेवाण होते.....त्याचबरोबर निशा साधनाकडून मानसीचा नंबरदेखील मागून घेते....कारण साधनाला विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तर तिला आता मानसीकडूनच मिळवण्याची ऊत्सुकता होती......फंक्शन संपल्यावर जाताना निशा आणि साधनात परत नक्की भेटूयात तेही स्वतच्या घरी आणि मानसीलाही बोलवूयात अस ठरत.

त्यादिवशी राञीच निशा मानसीला मॅसेज करते, हाय कशी आहेस, मी निशा, साधनाकडून तुझा नंबर मिळाला वैगेरे....खरतरं निशाला पहिल्याच मॅसेजमध्ये विचारावस वाटत होत की तु जाॅब का नाही करत, काॅलेजमध्ये हुशार असणारी तु आज घरी का आहेस आणि मी बघ तुझ्याइवढी मार्क्स नसूनही आज जाॅब करून पैसे कमवतेय....पण निशाने स्वतला कंट्रोल केल लगेच अस विचारायला नको म्हणून.....मानसीने जाॅब करावा अस तिला बिलकुलच वाटत नव्हत ऊलट ती आज घरी कामं करतेय आणि मी मस्त जाॅब करतेय याचाच तिला आनंद होता.......
मानसीला खुप आनंद होतो की बाबा आपली मैञिण एवढ्या दिवसातून भेटलेय, निदान फोनवर तरी....साधनाला ती थॅंन्क्यू म्हणते. तिच्यामुळेच तर आता तिघी मैञिणी पुन्हा एकञ आल्या होत्या....

आता ठरलेलच होत जणू....तिघीही रोज एकमेकींना न चुकता मॅसेज, रिप्लाय करायच्या.....व्हाॅटसॅप वर तिघींचा एक सेप्रेट ग्रुपच होता.....पण हे सगळ होत असताना निशाला काही राहवत नव्हत....तिच्या मनातील बरेच प्रश्न अनुत्तरित होते. तिला हेच समजत नव्हत की मानसी जाॅब करत नसून, स्वावलंबी नसून, नवर्‍याच्या जीवावर जगून एवढी खुष कशी असू शकते.....निशाच्या मते जाॅब करणे, पैसे कमवणे म्हणजेच स्वावलंबी असणे...त्यामुळे ती आतून बैचेन होती....एकट्या साधनाशी बोलताना तिला खुपवेळा वाटे की तिला विचाराव, मानसी नवर्‍याच्या जीवावर जगतेय मग तीला काहीच कस वाटत नाही....पण ती गप्प बसे.

पण एकदिवस तिच्या मनातील गोष्टींचा जणू ऊद्रेकच होतो...ती डायरेक्ट मानसीला नाही पण साधनाला बोलते की मानसी तिच्या नवर्‍याच्या जिवावर जगतेय मग तु तिला कधी म्हटली नाहीस का की घरी का बसलेय, जाॅब का नाही करत? की तिच्या नवर्‍याला आवडत नाही तिने जाॅब केलेला, घरातून बाहेर गेलेल, बाहेरच्या लोकांशी बोललेल? यावर साधना तिला एकच सांगते की आपण तिच्या घरीच जाऊन तिला विचारूयात की ती का जगतेय नवर्‍याच्या जीवावर?

साधनाला बर्‍यापैकी निशाच्या बोलण्याचा रोख लक्षात आला होता....पण आपण सांगून निशाला विश्वास बसणार नाही किंवा तीच्या मनाच समाधानही होणार नाही, हेही साधना जाणून होती......आणि साधनाला हेही माहित झाल होत की भलेही निशा जाॅब करत असली तरी तिच्या पगारावर होमलोन केल आहे, त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पगार तर हफ्ते भरण्यातच जातो....साधनाला हे तिच्या नवर्‍याकडून माहीत झालेल कारण त्या दोघींचे नवरे एका कंपनीतच काम करत होते आणि मिञही होते....कदाचित ईथच पाणी मुरत असाव...
रविवारच्या दिवशी साधना मानसीला मी आणि निशा तुझ्या घरी भेटूयात का विचारते, कारण रविवारच्या दिवशी त्यांना सुटटी असते ना....मानसीला खुप आनंद होतो. ती दोघींनाही नक्की या म्हणून सांगते...चला तर मग पाहुया पुढच्या भागात की निशाच्या डोळ्यावरील पटटी बाजूला होतेय की खरच मानसी घरी राहून नवर्‍याच्या जीवावर जगतेय......नेहमीप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.....धन्यवाद!

कृपया कथा आवडल्यास नावासह शेअर करा....शेअर करताना लेखिकेच्या नावात वा लिखाणात बदल आढळल्यास काॅपिराईट कायद्याअंतर्गत गुन्हा ठरेल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी तसेच पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या https://www.facebook.com/hernewinning/"रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments