मला ती ऊमगली......!आज मुलाकडची पाहुणीमंडळी पाहायला येणार होती. नेहमीप्रमाणे समीधा टेन्शन मध्ये होती. मनोमन देवाला प्रार्थना करत होती की या मुलानेही मला नकार द्यावा. घरचे समीधाला गेल्या एक वर्षापासून स्थळ पाहत होती. समीधाच ईंजिनीअरिंग झाल होत. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत ती जाॅब करत होती. घरात मोठी होती मागे दोघी बहीणी आणि एक भाऊ होता. घरच्यांच मत होत की आता कामापुरत शिक्षण झाल आहे. जाॅबही करतेय पण वय होत चालल आहे, वेळीच लग्न झालेल बरं. पण समीधाला पुढे आणखी शिकायच होत. काही केल्या तीच शिक्षणाविषयीच प्रेम कमी होत नव्हत...पण तीच्या पाठोपाठ लग्नाला आलेल्या बहिणींना पाहून ती कसशीबशी कांदे-पोहे कार्यक्रमाला तयार झालेली.

  का कुणास ठाऊक पण समीधाला पाहयला येणारी स्थळ श्रीमंत असायची पण मुलं खूपच कंनजेस्टेड माईंडची असायची, मुलाच आणि तिच्या घरातल्यांच मत असायच की तिने जाॅब नाही करायचा. पण समीधाला हे अजिबात पटायच नाही. तीच म्हणन का नाही करायचा जाॅब? मी एवढ शिकून घरी का बसू? आणि अस पण घरातल काम आटपल्यावर नंतर घरात काय करायच? रोजरोज तेच करत बसू का मी? मी जाॅब करणार आणि मला पुढे आणखी स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करायचा आहे.

घरातल्या लोकांनी विशेषकरून तीच्या आईवडीलांनी तीला ईमोशनल ब्लॅकमेल करून लग्नासाठी तयार केल होत. नेमक आज तीला पहायला आलेल्या समीरने तीचा स्पष्तवक्तेपणा आणि तीची शिकण्याची जिद्द पाहून तीला पसंत केल. समीर गव्हर्मेंट जाॅब करणारा होता त्याला समीधाचे सर्व गुण पसंत होते पण  त्याचही असच मत होत की तीने घरीच राहव. त्याने तीच्या घरच्यांना तस कळवल व होकारही दिला. समीधाचे घरचेही खूप खुष झाले की आपल्या समीधाला एक गव्हर्मेंट जाॅबवाला आणि हुंडा न मागणारा जावई भेटला. त्याने आपली लाज राखली. शेवटी जे व्हायच होत तेच होणार होत; समीधाला जाॅब सोडून घरी बसाव लागणार होत.

लग्न ठरलं पण समीधाच्या मनात समीरविषयी कुठेतरी राग होता कारण तीच अस म्हणन होत की आपण संपूर्ण आयुष्य बरोबर घालवणार मग समीरला मला काय हवय? माझी काय ईच्छा आहे माहीत हव ना. त्याला माहीत आहे मला जाॅब करायचा आहे तरी तो नाही म्हणतोय....लग्नाअगोदरचे गुलाबी दिवस तर असेच गेले कारण समीरने फोन केलातरी समीधा जास्त बोलत नव्हती, जेव्हड्यास तेवढच.....आणि समीरलाही समीधा पुरेशी ऊमगली नव्हती. ती समीरच्या प्रश्नाला हो-ना एवढच वरवरची ऊत्तर देत होती. समीर समीधाच्या घरच्यांशीही फोनवर बोलायचा यावरून त्याला एवढा अंदाज तर आला होता की समीधा खूप ambitious आहे.
 समीरच्या मनात सारखे विचार चालू होते समीधाबद्दल,  "काय कराव बर... समीधाला जाॅब कर असही म्हणू शकत नाही कारण माझा जाॅब सरकारी म्हणजे दर तीन वर्षांनी बदली ठरलेली. त्यात समीधा मल्टिनॅशनल कंपनीत म्हणजे तिला जाॅब मेट्रो सिटीतच करावा लागणार....मग दोघांना वेगवेगळीकडे रहाव लागेल....अस केल तर मग दोघांच्यात दुरावा येणार....एकमेकांची साथ कशी लाभणार?? माझ्या घरच्यांच्याही अपेक्षा आहेत माझ्याकडून, होणार्‍या सुनेकडून मग त्याच काय? काही समजत नाहीये...समीधा खूप सुसंस्कारी आहे, मला मनापासून आवडतेय, बघताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलोय पण समीधाच काय? तीही आपल्यावर प्रेम करेल का की तिची स्वप्न पूर्ण करण्याचा हट्ट करेल? आपले आई-वडिल,भाऊ यांची काळजी घेईल का? आपल्या घरातले रीती-रिवाज पाळेल का? की तीच्या स्वप्नांमागे धावेल? समीधा घेशील का ग मला समजून? " लग्न होईपर्यंत समीरच्या मनात असे प्रश्न रोज येत असत.

लग्नाचा दिवस जवळ येत होता. मग आता लग्नाची खरेदी करायची होती. समीर समीधाला फोन करून विचारतो "तु लग्नात काय घालणार आहेस साडी की लेहंगा? मी काय घालू ब्लेजर की शेरवानी? तुला गळ्यातल  कस बनवू दे? अंगठीच्या डिझाईन पाठवल्या आहेत तुला त्यातली एक सिलेक्ट कर."

समीधा "मी काही ठरवल नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी लग्नात घालींंन आणि तुम्हाला जे घालायचय ते तुमच  तुम्ही  ठरवा." म्हणून ती फोन ठेवून पण देते. इकडे समीरचा मुड आॅफ होतो. समीर हातातला फोन टेबलवर ठेवून खुर्चीवर बसतो व मनाशीच "लग्नानंतर कस होणार आहे माझ काय माहित? ही समीधा  प्रेमाने तर नाहीच पण निदान फाॅरमॅलिटी म्हणून सुद्धा नीट बोलेना."

हा हा म्हणता लग्नाचा दिवस ऊजाडतो. लग्नाचा खर्च समीरकडेच होता. तस पाहीला गेल तर समीरच्या घरच्यांनी हुंडा घेतला नव्हता आणि लग्नाचा खर्चही तेच करणार होते,  तसेच समीधाला सासरकडचे समजूतदार मिळाल्यात आणि तीच लग्न होणार त्यामुळे पुढच्या मुलीच लग्नाच पाहू शकतोय या विचाराने घरचेही खूष होते.

लग्न होऊन समीधा समीरच्या घरी आली. प्रथेप्रमाणे गृहप्रवेश, सत्यनारायण पूजा पार पडली. समीर आणि समीधाचे प्रेमाचे-एकमेकांना समजून घ्यायचे दिवस होते....समीधाला सगळच नवीन होत. तशी ती घरातल्या सर्व मेंबरशी फोनवर बोलली होती पण प्रत्यक्षात बोलण्याची वेळ लग्नानंतरच...खूप अवघडल्यासारखी राहयची ती सासरी...त्यात साडी घालावी लागत होती. काॅलेजमध्ये, हाॅॅस्टेलला मस्त मोकळ-ढाकळ राहयची सवय होती तिला आणि आता लग्न झाल्यावर गळ्यात मंगळसुञ, पायात पैंजण, पायाच्या बोटात जोडवी, हाताच्या बोटात अंगठी, हातात बांगड्या घालाव लागत होत तिला...समीर तर तीचा हा शृंगार बघतच बसायचा. साडीच्या या पेहेरावात समीधा त्याला खुप सुंदर नी सालस-निरागस दिसायची. खूप काळजी घेत होता तिची.
समिधाला अंघोळीला पाणी देण्यापासून ते ती व्यवस्थित जेवली का? तीला काय आवडत इथपर्यंत समीर तिची काळजी करायचा...लग्नाअगोदर समीधाला समीर खूप खडूस वाटलेला का तर तो तिला जाॅब करू देणार नव्हता..,पण समीरची तिच्याविषयीची काळजी पाहून समिधाला खूप भारी वाटायच....जाॅब हे कारण सोडल तर समीर आपल्याला आणि आपल्या घरच्यांना किती जीव लावतोय अस तीला वाटायच...

समीधाने सासरच्या सर्व लोकांना त्या घरात प्रवेश केल्या दिवशीपासूनच आपल मानल. ती रोज सकाळी लवकर ऊठून देवपूजा, झाडलोट, गॅस शेगडी पुसणे, चहा ठेवणे, कणिक मळणे, नाश्ता करणे अशी सगळी काम सासूबाईंची वाट न बघता करून ठेवायची...समीरची आई आणि एकंदरीत घरातले सगळेच खूप मवाळ स्वभावाचे होते तेही समीधाला घरात कोणत्या गोष्टीचा ञास होणार नाही ना याची दक्षता घ्यायचे...त्यामुळेच की काय समीरला भिती वाटायची की समिधानेही घरातल्या सर्वांशी मनमिसळून राहव.....पण सुरूवातीला समीधा खूप शांत असायची सर्वांशी जेवड्यास तेवढच बोलायची कदाचित तिचा तो स्वभावच होता कारण लग्नाअगोदर ती कायम अभ्यासातच बुडलेली असायची, त्यामुळे जास्त बडबड करण तीला आवडायच नाही, याऊलट समीरला गप्पा मारायला, मनमिसळून राहयला खूप आवडायच...

...तो कित्येकदा त्याच्या आईला मनातल बोलून दाखवे की समीधा आपल्या घराला सांभाळून घेईल ना ग? त्यावर आई त्याला म्हणायची घेईल रे सांभाळून ती सगळ, खूप गुणीी आहे तशी ती, कधी ऊलट ऊत्तर देत नाही मला. थोडावेळ जावूदे ती तुला हळूहळू ऊमगेल...आणि तसच झाल.
 समीधा त्याच्या घरात एवढी मिसळून गेली की तिच्याशिवाय घरातल्या कोणाच पानच हालत नव्हत. तसतर समीरच तिच्याशिवाय सगळच अडायच पण तिच्यातल्या वेगळेपणाने घरातल्या सर्वांची जणू ती आईच झाली....कोणाला काय आवडत, काय नाही आवडत, कोण कुठे गेलय, घरी कधी येणार आहे ईथपासून ते कोण रूसलय, कोणाची समजूत कशी काढायची हे सगळ समीधाला माहीत असायच....जे की समीरच्या गावीही नसायच...घरातले समीरचे आई-वडील, दोघे भाऊ, नातेवाईक सगळ्या जणांच्या तोंडात समीधा रूळली होती....समीरच घरातला कर्ता मुलगा म्हणून असलेल स्वत:च्याच घरातल स्थान दुय्यम झाल होत पण यामुळे समीर खूप खुष होता. त्याला स्वत:च्या जाॅॅब, करियरबद्दल डेडीकेट असलेल्या समीधाचे वेगळे रूप पाहयला मिळत होते....लग्नाअगोदर त्याचे समीधाद्दलचे सगळे विचार, त्याला वाटणारी भिती केव्हाच संपून गेली होती. त्याला आता खर्‍या अर्थाने समीधा ऊमगली होती...!

फक्त घरातल्या लोकांचच नाहीतर समीधाने समीरच मनही जिंकल होत...समीरची आवड-निवड तीने माहीत करून घेतलेली. यु-ट्यूब वर पाहून त्याला नव-नवीन पदार्थ करून घालणे, त्याचे कपडे व्यवस्थित लावणे, त्याला कोणत्या गोष्टीचा राग येतो, कोणत्या गोष्टी करायला आवडतात हे सगळ तिने निरीक्षणातून जाणून घेतल.

समिधाविषयी चिंतेत असलेला समीर आता खूप खुष होता...कधीकधी तो मनाशीच विचार करत हसायचा, " आपण ऊगीच समीधाच्या करिअरला अडवतोय. समीधा करिअरच्या मागे धावून घर विसरणारी नाहीये. ती तर खूप हूशार आणि सुस्ंस्कारी आहे. तिला मी जाॅब सोडायला लावूनही तीने मनात कोणतीही तीढ न ठेवता माझ्याशी आणि घरच्यांशी एकरूप झाली....एवढ शिक्षण होऊनही कधी तिच्या वागण्यात आणि बोलण्यात तीने तस दाखवल नाही. की बाबा कधीही कुणाला ऊलट ऊत्तर दिल नाही. आजुबाजूच्या बायकांनी किंवा नातेवाईकांनी 'इतक शिकून काय फायदा घरीच आहे ना' असे टोमणे कधी मारले तरी ती दूर्लक्ष करते....मला पुढे शिकायचच आहे किंवा जाॅब करायचाच आहे असा हट्ट ती करू शकतेय ना, पण नाही तीने अस कधीच केल नाही...खुप सहनशक्ती आणी संयम आहे समिधाकडे....खरच आज मला ती ऊमगली...!"

समीरला समीधा पूर्णपणे ऊमगल्यावर तो तिला जाॅब करण्याची परमिशनही देतो पण समीधा समीरच्या प्रेमात एवढी रंगून गेलेली असते की ती स्वत:च मला जाॅब  नाही करायचा मला तुमचा पूर्णवेळ हवाय आणि हो पुढे जावून काही करावस वाटलच तर मी त्यावेळी सांगेन तुम्हाला अस सांगून टाकते...यामुळे समीरला त्याग आणि एकमेकांनबद्दनचा जिव्हाळा हे गुण असलेली समीधा आणखी नव्याने ऊमगते !

प्रिय वाचकहो, तुमच्या भरघोस प्रतिसादाामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळत आहे...अशाच छान-छान कथा वाचण्यासाठी वेबसाईटला नक्की कळवा...हो आणि लग्नानंतरच्या प्रेमाची समीर-समिधाची कथा कशी वाटली नक्की कळवा...तोपर्यंत मस्त वाचा, मस्त रहा...घरी रहा, सुरक्षित रहा.....!!!!

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 

  रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments