हो बोलते मी ठसक्यात....भाग २( अंतिम)

भाग १ इथे https://www.facebook.com/105625497707903/posts/170575034546282/?sfnsn=wiwspmo&extid=7gODXhgPuhj1TJ2J

मागच्या भागात आपण पाहिल, मानव कसा बोलतो दिपाला आणि मी फक्त ठसक्यात बोललेलंच दिसत ह्याला माझ त्याच्याविषयी असलेलं प्रेम नाही दिसत अस म्हणतच दिपा आपल्या मनाची झालेली अवस्था लिहायला घेते,

म्हणतो कसा...तु नेहमीच बोलते ठसक्यात

मी तुझ्याशी नेहमीच बोलतो प्रेमाने
हो बोलते मी ठसक्यात...

तेवढ बोलते म्हणून तरी तू तेवढा आहेस

नाहीतर वाटले असते माझ्या डोक्यावर मिरे

आणि बनलेही असते गरीब बिचारी..पण मग

मला बिचारीला सगळच सहन कराव लागल असत..
आणि काय झाल बोलले मी ठसक्यात तर....


तू येतोस आॅफिसवरून तर करतेच ना स्वागत हसून

बसतोसच ना तू निवांत आणि मी देतेच ना हातात  आयता पाण्याचा ग्लास मग चार शब्द गेले

तोंडून जास्त तर बिघडलं कुठ?
करतेच ना मी झोपेपर्यंत किचन मध्ये काम

तेही मुल सांभाळून, मूलाचे हट्ट पुरवून

तू काय जेवण करून बसतोसच की निवांत टी.व्ही.

मोबाईल बघत, फोनवर बोलत

मग म्हटल टी.व्ही चा आवाज कमी कर

तर कुठं बिघडल?

आणि एवढ निवांत बसूनही म्हणतोस राहूदे

तुझ काम, घे बाळाला, बघू दे मला टी.व्ही

आलाय मला फोन बोलू दे मला

मग येणारच ना मला राग..दिवसभर आपले बाबा

कामावर जातात मग थोड्यावेळ तुझ्याबर खेळाव

अस वाटतच की बाळाला, मग का पाठवतोस

बाळाला माझ्याकडे?

सकाळी ऊठलास की लागतो आॅफिसच्या तयारीला

बघतोस तासभर आरश्यात, दररोज इस्ञीचा ड्रेस

रोज नवा थाट,  इकडे कामाच्या गडबडीत मला

नसते उसंत श्वास घेण्याची तरीही म्हणतो जरा नीट

राहत जा, स्वत:च आवरत जा..कशी मी लक्ष देवू

स्वत:कडे ...अजून वाळत घालायचा राहिलेला

असतो तु अंग पुसलेला टाॅवेल !

मग बोलतेच मी यात माझी काय चूक?

जेव्हा करतोस बाकीच्या बायकांशी तुलना

ही बघ तिच्या नवर्‍याचा बिझनेस कशी सांभाळतेय

नि तिनं बघ कस मेंन्टेन केलय स्वत:ला....मग वाढतोच

की माझा ठसका...काढून दे तुपण मला काहितरी

बिझनेस सांभाळते मीपण आणि त्यात माझ्या दोन

डिलिव्हरी...हे सगळ तु सहन करून मुलांना जन्म

घातला असतात तर मीही राहिंले असते वेल मेंन्टेन.....
आणखी एक बाहेर जाॅब करणार्‍या बायकांच तुला

वाटत एवढ कौतुक तर का नाही मलाही जाॅब करू

देत? तेही माझ हाय प्रोफाईल शिक्षण होऊनही!

का तर बायको आपल्या हाताबाहेर जाईल,

आपल ऐकणार नाही, चार-चौघात कमीपणा येईल

अशा वाटणार्‍या पोकळ भितींमुळेच ना? मग यावर


विचारल मी स्पष्ट तर दिसतो तुला माझी ठसका....

देतोस नुसते ऊपदेश बाळासाठी अस कर आणि तस

कर, हे करू नको आणि ते करू नको

आणि ऊठत बाळ झोपेतून तर लगेच देतोस मला

आवाज.....मग तू जे मला पोकळ सल्ले देतोयस

ते तू करून दाखव म्हटल तर याला माझा ठसका

लागतो...

माझ्यासमोर माझे व्हाटसप, फेसबुक, काॅल लाॅग

चेक करतो आणि ह्याच सोशल नेटवर्क चुकून जरी

पाहिल तर बंद कर असले ऊद्योग, तुझा

प्रोब्लेम काय आहे? अस सुनावतो

बघा बर आहेत ना चोराच्या उलट्या बोंबा...!

मग मीपण दाखवतेच की माझा ठसका

करून टाकते तुझ्या मैञिणींना ब्लाॅक..

हो आणखी एक कधी-कधी  होतात अापली भांडण

तु बोलतोस नेहमीच टोकाच, खूप वाईट वाटत तेव्हा

पण नंतर तु मागतोस माफी मी रागाच्या भरात
बोलून गेलो पण वेड्या रागाच्या भरातच माणूस

खर आणि खूप दिवसांपासून साठवलेलं

बोलून जातो, मग काय जखम बरी होते माञ मनात

कायमचीच सल राहून जाते...

तु म्हणतोस मी कुठलीच जबाबदारी पार पाडत नाही

अरे मग घरात दिवसभर जी काम करणारी, सकाळी

तुझ्या अगोदर ऊठणारी आणि राञी तु आणि बाळ

झोपल्यावर झोपणारी कोण असते?

मग देतेच प्रतित्तर तेही ठसक्यातच की तु तर फक्त

आर्थिक जबाबदारी घेतोयस बाकी जबाबबदारीच

दुसर नाव तर मीच आहे...

शेवटही ठसक्यातच करेन कारण मला नाही आवडत

तोंडावर गोड आणि मागे कडू बोलायला..

नाही येत मला गोड बोलून समोरच्याचा फायदा

घ्यायला..नाही जमत तुझ्यासारख मनात नियोजन

आणि बाहेर प्रयोजन.....


नाही आवडत मला तुझ्यासारख घरात बायकोची

तोंडभरून स्तुती आणि बाहेर परस्ञीच नयनसूख..

दिसतोस मला घरात आणि बाहेरही तूच..

नाही जमत मला पोटात एक आणि ओठावर एक,

म्हणूनच बोलते मी ठसक्यात मग मिरची म्हणा नाहीतर आगाऊ म्हणा.....

तू सहजच म्हणतोस मी ठसक्यात बोलते पण माझ्या

ठसक्यातील सहजपणा ओळखला असतास तर

मला ठसक्यात बोलण्याची गरजच उरली नसती......!

मनातले विचार कागदावर लिहून दिपाच्या मनातील अस्वस्थता थोडीफार कमी होते....कारण तिचे हे विचार तिला दुसर्‍या कोणाशीही बोलून दाखवण्यात रस नसतो कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ !

तिला सवयही नसते की घरातले विषय बाहेर बोलून दाखवण्याची.

फारच ञास झाला तर ती तिच्या डायरीत सगळ लिहून ठेवायची...मुळातच ती स्पष्टवक्ती ! ज्याच्याकडून प्रोब्लेम असेल त्यालाच बोलणारी आणि ऊत्तर मागणारी...

मानव झोपतो म्हणून ती स्वत:च्या डायरीशीच बोलते...आणि झोपी जाते.

दुसर्‍या दिवशी सकाळी रविवार असतो अर्थातच मानवला सुट्टी असते. त्यामुळे दोघेही शक्यतो ऊशिराच ऊठत असतात पण कोणजाणे मानव त्यादिवशी लवकर ऊठतो. दिपा राञी ऊशीरा झोपल्यामुळे ऊठलेली नसते....मानव ऊठून ब्रश करून फ्रेश होतो. बेडरूम मध्ये जाऊन पाहतो तर दिपा आणि मुलगी सानू झोपलेल्याच होत्या. मानव तिथून जायला निघतो तोवर त्याच लक्ष दिपाच्या साईडला असलेल्या डायरीकडे जात....दिपाची डायरीत लिहण्याची सवय मानवलाही माहीती होती...

मानव स्वत:च्याच मनाशी "असतर मॅडमने डायरी जवळ घेतलेय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं आहे" म्हणून तो डायरी घेऊन बाहेर बाल्कनीत जातो वाचायला....राञीच्या भांडणाच तर त्याच्या काहीच लक्षात नसत. वाचायला घेतो आणि "हो बोलते मी ठसक्यात.." हे पहिलच वाक्य वाचून त्याला समजत दिपा राञीच्या प्रकाराने खूपच डिर्स्टब आहे. तो सगळ वाचतो खरा पण दिपाची एक-एक ओळ त्याच्या डोक्यात जाते. कारण त्यालाही जाणीव होते की यात काहीच चूक नाही, जे काही लिहलयं ते सर्व वास्तव आहे....त्यात परस्ञी आणि बाकीच्या बायकांनविषयी लिहलेलं असत ते वाचून तर तो थक्कच होतो. मानव स्वत:च्याच मनात खोलवर डोकवतो आणि त्याच मनच त्याला खातं. खरचं की आपण असच वागतो, जातेच की आपली नजर परस्ञीकडे, एखादी सुंदर स्ञी समोरून आली की आपण पाहतोच की आणि दिपा ?

ती कधीच करत नाही अशा गोष्टी.....ती ही माणूसच आहे मग तीच तिच्या मनावर एवढं कंट्रोल असेल, ती एवढी पतिव्रता आहे मग आपण का राहू नये? चला आजपासून कानाला खडा...पाहयच तर फक्त आपल्या बायकोकडेच!

दिपा बोलतेच की स्पष्ट.....का बोलू नये? एकतर ती कोणाच्या अध्यात नसते ना मध्यात, आपल काम भल नी आपण भलं.....मग दुसरं कोणी उगीच तिच्या वाटेला गेलं की ती बोलणारचं.....मानव स्वत:च स्वत:च्या बायकोच कौतुक करत बसलेला "आहेच माझी बायको अशी लाखों मे एक..!"

तेव्हड्यात दिपा मागून येते नी तिची डायरी मानवकडून हिसकावून घेते आणि नेहमीप्रमाणे ठसक्यातच "तू माझी डायरी कशाला घेतली आहेस?" म्हणून नाक मुरडते. दिपाने अस नाक मुरडलेलं आवडत असत मानवला. 

"आपकी यही अदा पे तो, हम फिदा है!" म्हणतच मानव स्वत:चे कान पकडतो.

मानव "दिपा मॅडम आजपासून जेवढ्या ठसक्यात बोलायच तेवढ बोला कारण आम्हाला माहित आहे तुम्ही जेव्हा-केव्हा अस बोलतात, तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं"

...दिपाही मग हसून "अब समजमें आया हमारी बातोंमे कितना वजन है!"

"हो राणी सरकार" म्हणत मानव आपले दोन्ही हात कोपरापासून जोडतो........आणि दिपाही आपला ठसका चूकीचा नसून योग्य त्या ठिकाणी, योग्य त्यावेळीच आपण दाखवतो या जाणिवेने खूष होते......
तर काय वाचकहो तुम्ही दाखवलाय का कधी तुमचा ठसका तुमच्या नवर्‍याला? आणि दाखवला असेल तर तुमचा अनुभव कमेंन्ट करून नक्की कळवा...तोपर्यंत stay tunned....!!!!!

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लिखाणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments