हो बोलते मी ठसक्यात....!

दिपा आणि मानव मध्ये बोलता-बोलताच वाद सुरू होतो. वरकरणी पाहता कारण फारच क्षुल्लक हो! कारण काय तर दिपा आणि मिनू आजारी होत्या. दोघीही सर्दी-तापाने जाम. वेळ राञीच्या दहाची म्हणजेच त्यांची झोपण्याची वेळ. आजारी असूनही दिपाने घरातल आवरल होत.

ती नुकतीच किचनमधून येऊन बेडवर बसली होती तोवर मानव "दिपा मला जरा ग्लासभरून पाणी आण." दिपा जरा रागातच जाते आणि पाणी घेऊन येते. 

तोपर्यंत मानव पुन्हा एकदा येता-येता हाॅलमधून माझा मोबाईलही आण. 

दिपा "आता मी पाणी आणून बसलेय, तुला अगोदर काय झालेलं रे सांगायला मोबाईल पण आणायला? मी नाही ऊठणार, तुला पाहिजे तर तुझ तू आण."

मानवला दिपाचा राग आला आणि तो दिपाला 

"तु माझ्याशी नेहमीच ठसक्यात बोलते. मी माञ पहिल्यापासूनच तुझ्याशी प्रेमाने बोलतो."

"हो का? तुला फक्त मी ठसक्यात बोललेच दिसत प्रेमाने बोललेलं आठवत नाही वाटतं?"

"कधी बोलतेस गं प्रेमाने? खूप खडूस, आगाऊ आहेस तु."

"हो आहे आगाऊ पण तेवढी आहे म्हणून तर तुम्ही जरा कंट्रोल मध्ये आहात नाहीतर माझ्या जागी कोणी दुसरी गरीब बिचारी असती तर ती बसली असती मनातल्या-मनात कुढत."

"म्हणजे गं? तुला नक्की काय म्हणायच आहे? माझीच चूक आहे आणि तु बरोबर आहेस."

"मी कुठ अस म्हटल मी बरोबरच असते आणि तुम्ही चूक पण मी आहे अशी आहे मग तुम्ही याला ठसका म्हणा वा खोकला मला नाही फरक पडत"

"ये गप बस बाई.. एकतर दिवसभर आॅफिसमध्ये कंटाळा येतो आणि आता तूझ्याशी वाद नाही घालायचा मला"

"सुरूवात तुम्ही केलेय मग मी शेवट करायला हवा ना?"

"तुझ्याशी बोलून काही ऊपयोगच नाही(म्हणून मानव दुसरीकडे तोंड करून झोपतो).

(दिपा मनाशीच)"अरेपण....बघा कसा पळ काढतोय. याला आॅफिसमध्ये कंटाळा येतोय म्हणे आणि मलापण येतोच की दिवसभर घरातल करून कंटाळा. "

दिपाही त्याच्याकडे पाठ करून झोपते. त्या दोघांच्या मध्ये त्यांची दोन वर्षाची मुलगी मिनू झोपलेली असते. दिपा पडते खरी बेडवर पण तिला काही केल्या झोप येत नाही. परत परत तिच्या कानात मानवचे शब्द वाजत असतात की ती त्याच्याशी ठसक्यात बोलते. तिला मनातून वाईट वाटायला लागत की बाबा खरचं आपण एवढ खडूस आहोत का, नवर्‍याशी एवढ ठसक्यात नको आहे बोलायला पण मग हा बोलतो ते चालतं वाटत. मी सगळ्या जबाबदार्‍या पार पाडूनही एखादा दिवस याच काम नाही केल की रागवतोय. बर मग याला कळायला हव आपली बायको आजारी आहे. त्यामुळे होत असेल तिची चिडचीड. मग याने समजून याायच तेे वरून मलाच बोलतोय.


काही केल्या झोप लागेना आणि ऊठून अस का बोललास मला म्हणून मानवशी भांडाव म्हटलं तर मानव झोपलेला आणि तेही घोरत..."इकडे मला बोलला म्हणून मला चैन पडेना आणि हा माञ निवांत घोरतोय." म्हणून दिपा जास्तच बैचेन होते. "आता काय बर करूया जेणेकरून माझ मन शांत होईल?" तीला एक कल्पना सुचते, ती म्हणजे मनात चाललेली घुसमट शब्दांत लिहून काढायची.  दिपा तिची नेहमीची डायरी आणि पेन घेते आणि आपल्या मनातील विचारांना मोकळी वाट करून देते.

.......क्रमश...

चला तर मग दिपा कशाप्रकारे आपलं मनमोकळ करतेय आणि त्याचा मानव वर काय परिणाम होतोय की होतच नाही पाहूया दुसर्‍या भागात.....

आणखी एक महत्वाचं म्हणजे वाचकहो तुमचा प्रतिसाद मिळतो त्यामुळे लिहायला प्रेरणा मिळते. अशाच तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला आणि माझे नवीन लेख वाचण्यासाठी मला फाॅलो करा....धन्यवाद !

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

Post a comment

0 Comments