टोमणे मारणे ही सुध्दा एक कलाच आहे हो....!


अस म्हणतात 'निंदकाचे घर असावे शेजारी' पण 'स्तुती करणार्‍याचे घर असावे शेजारी' अस कधीच का नाही म्हटल जात...या प्रश्नाच ऊत्तर आहे तुमच्याकडे? असेल तर प्लीज कमेंट करून मलाही सांगा....कारण स्तुती कोणाला नकोय....तरीही निंदकच कशाला हवा शेजारी या प्रश्नाच परफेक्ट ऊत्तर मला सापडत  नाहीये.

पण हे निंदक फक्त शेजारी राहणारेच नसतात तर ते काॅलेजमध्येही असतात हे मला ईंजिनिअरींंगच्या सेकंड ईअरला आल्यावर समजल....तोपर्यंत मला  taunting काय असत तेच माहीत नव्हत......थोडक्यात काय तर टोमणे मारणे....पण काॅलेज लेवल बोलला जाणारा शब्द म्हणजे taunt.....तसेच त्याची व्याख्याही थोडी वेगळी आहे.....जस की टोमणा कोणालाही मारता येतो तसा taunt हा मुलामूलींनपुरताच मर्यादित राहतो.....पण तुम्हाला सांगायची गंमत म्हणजे काॅलेजमध्ये taunt करणारी लोकच पुढे जाऊन निंदा करणारे शेजारी बनत असावे; म्हणजे माझातरी असा अंदाज आहे...कारण ते लोक याबाबतीत माहीर झालेले असावेत.....असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.....

हो ज्याचा त्याचा प्रश्न असेलही पण त्यांंच्या या हुल्लडपणामुळे जर समोरच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला ठेस पोहचत असेल तर........तर तो प्रश्न विनाकारण हस्तक्षेपाचा ठरतो....पण या गोष्टी त्यालाच कळतात; ज्याच्याकडे खरच सद्विवेकबुध्दी आहे.....मीच खुप शहाणा समजणार्‍या व्यक्तीला कस  समजणार हे.

"तुला अक्कल नाही का? एका मुलीशी कस बोलाव हे समजत नाही का तुला? हो आणि हे असल्या गोष्टी मी खपून घेणार नाही......म्हणून मी त्या मुलाला चांगल खडसावल....तो मुलगा घाबरलाही कारण प्रतित्तर देणारी मी पहिलीच मुलगी असावी....त्याच्या मिञांचा घोळकाही थोडाफार चरकलाच पण त्या मुलांना माझा राग आला असावा की हीने आमच्या मिञाचा अपमान केला म्हणून....पण मी म्हणते मी काय चूकीच केल....त्या जागी तुमची बहिण असती तर एकतर तुमच्या मिञाने taunt केल नसत......आणि केलं असतच तर तुम्ही त्याला सोडल नसत. मग माझ्या बाबतीत तुम्ही सगळे शांत का बसलात? का तर मी तुमची बहिण नव्हते म्हणून....तसही मला मुळातच कोणाची गरज नव्हती.....मी अगोदरच ऊलट प्रतित्तर करून त्या मुलाला त्याची जागा दाखवून दिली होती.....पण प्रश्न होता क्लासमधल्या बाकी मुलांनी माझ्यावर राग धरल्याचा......कदाचित त्या मुलांच्या आपल्या मिञाला पाठी घालण्याच्या चुकीमुळे डिग्री होईपर्यंत मी काही त्यांच्याशी मैञी करू शकले नाही. ''क्युंकी दोस्ती मे दिल साफ और इरादे नेक होने चाहीए"

म्हणतात ना एकदा डोक्यात निर्माण  झालेली तेढ मिटतेही पण मनात निर्माण झालेली तेढ मिटायला वेळ लागतो....तसच काहीस झाल तेव्हा.....पण ही मुल फक्त मलाच थोडी ना टाॅंन्ट करत होती तर क्लासमधील बर्‍यापैकी सर्वच मुलींना चिडवायचे.....माझ्या या मैञिणी चिडायच्या, त्यांना ञास व्हायचा यावर मुलींच्या ग्रुपमध्ये चर्चाही व्हायची.....पण पुढे होऊन बोलणार कोण? मला अगोदरच या गोष्टीची चीड मग मी पुढे होऊन बोललेही का तर मैञिणींसाठी आणि त्यांनी केलेल्या सपोर्टमुळे ......पण नंतर पुढे जाऊन माझ्या लक्षात आल की आपण ज्या मुलींसाठी लढलो त्या मुलीच परत टाॅंन्टिंग करणार्‍या मुलांशी जाऊन फ्रेंडशिप करतायेत.....खरतर त्यावेळी कीव यायची मला अशा लोकांची....पण मी विषय सोडून दिला; शेवटी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न होता तो....मग त्यानंतर मी फक्त स्वतसाठी खंबीर राहिले....कारण ही भरकटलेली मैञी तात्पुरती राहणार होती पण माझा स्वाभिमान कायम माझ्या बरोबर राहणार होता.....!

खर तर माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगायच झालच तर taunting करणे अथवा टोमणे मारणे ही सुद्धा एक कलाच आहे......ती सर्वांनाच जमत नाही. एकतर ती जमते बोलण्यात वाकबगार असणार्‍या किंवा अगदीच कुजक्या विचाराच्या लोकांना. बोलण्यात हुशार अससणारी लोक त्यांच्या या कलेचा ऊपयोग करून भाषेवर प्रभुत्व मिळवतात आणि समोरच्या माणसांच्या मनात घर करतात तर दुसर्‍यांविषयी असुया बाळगणारे लोक या कलेचा ऊपयोग करतात समोरच्याचा अपमान करण्यासाठी वा त्याला कमीपणा दाखवण्यासाठी......हे झाल एकूणच समाजमानस...पण काॅलेज मध्ये जे टाॅन्टिंग केल जात त्यात वेगळेच भाव असतात....एकतर तो तरूण वयाचा दोष असावा अथवा चारचौघांत स्वतचा शहाणपणा दाखवण्याचा.

एकंदरित माणसाच वय आणि अनुभव जसा वाढत जातो तस आपण का आणि कशासाठी असे टोमणे मारले वा यातून आपल्याला काहीच मिळाल नाही अस वाटून राहत.....कारण त्या taunting मुळे जो दुखावला गेला आहे तो विसरूनही जातो की आपल्याला कोणीतरी दुषण लावलेल पण टोमणे मारल्याच शल्य जास्त बोचत ते जो टोमणे मारतो त्यालाच....कारण आपण समोरच्याकडे एक बोट जरी दाखवलं असेल तरी चार बोटे आपल्याकडेच वळलेली असताप. न्युटन्स लाॅ 'every action as equal and opposite reaction' ......प्रमाणे शेवटी आपल्या कृत्याची फळ नकळत का होईना आपल्याला दुप्पट किंमत मोजून भरावी लागत असतात....त्यामुळे तोंडातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दाच भान आपल्याला हवच हव.....!

........धन्यवाद.........

कृपया लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकडे राखीव आहेत....त्यामुळे लिखाणात वा लेखिकेच्या नावात फेरफार केल्यास, साहित्यचोरी केल्याकारणाने काॅपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल. लेख शेअर करा पण नावासहितच.

नियमित वाचनासाठी E-mail टाकून subscribe करा.

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईवर gmail टाकून फाॅलो करा.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगलPost a comment

1 Comments

  1. धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल.

    ReplyDelete