एकुलत्या एक मुलाला वाचविण्यासाठीची धडपड...!!


रामरावांना अचानक कोणाचातरी फोन येतो, "मंदार तुमचाच मुलगा का?" रामराव चिंतेच्या सुरातच "हो बोला आमचाच मुलगा आहे." तिकडून "तुमच्या मुलाचा फार मोठा अपघात झाला आहे, हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल आहे"  हे ऐकताच त्यांच्या काळजात धस्स होते. ते गडबडीने ऊठतात व बायको लक्ष्मी बरोबर फोनवर सांगितलेल्या हाॅस्पिटलला पोहचतात....लक्ष्मीबाई तर पूर्ण गळून गेलेल्या असतात.

मंदार रामरावांचा एकुलता एक मुलगा.   घरची परिस्थिती हालाखीचीच. रामराव एका कंपनीत ट्रकवर ड्राईव्हर म्हणून नोकरी करत होते. लक्ष्मीबाई घरीच होत्या. थोडफार शिवणकाम करून घरातल्या खर्चाला हातभार लावायच्या. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती बेताची असली तरी रामरावांनी मंदारच्या शिक्षणासाठी हवा तेवढा खर्च केला होता. आपला मुलगा एवढा चांगला शिकून नोकरीला लागला म्हणजे झाल असच काहीस स्वप्न रंगवलेल रामराव आणि लक्ष्मिबाईंनी. पण त्यावर काळाने घाला घातला. मंदारने सिव्हिल ईंजिनिअरिंग पूर्ण केल आणि जाॅब शोधू लागला पण म्हणावा असा जाॅब मिळाला नाही त्याला. मग आपण थोड थांबून आपल्या पोर्टलसाठी ऊपयोगी कोर्स करूयात जेणेकरून ती ईंन्स्टिट्यूटच आपल्याला चांगल्या कंपनीत जाॅब मिळवून देईल असा विचार करून मंदारने कोर्स करायच ठरवल. त्यादिवशी नेहमिप्रमाणे असाच तो सकाळी लवकरच क्लासला निघालेला असताना नेमकी रोडवरून त्याची टू-व्हीलर स्लीप झाली आणी नेमक त्याचवेळी समोरून येणार्‍या ट्रकची त्याला धडक बसली....आणि त्याचा मोठा अपघात झाला.

रामराव आणि लक्ष्मीबाई हाॅस्पिटलमध्ये काॅटवर अॅडमीट असलेल्या मंदारला पाहतात आणि त्यांनी एवढावेळ दाबून ठेवलेल्या भावना डोळ्यातील आसवांवाटे बाहेर ओघळतात....मंदार तर अजूनही बेशूद्दच असतो. मंदारला प्रचंड प्रमाणात मुक्का मार बसलेला असतो. एक पाय आणि पाठीच हाड मोडलेल होत. डाॅक्टर रामरावांना सांगतात की लवकरच मंदारची पाठ आणि पायाच आॅपरेशन कराव लागेल आणि त्यासाठी चार लाख रूपये खर्च येईल. रामरावांना खूप टेन्शन येत, राञंदिवस ते एवढ्या पैशांची तजवीज कशी करावी याचा विचार करत असतात.

मागच्याच महिन्यात रामरावांना एक सौम्य अॅटॅक येऊन गेलेला असतो. त्याचवेळी त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे  सगळे पैसे संपून गेले होते....आता मंदारच्या आॅपरेशनसाठी पैसा कसा ऊभा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ऊभा होता. डाॅक्टरांनी त्यांना आठवड्याची मुदत दिली होती...लक्ष्मीबाईंच्या  डोळ्यातून तर पाणी थांबायच नाव घेत नव्हतं. किती केल तरी त्यांचा एकुलता एक मुलगा होता....

असच एकेदिवशी रामराव पैशांचा विचार करत-करत झोपी जातात....आणि मध्यराञी एकदमच "मंदार मंदार" करून ऊठून बसतात. त्यांच अंग घामाने पूर्ण डबबून गेल होत आणि हात पाय थरथर कापत असतात....लक्ष्मीबाईही त्यांच्या आवाजाने दचकून ऊठतात व रामरावांना काय झाल? वाईट स्वप्न पडल का विचारतात....म्हणतात ना माणूस जास्त विचार करत असेल वा टेंन्शन मध्ये असेल तर त्याला भरपूर स्वप्न पडतात तसच काहीस झालेल रामरावांच. एकीकडे काॅटवर पडलेला आपला एकुलता एक मुलगा आणि दुसरीकडे पैशांची तजवीज....त्यांना दुसर काहीच दिसत नव्हत.....लक्ष्मिबाई पुन्हा एकदा रामरावांना स्वप्नाविषयी विचारतात कारण याअगोदर कधी रामरावांची स्थिती अशी झाली नव्हती.

रामराव स्वप्नाविषयी सांगू लागतात, "अग माझ्या स्वप्नात एक मुलगा आलेला. आपल्या मंदारएवढाच होता. समोरून गाडीवरून येत होता आणि मी ट्रक चालवत असताना बरोबर ट्रकचे ब्रेक फेल होतात व त्या मुलाला माझ्याकडून ठोकल जात. त्या मुलाचा अपघात होतो ग मी चालवत असलेल्या ट्रकने....आणि मी व माझ्या बरोबरचा साथीदार पोलिसांच्या झंझटमध्ये पडायला नको म्हणून,  त्या मुलाला  जागेवरच सोडून तिथून पळ काढतो....तो मुलगा आंम्हाला मदत मागत होता आणि आम्ही त्याला मदत न करताच तिथून पळून जातो...मला खूप पश्चात्ताप होतोय या सगळ्याचा....मला माफ कर मुला, मला माफ कर, मी चुकलो" म्हणून रामराव मोठ्याने रडू लागतात...त्यावर लक्ष्मीबाई "अहो ते फक्त एक स्वप्नच होत ना मग सोडा ते. ऊगीचच नको तसले विचार करत आहात तुम्ही मंदारचा अपघात झाल्यापासून..."  रामराव "नाही लक्ष्मी नाही हे फक्त एक स्वप्न नाही, ही खरी घटना आहे. चार वर्षांपूर्वी माझ्याकडून घडलेली. त्यावेळी आपला मंदार पहिल्या वर्षाला होता. त्याची काॅलेजची फी भरायची होती. तेवढेच पैसे कसेबसे आपण जमा केलेले मग त्या अपघात झालेल्या मुलाला कुठून भरपाई द्यायची आणि पोलिस केस वैगेरे ते वेगळच म्हणून मी तिथून पळ काढलेला....पण आज मला त्या मुलाची आणि त्याला पाहून त्याच्या वडिलाची अवस्था काय झाली असेल ते आता कळतय....म्हणून रामराव परत रडू लागतात....आपल्या नवर्‍याला अस आगतिकतेने आणि पस्चातापाने रडलेल पाहून लक्ष्मीबाई "आता पश्चात्ताप करून काय ऊपयोग,  स्वत:च्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वार्थी होऊन खूप मोठी चूक झालेय तुमच्याकडून....पण त्याची शिक्षा तुमचा स्वत:चाच मुलगा भोगतोय. देव वरून सगळ बघत असतो." रामराव "हो लक्ष्मी मला मान्य आहे मी गुन्हेगार आहे, पापी आहे त्यावेळी मी स्वार्थी झालेलो. मला काहीही शिक्षा होऊदे, मला काहीही होऊदे पण माझा मंदार लवकर बरा होऊदे. देवा मला माफ कर !"  लक्ष्मीबाई "एकच पर्याय आहे आपण चार वर्षापूर्वी अपघात झालेल्या त्या मुलाच्या घरी जावून त्याची व त्याच्या वडिलांची माफी मागूयात...."

परत एकदा मुलाला वाचविण्यासाठीची एका बापाची धडपड जागी होते व रामराव त्या मुलाच्या घरी जातात. त्या मुलाचा पत्ता ते पोलिस स्टेशनमधून मिळवतात. कारण त्यादिवशीची तारीख रामरावांना लक्षात होती, मंदारचा वाढदिवस होता त्यादिवशी...रामराव व लक्ष्मिबाई त्या मुलाच्या घरच्यांची माफी मागतात. सुदैवाने तो मुलगा वाचलेला असतो. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या अपघाताच दुख अनुभवलेल असत त्यामुळे ते समजून घेतात व रामरावांना माफ करतात....आणि आमच्या सदिच्छा तुमच्या मुलाच्या पाठीशी आहेत अस सांगतात......"तुमचे हे ऊपकार आयुष्यभर मी विसरणार नाही" म्हणून रामराव त्यांचा निरोप घेतात.

माफी मागून रामराव व लक्ष्मीबाईंच्या डोक्यावरच निम्म ओझ कमी झाल होत. आता पुढ ठाकल होत मंदारच्या आॅपरेशनचा खर्च जमा करणे. ते दोघेजण थेट हाॅस्पिटलमध्ये पोहचतात. तिथ गेल्यावर त्यांना समजत मंदारला थोड्याचवेळात आॅपरेशनसाठी घेणार आहेत...रामराव डाॅक्टरांना "पण डाॅक्टर पैश्यांची व्यवस्थेच काय?" डाॅक्टर "मंदारचा एक मिञ येवून गेला राञी त्याने पैसे जमा केल्यात आॅपरेशनसाठी आणि आॅपरेशनला विलंब करून चालणार नाही. ईन्फेक्शन होऊ शकतय."

रामराव आणि लक्ष्मीबाईंना खूप आनंद होतो की आता आपला मंदार लवकरच बरा होणार आणि आश्चर्यही वाटत त्या पैसे भरणार्‍या मुलाच. ती दोघ मनोमन त्या मिञाचे आभार मानत असतात....रामरावांना कसल्याह परिस्थितीत त्या मदत करणार्‍या मुलाला भेटून त्याचे आभार कसले पायच धरायचे होते....विचारपूस केल्यानंतर त्यांना समजत की तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून आपण सकाळी ज्याची माफी मागायला गेलो होतो तोच होता.

रामराव व लक्ष्मीबाई मनापासून देवाचे आभार मानतात. आता रामरावांच्या मनावरच पूर्ण ओझ कमी झाल होत. रामराव पुन्हा एकदा त्या मुलाच्या घरी जावून त्याची माफी मागतात व तुच मला माझा मुलगा परत मिळवून दिलास म्हणून त्याचे खूप आभार मानतात.


शेवटी या कथेवरून एकच सांगायचय की, तुम्हाला कधी असा अनुभव आलाच तर कृपया अपघात झालेल्या व्यक्तीची मदत करा कारण पुढे जावून तुमच्यावरसुद्धा कधीही अशी वेळ येवू शकतेय......

प्रिय वाचकहो तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत...त्यामुळे लाईक, कमेंन्ट करून असाच प्रतिसाद देत रहा..तर चला तर मग आणखी असेच छान लेख/कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments