आजवर खूप केल सर्वांसाठी.....!"हो हे सगळ केवळ तुझ्यामुळ झाल आहे. तुच मला जाॅब सोडायला लावून घरी बसवलस. का तर तुझ्या भावांची लग्नं, आई-वडीलांची सेवा करण्यासाठी? मला तर कधी-कधी वाटत तु माझ्याशी लग्न केलस ते फक्त आणि फक्त तुझ्या घरच्यांची सेवा करण्यासाठी."
मानसी हुंदके देत देतच बोलत होती तिच्या नवर्‍याला राघवला....घरातले बाकीचे लोक म्हणजे तिचे दोन्ही दिर आणि सासु-सासरे देखील तिथेच होते....कारण हे सगळ घडत होत ते त्यांच्यामुळेच.

"अग पण मानसी ऐकून तरी घे माझ...." राघव मानसीची समजूत काढत होता...कारण त्यालाही माहित होत त्याच्या घरच्यांची चूक होती.

"बस्स झाल आता...मी निघालेय नागपूरला तुला यायच असेल तर चल....नाहीतर बस ईथच...बघुयात तुझे घरचे तुलझी किती घेतायेत."  राघव गव्हर्मेंन्ट जाॅब करत असल्याने त्याच पोस्टिंग नागपूरला होत. त्याला तिकडेच राहव लागत होत.....पण त्याने मानसीला आपल्या बरोबर नेल नव्हत. घरच्यांची मदत करण्यासाठी गावीच ठेवल होत.....व सुस्कांरी मानसीही सासु-सासर्‍यांना सांभाळणे अपल कर्तव्यच आहे या विचाराने गावीच राहिली होती.

मानसी आणि राघवच लग्न होऊन पाच वर्षे झाली होती. अर्थातच अरेंच मॅरेज होत...पण राघवने मानसीला फोटोतच पसंद केल होत.....मानसी एका जाॅईंट फॅमिलीत वाढलेली नि एम.बी.ए. झालेली होती. एका कंपनीत जाॅब करत होती....माञ लग्नानंतर तु जाॅब करायचा नाहीस या अटीवर राघवने लग्न ठरवून घेतल तिच्या आईवडिलांकडून....मानसीला जाॅब करायचा होता...तिच्य् घरची परिस्थिती हालाखीची होती....जाॅब करून घराला जरा हातभार लावायचा होता तिला. वडीलांनी एवढे कष्ट करून शिकवल होत...पण राघवला जाॅब नको होता...मग मानसीचे वडील जबरदस्तीने मानसीला लग्न करायला लावतात. कारण तिच्या आई-वडिलांना मानसीच लग्नाच वय झालय आणि वेळेत लग्न व्हायलाच हव ही काळजी होती.
कदाचित राघवलाही मानसीच्या घरची आर्थिक परिस्थिती माहित होती आणि हेही माहीत होत की मानसी जर तिच्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर जात नसेल तर मग त्याला खाञी होती की ती आपल्या शब्दाबाहेर जाणारच नाही. व हीच मुलगी आपल्या लहान भावांना व आईवडीलांंना सांभाळून घेईल.....

मानसी खुप दुखी असते जाॅब सोडावा लागल्याने.......पण आईवडीलांसाठी ती गप्प बसते. तसेच राघवच तिच्याबद्दलच प्रेम तिला यातुन बाहेर काढत...पण मग राघवच तिच्यावर एवढ प्रेम होत तर तिला जाॅब का करू दिला नाही? हा एक प्रश्न कायम मानसीच्या मनात होता.....लग्नानंतरही राघवला  तिने जाॅब करू देण्याविषयी बोलली ती पण राघव नेहमीच विषय टाळायचा म्हणजेच त्याचा साफ नकार होता.....पण जावूदे ऊगीच भांडणाला पाया नको म्हणून मानसीने परत जाॅबचा विषय काढलाच नाही....व जे होत ते चांगल्यासाठी म्हणून ती स्वतचीच समजूत काढायची आणि निस्वार्थीपणे घरच्यांची सेवा करायची.

पण आजच्या झालेल्या प्रकाराने मानसी दुखावली गेली......"आपण कामापुरत तिला गोड बोलायच. बाकी आपल्याला काय करायचय? तसही वहिनी आणि दादा एकदम सांसारिक आहेत. त्यामुळे काहीही झाल तरी ती दोघ  आपली काळजी घेणारच. ती एवढी मूर्ख असेल अस वाटल नव्हत. चांगला जाॅब सोडून कोण धुणीभांडी करेल का?"
मानसी विषयीची अशी चर्चा तिचा दिर आणि सासुसासरे करत होते.
सुरूवातीला हे सगळ ऐकून मानसी खुप दुखावते. तिला पश्चात्ताप होतो की ज्या लोकांसाठी तिने आजवर सगळ पणाला लावल. स्वत:च्या करिअरला मागे टाकल....एवढ शिक्षण घेऊनही कधी चार-चौघात ते बोलून देखील दाखवल नाही की कधी कौतुक केल नाही का तर तुम्हाला कमीपणा वाटू नये म्हणून....माझ्याकडे सगळ्या क्षमता असूनही कायम तुम्हाला स्वतवर हक्क गाजवू दिला.
प्रत्येक गोष्ट तुमचा विचार घेऊन केली पण नाही बस्स खरच बस्स झाल....

खरतर ही माझीच चूक आहे. मी वेळीच सगळ्यांना माझी किंमत दाखवून द्यायला हवी होती. आपणच आपली किंमत नाही केली मग लोक आपल्याला गृहित धरणारच ना....पण नाही मी आता स्वतला वेळ देणार आहे. घरच्यांनाही किंमत कळू दे माझी.....असा ठाम निश्चय करून मानसी बॅग भरून गाडीत जावून बसते.....
मानसीचा हा ञागा पाहून घरातील कोणाचीच काहीच बोलायची हिम्मत होत नाही.....कारण ती बोललेल सगळ खर होत.....राघवलाही आपल्या घरातल्यांसाठी आपण नेहमीच मानसीला त्याग करायला लावला या गोष्टीची जाणीव होते....पण घरच्यांनी मानसीचा व माझा गैरफायदा घेतला हे ऊमगल्याने राघवही मानसी पाठोपाठ गाडीत जावून बसतो आणि गाडी स्टार्ट करतो......आणि घरच्यांजवळ ऊरतो तो  फक्त पश्चाताप.

प्रिय वाचकहो, कथेतून सांगायच म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी खुप काही करत असेल, तेही स्वतच्या स्वप्नांचा त्याग करून तर त्या व्यक्तीला गृहित धरू नका.....त्याचा आदर करा नाहीतर तुमच्यावरती फक्त पश्चातापाची वेळ येईल......कारण खुप काळापासून मनात दबलेल्या भावनांचा केव्हाही अचानक ऊद्रेक होऊ शकतो.

प्रिय वाचकहो तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत...त्यामुळे लाईक, कमेंन्ट करून असाच प्रतिसाद देत रहा.. चला तर मग आणखी असेच छान लेख/कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments