हेही दिवस निघून जाणार आहेत...!

निशांत "शितल लवकर ये ग रामायण सुरू झालय"  शितल चा नवरा निशांत नुकताच झोपेतून ऊठून डायरेक्ट टी.व्ही. आॅन करून बसलेलला असतो.

"मला आवरायच आहे किचनमधलं तु बघ."

"ओय कामाची बायको, माहितय किती काम असत तुला. नंतर आवर अजून दिवस पडला आहे."

"कसला दिवस? काम एवढी पडतायत की दिवस गेलेला कळत नाही."

"बर मग मस्तपैकी एक कप चहा ठेव, आल वैगेरे टाकून. हो आणि आज नाश्त्याला काय बनवणार आहेस?"

"नुसत्या फर्माईश करतो दिवसभर. जरा बघ किचनमध्ये येऊन गॅसच्या शेगडीपुढे किती गरम होतय."

"काय म्हणालीस? ऐकू नाही आल"

"बर झाल नाही ऐकू आल ते. शिरा बनवला आहे, यशला(त्या दोघांचा मुलगा) खायचा होता आणि आईंना आणि बाबांना (तिचे सासू-सासरे) पण आवडतो."

"थोडेसे पोहे पण कर ना ग माझ्यासाठी...."

" अरे स्वयंपाक करतेय मी. अजून किती आवरायच बाकी आहे....दिवसभर मी किचनमध्येच बसू का?"

"काय गं....झाल का तुझ सुरू?"

यावर शितल काहीच बोलत नाही. काय करणार बोलून आपलेच दात आणि आपलेच ओठ....ऊगीच तणतण करून स्वत:च डोक दुखवून घेण्यापेक्षा ती गप्पच बसते.

निशांत एका आय.टी. कंपनीत जाॅब करत होता. त्याचे बाबा मुख्याध्यापक होते नी आता रिटायर झाले होते. त्यामुळे शितल तिचा नवरा निशांत, सासुबाई, सासरे, मुलगा यश लाॅकडाऊनमुळे सर्वजण घरीच असतात....त्यात कामवाल्या मावशींचीही मदत नव्हती...त्यामुळे शितलवर कामाचा ताण येई. सासूबाईंची तिला मदत असे कारण सासुबाईं हाऊसवाईफच होत्या; त्यांना जाण होती की घरात किती कामं असतात याची....
शितल व निशांत मध्ये चाललेल सगळ संभाषण सासूबाई ऐकत होत्या त्यांच्या बेडरूम मधून....त्यांना ते ऐकायला जातचं होत कारण शितल किचनमधून आणि निशांत हाॅलमधून बोलत होता.

सासूबाईंना माहीत होत 'घरात कितीही कामं केली तरी केलेल काम दिसतही नाही आणि संपतही नाही.' कारण आज जे निशांत बोलतोय तेच बर्‍याचवेळा त्याचे बाबा म्हणजे सासरे कितीतरी वेळा सासूबाईंना बोलत असायचे....सासूबाई तेव्हा गप्प बसल्या पण त्यांनी ठरवल की आपल्या सुनबाईंचेही  कामाने हाल व्हायला नको आहेत...तिच्या कामाची किंमत घरातल्यांना कळायला हवी.....

निशांतला बोलण्याच्याच हेतूने सासूबाई हाॅलमध्ये येतात.

"काय रे निशांत एकतर तू ऊशीरा ऊठलायस आणि वरून शितललाच म्हणतोयस झाल का तुझ सुरू...."

सासूबाईंच्या आवाजाने सासरे,यश आणि शितल देखील हाॅलमध्ये येतात.

सासूबाई "ती दिवसभर राबतेय बाहेर जाता येत नाहीए, बाहेरच काही खाता येत नाहीए, घरात तेच-तेच खाऊन बोअर होऊ नये म्हणून तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून घालण्यासाठी जीवाचा आटा-पिटा करतेय आणि तू तिला मदत तर सोड वरून बोल लावतोयस."

निशांत "अग आई मी कुठ बोल लावले फक्त म्हटल अख्खा दिवस पडलाय कामासाठी, एवढी काय काम असतात...."

सासूबाई "तुला आठवतय निशांत तु लहान असताना; तुझे पप्पा देखील मला असच म्हणायचे घरीच तर असते, काय काम असत एवढ तुला? तेव्हा तुला किती वाईट वाटायच आणि थोडाफार रागही यायचा बाबांचा...कारण तु पाहत होतास दिवसभर तुझी आई किती आणि काय-काय करायची ते. फरक एवढाच आहे की आज तु बाबांच्या जागेवर आहेस आणि यश तुझ्या जागेवर. मग तुच विचार कर यशने तुझ्याबद्दल कसा विचार करावा...आणि शितलच्या मनावर किती परिणाम होत असेल याचा."

एवढ बोलून सासूबाई सासर्‍यांकडेदेखील एक कटाक्ष टाकतात. बिचारे सासरे त्यांची नजर चुकवतात. ईकडे शितल मनातून सुखावते कारण सासुबाई तिला सपोर्ट करत होत्या.

निशांत नम्रपणेच "हो आईसाहेब चूकल आमच, माफ करा आम्हाला." म्हणून हात जोडतो.

सासूबाई "फक्त माफी मागून चालणार नाही....आजपासून प्रत्येकाने कामं वाटून घ्यायची....कारण तब्येतीमुळे माझीही शितलला म्हणावी तितकी मदत होत नाही."

निशांत शितलकडे पाहून "बोला मॅडम काय करू तुमच्यासाठी?"

शितल हसतच "माझ काही काम करू नकोस पण तुझी काम तरी तुझी तूच कर...तेव्हढाच माझा टाईम वाचेल. बाकी डिटेल्स आईच सांगतील."

सासूबाई लगेच "निशांत, यश आणि अहो तुम्हीपण आजपासून हाॅल आणि आपली-आपली बेडरूम आवरायची. निदान लाॅकडाऊन संपेपर्यंत तरी....बाकी स्वत:ची काम म्हणाल तर ती ईथूनपुढे तुमची तुम्हीच करायची जास्तच अडल तर आम्ही दोघी आहोतच. तसेच कोणाला काय पाहिजे ऊदा. चहा, नाश्ता, जेवण किचनमध्ये येऊन घेऊन जायच, हाॅलमधून आॅर्डर सोडायची नाही. मी आणि शितल फक्त किचन आवरू. टी.व्ही बघत-बघत भाजी निवडून देणे, लसूूण सोलणेे अशीी काामहीी कराायचीी आहेेत तुम्हाला....कामाची लिस्ट खूप मोठी आहे पण ती हळूहळू सांगितली जातील एकदम लोड नको तुमच्यावर बरोबर ना ?"

निशांत, बाबा आणि यश एक सुरात "येस बाॅस...गृहलक्ष्मींनो आपकी आज्ञा सलाखोंपे...."

सासूबाई आणि शितल एकमेकींकडे बघून हसतात.


ही गोष्ट झाली एका घरातली...पण सध्य परिस्थितीत घरा-घरात हेच चालू आहे....स्ञीयांवर खूप काम तर पडत आहेच पण सगळे घरीच असल्याने तिला स्वत: चा असा थोडाही वेळ भेटत नाहीये त्यामुळे ती शारीरीक आणि मानसिकरीत्या फार थकून जातेय.....यात तिची एवढीच अपेक्षा आहे की तिला घरातल्या सदस्यांनी समजून घ्याव आणि शक्य तेवढी मदत करावी...कारण गोष्ट आठ-दहा दिवसांची असती तर कशीतरी निभावलीच असती तीन पण सलग एकवीस दिवस आणि हे लाॅकडाऊन आणखी पुढे  कितीदिवस राहील सांगता येण अशक्य.

यात लेखातील शितल सारखी सासू किंवा अन्य सपोर्ट करणारा सदस्य असेल तर काही प्राॅब्लेम नाही पण तशी सपोर्ट करणारी सासू वा अन्य कोणी सदस्य नसेल तर आणि पुरूषमंडळी मदत करत नसतील तर.....तर घरातल्या पुरूषमंडळीला जरा प्रेमाने समजावून सांगा, नक्कीच ते तुम्हाला मदत करतील. माञ तरीही काही पुरूषमंडळींनी नाहीच ऐकल तर सोडून द्या. मान्य अगदी मान्य तुमच्यावर खूप काम पडतय पण समोरची व्यक्ती ऐकत नसेल तर स्वत:ला ञास करून न घेता हाॅस्पिटलमध्ये दिवसराञ झटणार्‍या नर्स, डाॅक्टर व पोलिसांना समोर आणा. जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा नवीन प्रेरणा भेटेल. फरक एवढाच आहे की डाॅक्टर, नर्स, पोलिस जनतेची मदत करण्यासाठी लढतायेत आणि तुम्ही गृहिणी घरातल्या लोकांसाठी लढत आहात, कष्ट करत आहात.....!

गृहिणींनो हेही दिवस निघून जाणार आहेत...गरज आहे ती फक्त धीर धरण्याची. एकदा का लाॅकडाऊन संपल की घरातील पुरूषमंडळींवर कामाचा एवढा लोड येणार आहे की बस्स...सगळी pending काम त्यांना पूर्ण करावी लागणार आहेत. त्यावेळी ती लोक बीझी होऊन जाणार आहेत आणि तेव्हा तुम्हाला तुमचा टाईम मिळणार आहे; कदाचित नेहमीपेक्षा थोडा जास्तच मिळेल....आणि त्या टाईमसाठी तुम्हाला यादिवसांत कष्ट पडणार आहेत, थोडा ञास होणार आहे पण या कष्टाच फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे......आणि आपला देश जेव्हा पूर्णपणे या संकटातून बाहेर पडेल तेव्हा यात गृहिणींचा मोलाचा वाटा होता हे सर्वांनाच मान्य कराव लागेल !

शेवटी एवढचं म्हणेन की सर्वांसाठी सक्तीची सुट्टी आहे खरी पण एका स्ञीसाठी पुन्हा एकदा तिची फॅमिली वाचवण्याच खुप मोठ आव्हान आहे....तुमचे अनुभव नक्की कळवा...Thank you.


नियमित वाचनासाठी E-mail टाकून subscribe करा.

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments