आजची गरज-निर्विचारीता....!

बर्‍याचवेळा मला पडणारा प्रश्न म्हणजे आपल्या डोक्यात एवढे सारे विचार येतात कुठून? बर हा प्रश्न काही आत्ताच नाही आला माझ्या मनात लहानपणापासूनच येतो...आणि जसजशी मी मोठी झाले तसं याच ऊत्तर खुपच खोलात जाऊन शोधाव लागेल.....अस मला जाणवू लागल.

किती बरं विचार करतो आपण.....एक विचार डोक्यात येतोय न येतोय तोच पुढचा विचार पहिल्या विचाराची जागा घेतो....तर दुसर्‍या विचाराची जागा तिसरा विचार कधी घेतो तेही नाही समजत. काही विचारांचा तर आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी काहीच संबंध नसतो; तरीही ते विचार आपल्या डोक्यात फेर धरतात...काहीवेळा तर आपल्या मनात ऊगीच आपल्या समोरून जाणार्‍या अनोळखी व्यक्तीविषयी कितीतरी विचार येऊन जातात आणि आपण त्यावर आणखी विचार करून त्या अनोळख्या व्यक्तीविषयी काल्पनिक धागे गुंडाळू लागतो...आणि हे सगळ कुठ होत असतं तर ते आपल्या डोक्यातच!!

कधी-कधी तर "आपण एवढा विचार का करतो?" असा याप्रश्नावरचं कितीतरी वेळा मनात विचार करत बसतो. राञी कधी खुपवेळ झोपच नाही लागत, तेव्हाही आपण विचार करत बसतो की नाही बबा माझ ऊद्या आॅफिस , काॅलेज आहे मला झोपलच पाहीजे.....पण तरीही झोप येत नसेल तर आपला अट्टाहास हा असतो की आत्ता लवकर झोपलो तर आपण लवकर ऊठू....अशा एक ना अनेक विचारांनी मनात गर्दी केली की मग परत माझच मन मला  म्हणत अग बाई किती विचार करतेस...हो पण मग कसे घालवू मी हे विचार? कस मन निर्विचारात घेऊन जाऊ?

अनेक प्रयत्नानंतर दोन-तीन महिन्यांपूर्वी मला याच ऊत्तर सापडल....ते म्हणजे "सहजयोग." मी जेव्हा सहजयोग स्विकारला तेव्हाच मी निर्विचारीता मध्ये गेले.......शांत, सुखी, आनंदी फिल करू लागले......कसले विचार डोक्यात नसल्याची अनुभूती मला आली. डोक्यातून थंड हवेचे फवारे वाहू लागले......श्री निर्मला माताजीच माझ सर्वस्व बनल्या. मी एक लहान मुल आहे आणि त्या माॅं निर्मला माताजी माझ्या आई आहेत याचा अनुभव मला आला. आयुष्यात मी का आणि कशासाठी या विनाकारण डोक्यातील विचारांना जागा दिली आहे; याची प्रत्यक्ष जाणीव मला झाली. मी- मी नसून एक शुद्ध आत्मा आहे...करता आणि करवीता विधाता आहे....मग मी चिंता का करू? ही गोष्ट मला ऊमगली. what is sahajyoga? सहजयोग हा जीवन जगण्याचा असा एक पैलू आहे जिथे तुम्हाला तुमच्या आतील व बाहेरील  सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत....तुम्हाला निष्ठेने रहायच आहे, पूर्णपणे स्वतला अर्पण करायच आहे; अस कराल तर आणि तरच तुम्ही स्वतला ऊंचीवर पहाल !आपल्या आतील गोष्टी म्हणजे कोणत्या तर गर्व, अहंकार, असूया, कृतघ्नता, नीती, दुर्बुद्धी, गैरकाम, अपराधीपणा, अपविञता....या आणि अशा कितीतरी गोष्टी ज्या माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात असतात....बाहेरील गोष्टी म्हणाल तर नोकरी,पैसा, प्रसिद्धी या गोष्टींच्या मागे न लागता, त्यासाठी चिंतीत न होता त्या गरजेपुरत्या राखून बाकी सोडून द्या....

निर्विचारीता मध्ये गेल्यावरती मला अनुभवायला मिळालेला एक महत्त्वाचा मुलमंञ म्हणजे "accept life as it is-as it is" थोडक्यात सांगायच तर आयुष्य आहे अस स्वीकारा...मग ते कसंही असो आहे अस स्वीकारायला शिकायला हव....बदला घ्यायच सोडून द्या, राग सोडा, अस्वस्थ व्हायच सोडा आणि स्वीकारायला शिका; मग पहा तुम्हाला कसा तुम्ही त्याच परिस्थितीत कस हसतखेळत जगाल जी परिस्थिती तुम्हाला ईरिटेटींग वाटत होती. तुमचे सगळे प्राॅब्लेम दूर होतील, तुमचे शञू नाहीसे होतील. तुमच आयुष्य खुप सुंदर होईल.

आणखी एक मला ऊमगलेला जीवन जगण्याचा चिरंतर ऊपाय म्हणजे....
"forgiveness-क्षमाशीलता"

खरच का आपण एखाद्याला मनातून माफ करतो? एखादी व्यक्ती आपली गुन्हेगार असेल तर करतो का आपण त्याला माफ? विसरतो का त्याने आपल्याला दिलेल दुख? सोडून देतो का आपण त्या व्यक्तीला काहीच न बोलता रिअॅक्ट न करता? तर नाही.....म्हणून माताजी म्हणतात माफ करा; जोपर्यंत आपण माफ करायला शिकत नाही तोपर्यंत आपण निर्विचार नाही राहू शकत. कारण समोरच्याने आपल्याला दुख दिल आहे या विचाराच ओझ कायम आपल्या मनावर असत....त्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते...आणि मग आपसूकच आपली प्रगती खुंटते. हे झाल माफ नाही केल तर....मग माफ केल तर काय होईल....नक्कीच आपला ऊत्कर्ष होईल.....ज्याच्या विषयी आपल्याला राग आहे, त्याला माफ केल्याने आपल्या डोक्यातील नकारात्मकतेची घाण निघून जाईल....महत्त्वाच म्हणजे डोक्यातील नकारात्मक विचार कमी झाल्याने, दुसर्‍या सकारात्मक विचारांना आत प्रवेश मिळेल आणि आपोआपच मन शुद्ध होऊन जाईल.

आपल्या निर्विचारीतामुळे "एखाद्याविषयी असुया वाटणे" या दुर्गुणावर आपण मात करू शकतोय......ज्याप्रमाणे एखाद्याच्या दुखात आपण सहभागी होतो त्याचप्रमाणे त्याच्या आनंदात, यशातही सहभागी होता आल पाहिजे. मान्य आहे कदाचित सुरूवातील समोरच्याच यश पचवण कठिण जात असेल पण प्रयत्न करून तर पहा, खुप सोप होऊन जाईल....ऊलट समोरच्याच्या यशाने जेवढा ञास तुम्ही करून घ्याल तेवढा जास्त ञास तुम्हाला होणार आहे...कारण यश मिळवणारा कायम पुढे-पुढे जाईल आणि तुम्ही ऊगीच स्वतला ञास करून घेत बसाल.....यावर सगळ्यात रामबाण इलाच म्हणजे दुसर्‍यांना मागे खेचून त्यांची रेषा कमी करण्यापेक्षा स्वतची रेषा मोठी करा...आपोआपच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचाल.

"दिखावा......" तर अजिबातच नको आहे. दिखाव्यामुळे तुम्ही कधीही परम्यात्म्याशी कनेक्ट होऊ शकत नाही.....पण का आणि कशासाठी करायचा दिखावा....तुमच्या जवळ असलेल्या क्षणभंगुर गोष्टींसाठी? आपण येताना येकटे येतो आणि वर जाताना ही एकटच जायच आहे मग का करायचा हा असला दिखावा. म्हणूनच निर्विचारीता येण्यासाठी खुप साध सरळ ह्रद्य आणि शुध्द विचार हवे आहेत.....

माझ्या अनुभवातून सांगायच झाल तर, मी निर्विचारीता अंगीकारल्यापासून हे सगळ विश्व मला माझ वाटतय.....या विश्वातील प्रत्येक बालक मला आझ वाटत आहे......या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी आहे.....या विश्वात मानवजात ही एकच जात मला दिसत आहे. जणू विश्वची माझ कुटूंब झाल आहे......

प्रिय वाचकहो, तुम्हाला या निर्विचारीताचं महत्त्व सांगायच कारण म्हणजे आपल्या निम्म्यापेक्षाजास्त दुखाच कारण हे आपल्या डोक्यात येणारे ऊलटसुलट विचारच आहेत......तुम्ही हे विचार घालवून टाकले तर तुमची सगळी दुख दूर होतील.....एवढच नव्हे तर तुम्हाला खुष राहण्याचा मार्ग सापडेल....तुम्ही सहजयोग स्विकारा....हा सहजयोगच तुम्हाला निर्विचारा कडे घेउन जाईल. सहजयोगाविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, निर्विचार कस व्हायच हे जाणून घ्यायच असेल तर तुम्ही मला विचारू शकता; मी तुमची मदत करेन.......धन्यवाद.

वाचकहो तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत...त्यामुळे लाईक, कमेंन्ट करून असाच प्रतिसाद देत रहा..तर चला तर मग आणखी असेच छान लेख/कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या कथेचे/लेखाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments