खात्या-पित्या घरची मुल...भाग२(अंतिम)


भाग पहिला इथे वाचा: http://hernewinning.blogspot.com/2020/09/blog-post_1.html

दुसर्‍या दिवशी सकाळी. सानवी आपल्या सासूबाईंची स्वत:च्या मोठेपणाची आणि पस्थितीने गरीब लोकांना कमीपणाची दाखवण्याची मानसिकता बदलवण्यासाठी काय करूयात असा विचार करतच असते; तोवर तिला माहेरहून तिच्या बाबांचाफोन येतो. सानवीची आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती आणि आईला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल होत. सानवीचा भाऊ बंंगळूरला जाॅब करत होता त्यामुळे त्याला यायला वेळ लागणार होता, अशा परिस्थितीत सानवीला जाण भागच होत.....तस माहेर जवळच होत.

सानवी पहिल्यांदा तिच्या नवर्‍याची परवानगी घेते. तो जा म्हणतो. विमलाकाकू काय थोड नाक मुरडततच जा बाई तुझा भाऊ येईपर्यंत तरी जावून ये अस म्हणतात.

सानवीचा नवरा वरद, सानवी आणि वेद ला सोडायला जातो. सानवीचे सासरेही आठवडाभर साहित्यसंमेलनासाठी दुसर्‍या गावी गेले होते. आज घरी विमलाकाकू एकट्याच होत्या. राधाबाईंच कामाच टाईंमिंग झाल्याने त्या आपल्या मुलाबरोबर येतात....नेहमीप्रमाणे विमलाकाकूंची देवपूजा चालू होती. सकाळी लवकरच अचानक घरून फोन आल्याने सानवीने फक्त नाष्टा बनवून निघाली होती. असही घरी बाकी कोणी असणार नव्हतच, विमलिकाकू सोडून, त्यामुळे विमलाकाकूंचा स्वयंपाक करायचा अजून बाकी होता.

राधाकाकू आज गणू बरोबर स्वत:चा डबादेखील आणला होता. कारण विमलाकाकूंच्यातील काम झाल्यावर ती दुसर्‍या घरी एका जाणार होती कामासाठी तिथ आज पूर्ण दिवस थांबाव लागणार होत.....राधाकाकू काम आवरून विमलाकाकूंना निघू का विचारत असतात तोवर पूजा करता करताच विमलाकाकू "राधा, राधा' म्हणत चक्कर येऊन खाली पडत असतात......तोवर राधाकाकू पळतच जावून विमलाकाकूंना पकडतात. प्रसंगावधान ओळखून राधाकाकू विमलाकाकूंना खुर्चीवर बसवतात, पाणी प्यायला देतात आणि त्यांच्या फॅमिली डाॅक्टरला काॅल करतात.... तोवर विमलाकाकू "राधा मला डोळ्यापुढे अंधार्‍या आल्यासारख होतय."

राधाकाकू घाबरतच डाॅक्टरांना सगळ सांगतात. त्यावर डाॅक्टर हाॅस्पिटलमध्ये याव लागेल अस सांगतात. घरी तर कोणच नसत मग राधाकाकूच कशातरी मलाकाकूंना रिक्षा करून हाॅस्पिटलला नेतात. डाॅक्टर अॅॅडमिट करून घेतात.


डाॅटर  "घाबण्याच काहीच कारण नाही, थोड्या पांढर्‍या पेशी कमी झाल्या आहेत. एक चार दिवस अॅडमिट करूया...होईल कव्हर."

राधाकाकू "होय चालेल डाॅक्टर" म्हणून सानवी ला काॅल करतात...सानवी थोडी घाबरतेच अस अचानक सासुबाई अॅडमिट.....ती वरद ला सांगते व मीही येते तुझ्याबर अस म्हणते.

त्यावर वरद "अग ईथ तुझ्या आईलाही तुझी गरज आहे, मी जातो आईजवळ,  यु टेक केअर." सानवी तरीही मागे लागगते वरदच्या पण  वरद ऐकत नाही कारण तो फोनवर डाॅक्टरांशी बोललेला असतो आणि घाबरण्यासारख काहीच नव्हत...

एव्हाना इकडे हाॅस्पिटलमध्ये दुपार झालेली असते....डाॅक्टर पेशंन्टला जेवण दिल त चालेल अस सांगतात.....राधाकाकू स्वत:आणलेल्या डबा मलाकाकूंपुढे करतात...कारण घरी स्वंयपाक बनवण्या अगोदरच हे सगळ घडल होत....आणि पेशंन्टला बाहेरच खायला देऊ नये असा डाॅक्टरांचा सल्ला. राधाकाकू घाबरतच डबा पुढे करतात कारण विमला काकूंचा स्वभाव म्हणजे 'आम्ही खात्या-पित्या घरची माणस.' पण सकाळपासून स्वत:बरोबर घडलेल्या प्रकाराने आणि राधाने निस्वार्थीपणे केलेल्या मदतीने विमलाकाकूंना नाही म्हणायला जागाच ऊरली नव्हती.

डब्यात भेंडी आणि चपाती असते....विमलला काकू खायला सुरूवात करतात.....त्यांना त्या कष्टाच्या भेंडी आणि भाजीची एवढी चव लागते की त्यांना आपण पूर्ण बरेच झालो की काय अस वाटत...आणि दुसरीकडे आतुन मन खजील होत की आपण ज्याला चांगल-चुंगल खायला म्हणायचो त्याच्या कितीतरी पट चव आहे राधाच्या डब्याला....त्यांचे डोळे पाण्याने भरतात. त्या राधाकडे पाहतात तर राधा बिचारी समोर रिकाम्या काॅटवर तिचा मुलगा गणूला झोपवत असते. आज पहिल्यांदाच विमलाकाकूंना राधाचा प्रामाणिकपणा, माणुसकी आणि गणूचा निरागसपणा जाणवतो....त्यांना स्वत:च्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होतो.

संध्याकाळी वरदही येतो हाॅस्पिटलमधे...सानवीचे सासरेही निघालेले असतात घरी यायला....विमलाकाकू वरदला "माझी काही काळजी करू नकोस, मी अगदी व्यवस्थित आहे. राधाने खूप काळजी घेतलेय माझी."

पहिल्यांदाच आईकडून राधाकाकूंचे होत असलेले कैतुक ऐकून वरदला मनातून थोड नवल वाटत व ऊशीरा का होईना आपल्या आईचा गैरसमज दूर झाला म्हणून वरदला बर वाटत, कारण त्यालाही आपल्या आईचा स्वभाव माहीत असतो.....

सानवी वरद ला फोन करून आईंनकडे द्यायला सांगते, विमलाकाकू "बोल सानवी, मी व्यवस्थित आहे. तु माझी काळजी करू नकोस....तुझ्या आईची काळजी घे...ईथ राधा आणि वरद आहेत माझी काळजी घ्यायला. सानवी माझ चुकलच गं...गरीबीवरून मी खूप बोलले तुला आणि राधालाही मला माफ कर. माणुसकी पैश्याने खरेदी करता येत नाही.....आणि राहिला खायचा-प्यायचा प्रश्न तर तो आपल्या मानन्यावर आहे. खरी चव तर कष्टाच्या भाकरीलाच आहे.....मी ऊगीच घालून-पाडून बोलायचे राधाला; ती आणि तीचा मुलगा खुप प्रामाणिक आहेत...माझ्याच डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती श्रीमंतीची यात मी लहान मुलांनादेखील सोडल नाही. खरचं माझ चुकल."

सानवी "अहो आई तुम्ही माफी मागू नकात. तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघाली हेच महत्त्वाच. हव तर तुम्ही एकदा राधाकाकूंना बोला तुमच्या मनातल म्हणजे तुमच मन हलक होईल."

विमलाकाकू " हो राधाची माफी तर मी मागणारच आहे, त्याशिवाय माझ मन शांत नाही होणार." म्हणून फोन ठेवतात.

दुसर्‍या दिवशी सकाळी राधाबाई घरून बनवलेला नाश्ता घेऊन येतात विमलाकाकूंसाठी..... आज विमलाकाकूंच्या श्रीमंतीचा गर्व राधाबाईंच्या मनाच्या मोठेपणापुढे हरला होता.

विमलाकाकू गणूला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात व मनापासून आणि कृतज्ञता भावाने राधाबाईंची माफी मागतात.


राधाबाईंना कसतरीच वाटत आपल्या मालकीणीने आपल्याला माफी मागितल्यावर....
राधाबाई "मी सगळ विसरायला तयार आहे फक्त एका अटीवर ते म्हणजे तुम्ही हा आणलेला सगळा शिरा संपवायचा बर का..." अस म्हणून विमलाकाकू आणि राधाबाई दोघीही हसतात.
.........धन्यवाद......


प्रिय वाचकहो तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत...त्यामुळे लाईक, कमेंन्ट करून असाच प्रतिसाद देत रहा..तर चला तर मग आणखी असेच छान लेख/कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 

"रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments