खरचं ती नवर्‍याच्या पैशांवर जगतेय...भाग २(अंतिम)


रविवारचा दिवस ऊजाडतो. साधना आणि निशा दोघीही मानसीच्या घरी पोहचतात. बेल वाजवतात....तर कोणीतरी दार ऊघडून हसून त्यांचे स्वागत करत.....त्या दुसर्‍या कोणी नसून मानसीच्या सासुबाई असतात. सासुबाई त्यांना बसायला सांगतात व नोकराकरवी त्यांना पाणी द्यायला लावून चहा ठेवायला सांगतात. साधना व निशा बसून घेतात.....निशा मानसीच घर न्याहळत असते....तिला घर बरच मोठ भासत. नुसत मोठच नाही तर खुप साफ-सुतर आणि खुप छान डेकोरेट केल होत घराला.

मानसी आणि तिचा नवरा राघव दोघे किचनमध्ये बिझी असतात....राघव मानसीला मदत करत असतो नेहमीप्रमाणेच....हे पाहून तर निशाला आश्चर्यच वाटत की मानसीचा नवरा तिला किचनमध्ये मदत करतोय...तिच्या मनात येत की आपला नवरा तर साधा एक कप चहा करायच तर लांब किचनकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही.....तस निशाने घरात प्रवेश केल्यापाशूनच तिच्या मनात अनेक प्रश्न चालू असतात. पहिला तर मानसीच्या सासूबाईंनी तिच आणि साधनाच एवढ्या आनंदाने व हसून स्वागत केल होत, दुसर राघव मानसीला करत असलेली मदत, आणि घरात असलेल्या विविध-आकर्षक पेंटिंग्ज ज्या की मानसीने स्वत बनवलेल्या पेंटिंग्ज होत्या अस सांगून तिची स्तुती करणारी सासू....ती मनातच स्वतच्या सासुलाही कोसत असते, नाहीतरी आमची सासु माझ्या मैञिणी आल्या की तोंड टाकतात....मी एवढा जाॅब करत असुनही माझी किंमतच नाही त्यांना....मानसी घरी बसून पण हाताखाली नोकर, मदत करणारा नवरा, कौतुक करणारी सासु....साधना निशाला हळूच हाताने हलवते व निशा विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते....
मानसी किचनमधून बाहेर येते व दोघी मैञिणींना पाहून त्यांना मिठी मारते....निशा मानसीच हे रूप पाहून तर आणखीच अवाक होते....पहिली नजर तर डिझायनर साडी आणि गळ्यातील नेकलेसकडेच जाते....आणि तिच्या भुवया ऊंचावतात.

"काय ग निशा अशी काय पाहतेस?" मानसी

निशा जीभ चावतच "काही नाही ग खुप दिवसांनी पाहिल ना छान वाटल."

ईकडे साधना नुसती गंमत पाहत होती निशाची.....तिला सगळ समजत होत....निशाची अवस्था कशी झालेय ती....त्यासाठी ऊगीच माहीत नसताना कुणाबद्दलही आणि कोणाच्या परिस्थिती बद्दल अनुमान काढू नयेत अस म्हणतात ते खरचं आहे तररर!

"साधना काय ग कितीवेळा घरी ये म्हटल तर आली नाहीस...नशीब आज निशामुळे आपली भेट झाली." मानसी

"अस काही नाही ग...काहीतरी कारण असेल तर येण होत नाहीतरी जाॅबमधून सुट्टी कुठ मिळते.....पण हो हे माञ आहे की निशामुळेच यायच झाल बघ" साधना.

तिघींच्याही छान गप्पा चालू होतात...पण निशा बिचारी जरा गप्प असते...तिच्या मनात अजून अनेक प्रश्न चालू असतात....तेव्हड्यात मानसीला एक काॅल येतो ज्यावर ती कसलातरी हफ्ता मी आज संध्याकाळपर्यंत भरेन....काल जरा नेटवर्क प्रोब्लेम होता सो नाही भरु शकले अस म्हणते.
आणि हाक मारून राघवलाही सांगते त्याविषयी....राघव तिला थॅंक्स म्हणतो व मानसी तु आहेस म्हणून मी निवांत आहे बघ अस म्हणून मानसीचे आभार मानत असतो...हे पाहून परत निशाला काहीच कळत नाही...साधना मानसीला विचारते तेव्हा त्यांना समजत की घरातील सगळ्या फायनान्शीयल बाबी मानसीच हॅन्डल करत असते.....निशा मनातच "बापरे मजा आहे बुवा हिची घरी बसून सगळ्या आर्थिक गोष्टी हिच्याकडे."

निशाला आत्तापर्यंत एवढतर नक्की समजल होत की मानसीच तिच्या घरात जबरदस्त वजन आहे....साधना आणि निशाची चहा, नाश्ता, स्नॅक्स, लंच सगळी तयारी एकदम मस्त केली होती मानसीने.....संध्याकाळी मानसीने आॅर्डर दिलेली काजूकतली येते व ती पॅक करून ती निशा व साधनाला देते घरी नेण्यासाठी.....त्यावेळी निशाला आणखी एक गोष्ट कळते ती म्हणजे मानसी एका महिला संस्थेची संचिलिका होती आणि त्याद्वारे ती लघुऊद्योग करणार्‍या महिलांना त्यांचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी आॅनलाईन व्यासपीठ ऊपलब्ध करून देत होती.....आता निशाला पुरेपूर कळून चूकल होत की मानसी जाॅब न करताही नवर्‍याच्या नाहीतर स्वतच्या जीवावर जगत होती आणि मी जाॅब करत असूनही घरातील प्रत्येक गोष्टीसाठी नवर्‍यावर अवलंबून होते.

अलमोस्ट संध्याकाळचे सहा वाजले होते.....साधना आणि निशा मानसीचा निरोप घेतात....मानसीही त्यांना परत एकदा वेळ काढून नक्की भेटूयात अस बजावते....जाताना निशाच तोंड पूर्ण ऊतरल होत...साधनालाही समजल होत की निशाला तिच्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तर मिळाली असावीत म्हणूनच ती शांत आहे.....निशाला मनोमन ऊमगल होत की दिसत तस नसत आणि म्हणूनच जग फसत...बाहेरून तर सर्वांना मी स्वावलंबी आणि समाधानी वाटत असेल पण खरी स्वावलंबी व समाधानी तर मानसी होती.

खर पाहिला गेल तर अस बर्‍याच ठिकाणी दिसून येत की काही जाॅब करणार्‍या महिलांना सगळ्या म्हणत नाही मी,  घरी राहून घरकाम करणार्‍या महिला म्हणजे निव्वळ नवर्‍याच्या जीवावर जगणार्‍या आणि झोपा काढणार्‍या वाटतात....आणि जास्त करून हे अस वाटण आपल्या जवळच्या मैञिणी, शेजारी यांच्याबाबतच असत....पण खरतर त्या घरी राहून घरची कामे करणार्‍या स्ञिया नवर्‍याच्या जीवावर अवलंबून कमी पण पूर्ण घरच त्यांंच्या जीवावर अवलंबुन असत.....आणि अशा महिलांजवळ जाॅब करणार्‍या महिलांच्या तुलनेत पैसे कमी असतीलही पण रोजची तारेची कसरत तरी नक्कीच नसते...जाॅब करणार्‍या महिलांकडे पैसे असतीलही पण धावपळ करावी लागते....कुठलीही गोष्ट फुकट नाही मिळत....

मुळ मुद्दा जाॅब करण न करण अथवा घरी बसण हा नसून हा आहे की, तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जीवनशैली, त्या व्यक्तीची घरची परिस्थिती, त्या व्यक्तीला  सामोर्‍या जाव्या लागत असलेल्या गोष्टी माहित नसताना ती व्यक्ती कशी आयुष्य जगतेय वा कोणावर अवलंबुन राहून जगतेय या गोष्टींवर अनुमान करण अथवा कोणतेही भाष्य करणं टाळाावच...त्यामुळे नाती तुटण्याची शक्यता जास्त असते. कारण प्रत्येकाचा दिवस येत असतो? फक्त वेळ पुढे-मागे होत असते....सांगायचा मुद्दा एकच की जाॅब करणार्‍या महिलांनी घरी असणार्‍या महिलांना हिणवू नये व घरी असणार्‍या महिलांनीही जाॅब करणार्‍या महिलांना हिणवू नये कारण प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाच्या गरजा, आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. जो-तो आपल्या परीने राहत असतो, आयुष्य जगत असतो.


प्रिय वाचकहो, तुम्हाला काय वाटत स्वावलंबी होण्यासाठी जाॅबच करायला हवा का? स्वावलंबी झाल्यावरच आपण समाधानी राहू शकतो? की स्वावलंबी न होताही स्वतच्या आत्मविश्वासावर सगळी सुञे तुमच्या हाती घेऊ शकता? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.....धन्यवाद !

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

माझ्या अशाच छान-छान कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 
"रंगआयुष्याचे" https://www.facebook.com/hernewinning/
या फेसबुक पेजला लाईक करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments