गृहिणी ते यशस्वी महिला ऊद्योजिका.....!! भाग २(अंतिम)


भाग १ इथेही वाचू शकता:-http://hernewinning.blogspot.com/2020/10/blog-post_6.html

मागच्या भागात आपण पाहिलच की रिया ज्वेलरी डिझाईनमध्ये तिच करिअर करायच ठरवते. 

पण हे सर्व करण्यासाठी, पूर्णत्वाला नेण्यासाठी तिच्यापुढे खूप खाचखळगे होते. असणारच ना "टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देवपण येत नाही" अस ऊगीचच म्हटल जात नाही. रिया त्या क्षेञातील अभ्यास सुरू करते. ज्वेलरी डिझाईन तर तीला खूप छान जमत होत पण पुढचा प्रश्न हा होता की डिझाईन केलेली ज्वेलरी बनवणार कोण आणि कशी? बर बनवलीच तर विकणार कुठे ? आणि कोणाला? आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे भांडवल! ते कुठून ऊभा करावयाचे?

पहिल्यांदा रिया एक डायरी घेते. त्यात ती एक मस्त ज्वेलरी स्टूडिओ काढते. बर या स्टूडिओला नाव काय द्यायचे असा विचार करत असतानाच तिला दुर्गा हे नाव सुचत. त्याला कारण म्हणजे रिया ही दुर्गादेवीची निस्सीम भक्त! 

तिच्या डायरीत ती सगळा ऊलटा प्लॅन ठरवत असते. म्हणजे अगोदर "दुर्गा स्टूडिओ" त्यानंतर स्टूडिओ ऊभा असलेल्या जागेचे भाडे, स्टूडिओत काम करणारे कारागीर, ज्वेलरी बनवण्यासाठीचे साहित्य, त्या कारागिरांना द्यावा लागणारा पगार, ग्राहकांची पसंती इत्यादी. बरोबरच आणखी खूप लहान-लहान गोष्टी. तिच्यासमोर दिसत असलेला तिचा  'दुर्गा ज्वेलरी स्टूडिओ' ऊभा करण एवढ सोप काम नव्हतच मुळी. पण स्वप्न पाहिल तर ते सत्यात ऊतरेल ना स्वप्न पाहिलच नाही तर सत्यात काय ऊतरणार? हा विचार मनात येऊन रिया पुन्हा एकदा कामाला लागली.

रिया मुळातच सारासार विचार करणारी, तिच्या मते रिस्क घ्यायलाच हवी, ती वेळ आता आली आहे आणि रिस्क कशात नसते; लग्न करण्यापासून ते म्हतारपणी मुलांच्या नावावरती प्राॅपर्टी करेपर्यंत रिस्क ही असतेच. लग्न करताना तरी कुठे माहित असत की मिळणारा लाईफ पार्टनर पुढे जाऊन आपल्याशी कसा वागेल? अथवा म्हतारपणी मुलांच्या नावावर प्राॅपर्टी केल्यानंतर मुले आपल्याला सांभाळतीलच? नाहीच ना पण आपण रिस्क घेतोच की ही नाती निभावण्याची. मग बिझनेस ऊभारणे ही तर पैश्यांसाठीची रिस्क आहे. ती घेतल्याशिवाय कोणताही अंदाज येणारच नव्हता.

आता रिया सरळ बाजूने विचार सुरू करते...सुरूवातीला भांडवल जमा करण्याचा विचार करते. पण कस? नवर्‍याकडे मागून पाहते. पण राघव काम एके काम करणारा हे असल बिझनेस वैगेरेच खूळ डोक्यातून काढून टाक म्हणून रियाला मदत देण्यास साफ नकार देतो. वरून "अग तुला बिझनेस मधलं काय कळणार. बाहेर किती स्पर्धा आहे, किती रिस्क आहे" अशा शब्दात तिच्यावर ज्ञानाचे प्रहार करतो..... पण रियाने ठरवलच होत आता मागे वळून पाहयच नाही. ज्वेलरी स्टूडिओ ऊभा करायचाच.

त्यासाठी रिया दागिने गहाण ठेवायच ठरवते. बर दागिने गहाण ठेवायचे म्हणजे राघवला विचारण गरजेच होत पण राघव नकारच देणार होता हे तिला माहित होत. मग रिया तिच्या वडिलांनी बनवलेले व ती जाॅब करत असताना तिने केलेले जे काही थोडेफार दागिने होते ते गहाण ठेवते.....परंतु एवढे पैसे पुरणारे नव्हते. ती शोधाशोध-अभ्यास चालूच ठेवते. या अभ्यासातून ती मुद्रा योजनेची माहिती मिळवते. त्याअंतर्गत तिला सरकारकडून कर्जही मिळते. त्याचबरोबर महिला बचत गटाकडूनही ती कर्ज ऊचलते. या गोष्टी सोप्या नव्हत्या पण "बंदे की मेहनत को किस्मत का सलाम" या ऊक्तीप्रमाणे तीची कष्ट करण्याची तयारीच एवढी होती की नशीबालाही तिला साथ देण भाग पडल. स्टूडिओ ऊभा करण्यासाठीचे भांडवल तर रियाने ऊभा केले. 

आता गरज होती कारागीरांची. त्यासाठी महिला बचत गटातीलच दोन महिलांना ती बरोबर घेते. जेणेकरून त्या महिलांनाही रोजगार ऊपलब्ध होईल. त्या महिलांना ज्वेलरी डिझाईन करणे माहीत नव्हते पण रिया त्या दोघींना ट्रेनिंग देऊन सर्व गोष्टी शिकवते. रिया जेव्हा एक-एक पाऊल पुढे टाकत होती तेव्हा तिला आपोआपच बिझनेसमधील गोष्टी कळत गेल्या. त्यासाठी कधी तिने स्वत अभ्यास केला, कधी यशस्वी ऊद्योजकांचे व्हिडीओ पाहिले तर कधी अनुभवी लोकांचे सल्ले घेतले. कारण लहानपण सोसल्याशिवाय मोठेपण मिळत नाही बररं हे रियाला चांगलच ठाऊक होत.

रियापुढील भांडवल, कारागीर यांचा प्रश्न सुटला होता. आता पुढे प्रश्न होता तो स्टूडिओसाठी जागा. यासाठी तिने  राघवची मदत घ्यायची ठरवली. रिया बोलली राघवशी की मला असा-असा ज्वेलरी स्टूडिओ ऊभा करावयाचा आहे तरी तू मला तूझी ओळख वैगेरे असेल कुठे तर भाड्याने जागा मिळवून दे...
यावर राघव अवाकच होतो...त्याला आश्चर्य वाटते की रियाने घराला, वेदला सांभाळत एवढ मोठ स्वप्न पाहून भांडवलही ऊभा केल आहे... तीच स्वप्न ती सत्यात ऊतरवतेय. एखाद्या पुरूषालाही मागे टाकेल एवढी जिद्दीची कामगिरी ती करत आहे अस मनातुन वाटून राघवला स्वतबद्दलच जरा guilty फील होत; की आपण रियाला मदत केली नाही. पण चूक सुधारायची वेळ आली होती हे जाणून राघव रियाला तू काळजी करू नकोस मी पाहतो जागा अस आश्वासन देतो.

 आपण जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट करण्यास सुरूवात करतो तेव्हा सुरूवातीला लोक हसतात, नावे ठेवतात, नंतर विचारू लागतात आणि शेवटी त्या गोष्टीचा स्वीकार करतात....हेच बरोबर घडल होत रिया सोबत...राघवनेही तिच स्वप्न स्विकारल होत. राहता राहिला सासु-सासर्‍यांचा प्रश्न तर तेही हळुहळू स्विकारतील अस वाटुन रियाच मनोबल वाढतं.

राघव रियाला करत असलेल्या मदतीने रिया सुखावते. पण ती गप्प बसत नाही. तिला शक्य होईल तितकी तीही जागेसाठी शोधाशोध चालूच ठेवते. बरोबरच जागा कुठेही मिळून जाईल आता पुढची गरज आहे ती ग्राहकांची.... हे ओळखून ग्राहकांपर्यंत कस पोहचायचं याचा अभ्यास सुरू करते. 

आजच्या इंटरनेटच्या काळात ग्राहकांपर्यंत पोहचण फारस अवघड नसलं तरी बिझनेसमधील स्पर्धाही तेवढीच वाढली आहे; याचा अंदाज आलेलाच असतो रियाला. मग या स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी गरजेचा आहे तो ग्राहकांचा विश्वास! 

'ग्राहक हेच आपले अन्नदाते' हे तत्व मानून रिया त्या अनुषंगाने ज्वेलरी डिझाईन, त्याची क्वालिटी, प्राईझ ठरवते. जेणेकरून ग्राहकांना प्रोडक्ट्स हे योग्य दरात मिळतील. एखादी स्ञी दागिना घेऊन ज्यावेळी माझ्या स्टूडिओ मधून बाहेर पडेल तेव्हा तिच्या चेहर्‍यावरती समाधानाची एक वेगळीच चमक असणार आहे असा विश्वास रियाने ग्राहकांना दिला आणि तो खराही केला. 

दिवसेंदिवस रियाच्या ज्वेलरी डिझाईन्सची मागणी वाढत गेली. रिया फक्त तिच्या शाॅपमध्येच नाही तर बाहेर एक्झीबिशनमध्ये देखील प्रोडक्ट्स विकू लागली.  महिलांसाठी ती एक प्रेरणा झाली होती. रियाला 'यशस्वी महिला ऊद्योजिका' म्हणून अनेक पुरस्कारही मिळाले.

आता तिच्याकडे बर्‍यापैकी पैसे जमा होऊ लागले. तिने पहिल्यांदा लोन क्लीअर केले. त्यानंतर दागिने सोडवून घेतले कारण पडत्या काळात याच दागिन्यांनी तिला साथ दिली होती. 

वर्षभराने तिने स्वतची जागा घेऊन त्या ठिकाणी स्वतचा स्टूडिओ ऊभा करायच ठरवल. जागा खरेदी करण म्हणजे खुप पैसे लागणार होते. त्यावेळी तिला राघव आणि तिच्या सासर्‍यांनी देखील मदत केली. सासूबाईंनीही होकार दिला व स्टुडिओ ऊभा राहिला. 

जवळजवळ दोन वर्षे गेली.... रियाचा बिझनेस सुरू करून तो सेट होईपर्यत.....या दोन वर्षात खुप चढ-ऊतार पाहिले होते रियाने पण दुर्गेच रूप धारण करून खंबीरपणे सगळ्या आव्हानांना तोंड दिल. म्हणूनच रियाने तिच्या स्टूडिओला "दुर्गा स्टूडिओ" हे नाव दिल.

हा सगळा प्रवास आठवत असताना गाडी घराजवळ कधी पोहचली समजलच नाही रियाला. "मम्मी चल घर आल" अस म्हणून वेदने रियाला आवाज दिला तेव्हा रिया भानावर आली. "हो रे चल ऊतर" म्हणून रियाने हळुच डोळ्यातले आनंदाश्रु टिपले. आज तिच गृहिणी ते यशस्वी महिला ऊद्योजिका स्वप्न पूर्ण झाल होत.

प्रिय वाचकहो, हा प्रवास एवढ्या सविस्तरपणे देण्यास कारण म्हणजे बिझनेस सुरू करायचा म्हणजे अनेक छोट्या-मोठ्या अडचणींना सामोर जाव लागणारच, फक्त त्या अडचणी अगोदरच आपल्याला माहित असतील तर पुढचा प्रवास नक्कीच सुकर होऊ शकतो यासाठी! 

स्वप्न पाहूया, ती सत्यात ऊतरवूया....!!

अस काही नाही की बिझनेस सुरू करायचा म्हणजे घरातून बाहेर पडायलाच हव...आज आपल्याजवळ स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, वाय-फाय आहे, लॅपटाॅप आहे, गुगल आहे....जिथे की एका क्लीकसरशी हजारो गोष्टींचे नाॅलेज मिळू शकते. रिया, रियाचा बिझनेस हे ऊदाहरण आपल्यातलच, आपल्या आजुबाजूचचं आहे. आशा एकच की माझा हा ब्लाॅग वाचून काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या एका जरी रियाला फायदा झाला तरी आनंद आहे....धन्यवाद!!

©माधुरी दिपक पाटील

पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह...तोपर्यंत stay safe, say home, stay tunned...!!

हो आणि पुढची कथा वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" रंग आयुष्याचेया फेसबुक पेजला नक्की लाईक करा.

Post a comment

0 Comments