गृहिणी ते यशस्वी महिला ऊद्योजिका.....!!

         
       रियाची गडबड चालू होती. थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे येणार होते. आजचा दिवस रियासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा होता. सगळीकडे तिच कौतुक सुरू होत....तिने स्वतच्या पायावर, कोणाचीही मदत न घेता "दुर्गा स्टूडिओ"  ऊभ केल होत. या स्टूडिओत स्ञियांसाठीचे हरप्रकारचे पारपारिक आणि मराठमोळे दागिने उपलब्ध होते. ठुशी, तन्मणी, कोल्हापूरी साज, मोहनमाळ, वज्रटीक, दुर्वाहार, चंद्रहार, बकुळीहार, नथ, सरी, बांगड्या, पाटल्या, बोरमाळ, कंठी, पुतळीहार, मंगळसुञ, बाजूबंद, खोपा, बुगडी, पैंजण, अॅंटीकहार, गोठ, चिंचपेटी वैगेरे. एक ना अनेक प्रकाराने स्टूडिओ लावण्याने लखलखत होता.

आज त्याच स्टूडिओच उद्घाटन होत....प्रमुख पाहुणे आले तसे सर्वजण तयार झाले त्यांच्या स्वागताला.

 प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मान रियाने तिचे सासरे आणि नवरा राघवला दिला होता. तेच ते सासरे आणि तोच तो नवरा जे नेहमीच बायकांना काय कळतो व्यवहार आणि काय कळतो बिझनेस म्हणणारे. 

पण रियाने कधीच हार मानली नाही ना त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले. कार्यक्रमाला बोलावलेल्या उद्योजक स्ञियांनपुढे कांजीवरम साडी नेसून सासुबाई तर अशा मिरवत होत्या की जसे त्यांनी रियाला खूप सपोर्ट केला होता....बायकांनी फक्त चुल आणि मूल सांभाळाव अस म्हणणार्‍या सासूबाई आज भलत्याच दिमाखात होत्या बरं...!

कार्यक्रम खूप छान पार पडला...सगळ काही रियाने केलेल्या प्लानिंग नुसार झाल होत....संध्याकाळ झाली होती, पाहुणेमंडळीही आता संपली होती. रिया, रियाचे सासू-सासरे, नवरा राघव, सात वर्षांचा मुलगा वेद सगळेजण गाडीत बसून घरच्या दिशेने निघाले होते. घर शहराबाहेर होतं आणि रियाचा ज्वेलरी स्टुडिओ शहरात होता. गाडी सुरू झाली तशी, रिया समोरून एक-एक प्रसंग पुढे सरकत होता....

रिया आणि राघव दोघांच लग्न होऊन दोन वर्ष झाली होती. दोघेही आय.टी. क्षेञात मोठ्या हुद्द्यावर कामावर होते. दोघेही खूष होते...सासूबाईंना पटायच नाही सूनेन जाॅब केलेला पण मुलापुढे आणि घरात येणार्‍या एक्र्स्टा पैशांमुळे त्यांना गप्प बसाव लागायच. सासर्‍यांच तर पहिल्यापासून बायकांनी घरातलच सांभाळाव, बाहेरच्या गोष्टी पहायला घरातले पुरूष जिवंत आहेत अस होत....पण राघव रियाच्या बाजूने होता; त्यामुळे रिया जाॅब करू शकत होती. 

पण म्हणतात ना आयुष्य हे चढ-ऊतारांनी भरलेल असत.....जीवनरेषा सरळ झाली की आयुष्यच संपत. तसच काहीस म्हणा की सासु-सासर्‍यांनी आम्हाला नातवाच तोंड बघायच आहे म्हणून राघवच्या मागे रट लावली....राघव मुळातच आई-बाबांचा रिस्पेक्ट करणारा; त्याने आई-बाबांना समजूतदारपणे सांगितल की मी रियाशी बोलून निर्णय घेईन तुम्ही ऊगीच टेंन्शन घेऊ नकात म्हणून. 
 
फॅमिली प्लानिंग विषयी राघव रियाच मत विचारतो. रियालाही तिच्या आॅफीस मधील बर्‍याच मैञिणींनी हे सुचवल होतच पण रियाने अजून त्यावर विचार केला नव्हता...पण राघवने विषय काढलेला पाहता...कदाचित हीच ती वेळ असावी खर्‍या अर्थाने पुढील गोष्टींचा विचार करण्याची अस समजून राघवला होकार दर्शवते. मुळातच रिया समजूतदार आणि भलेही जाॅब करत असली तरी फॅमिली ओरिएंटेड. ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या वेळेतच व्हायला हव्या असा विचार करणारी.

मग काय घरात तयारी सुरू होते; नवीन पाहूणा येण्याची. घरात एकदम प्रसन्न, आनंदी वातावरण तयार झाल होत. सासूबाई तर फोन करून सांगून थकल्या नातेवाईंकाना 'मी आजी होणार आहे म्हणून.'  तशा सासूबाई हुशार त्यात अनुभव गाठीला. त्यांच्या दृष्टीने बाळ झाल्यावर रियाला जाॅबला न जाता घरी राहव लागणार होत आणि त्यांची कामे हलकी होणार होती.

तस पाहिला गेल तर आपल्या आईला ञास नको म्हणून राघवने कामवाल्या मावशी ठेवल्या होत्या घरकामासाठी. पण सासुपण तर सूनबाई वरच गाजवता येणार होत ना...ते कामवालीवर थोडी ना दाखवता येणार होतं. तसेच सासर्‍यांनाही शेजारी-पाजारी आमची सुनबाई घरी राहून आमची कशी सेवा करतेय हे दाखवायच होत. 

रिया आणि राघव तर खूप खुष होते. रियाचा जाॅब सुरूच होता. राघवने तिला खूपवेळा सांगितल की कामावर जायच बंद कर आता. रजा घे सातवा महिना चालू आहे तुझा पण नाही. ऐकेल ती रिया कसली. डाॅक्टरांनी दिलेल्या डिलीव्हरी डेट च्या फक्त आठवडा अगोदर घरी थांबली. तोपर्यंत ती कामावर जातच होती. नेहमी कामात बिझी राहयला आवडायच तिला.

रियाची सुखरूप डिलीव्हरी झाली. राघव आणि रियाच्या संसारवेलीवर वेद नावाच फुल ऊमललं. घरात एक नवीन सदस्य आला होता. घर कस अगदी भरून गेल. सासु-सासरे तर नातवाला कुठे ठेऊ न कुठे नको अस करू लागले. रियाच रूटीन माञ पूर्णपणे बदललं होत. वेदच करून झाल की घरातील कामे आणि घरातील आवरेपर्यंत वेद असायचाच तयार हट्टाला पेटलेला. त्यात सासु-सासर्‍यांनी पहिलच नातवंड म्हणून वेदला डोक्यावर चढवून ठेवलं होत. रियालाही काही बोलता यायच नाही. मुळातच ती घरातील मोठ्या लोकांचा आदर करणारी. निदान सहा महिने तरी तिला कामावर रजा टाकावी लागणार होतीच.

 हळुहळू दिवस जातील तसे सासु-सासर्‍यांचे वेदप्रती नव्याचे नऊ दिवस संपले. वेद रांगायला लागला, घरातील वस्तू ओढू, फेकू लागला तसं ते वेदवरती ओरडू लागले. रियाला खूप वाईट वाटायच वेदवरती कोणी अस ओरडल की पण बोलून ऊपयोग नव्हता. तिला माहीत होत की कोणाला बोलून काही ऊपयोग नसतो, ज्याच-त्यालाच मनापासून समजायला हव. बघता- बघता सहा महिने निघून गेले वेदच्या बालपणात आणि तिच्या आईपणात.

 रजा संपायला आली होती; तशी रियाची काळजी वाढू लागली. वेदला सोडून आॅफिसला जाण्याचा विचार तिला करवत नव्हता. सासू-सासर्‍यांच्या विश्वासावर वेदला ठेवणं तिला पटेना....एक-दोनदा बोलूनही पाहीलं तीने सासूबाईंशी वेदची काळजी घेण्याविषयी. पण सासूबाईंनी स्वत:च्याच दुखण्याच कारण पुढे करून; पूर्णपणे वेदची जबाबदारी घेण टाळल. राघवशीही ती परत कामावर रूजू होण्याविषयी बोलली पण राघवनेही तुला जे काही करायच आहे; ते तुझ्या जबाबदारीवर कराव लागेल अस स्पष्ट सांगितल. खरतरं रियाला राघव कडून ही अपेक्षा नव्हती पण जे आहे ते स्विकारून काहीतरी मार्ग काढावयाचा होता रियाला. रियाच्या माहेरूहनही काही मदत घेऊ शकत नव्हती ती. आई-वडील थकले होते शिवाय तिचे सासू-सासरे यांना वेद दुसर्‍यांच्या घरी राहिलेला पटणार नव्हत.

खुप विचार करत राहते रिया...जाॅब जाॅईन करू की नको? केलाच तर वेदला कोण सांभाळणार? सांभाळलच तर व्यवस्थित सांभाळेल का? मी सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकेन का? एक ना अनेक विचारांनी रियाच मन अस्वस्थ होतं होत....ती खूप ठरवायची की एवढा विचार करायला नको पण व्हायच तेच व्हायच. मन आणि डोक यांच शीतयुध्द चालूच असायच.  एकूणच रिया शारिरीक बदल, मानसिक अशांतता, बौद्धिक अस्थिरता या तिन्ही गोष्टींना फेस करत होती. कदाचित यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन म्हटल जात असाव.

जरी या सगळ्या गोष्टींना रिया फेस करत असली तरी तिला समजत होत; तिच्या या अवस्थेची जाणीव तीला होत होती.   त्यामुळे रिया स्वतला वेदच्या बाललीलांमध्ये रमवायचा प्रयत्न करत होती. सगळ्या गोष्टी संयमाने हाताळायचा प्रयत्न करत होती. रिया स्वतची समजूत घालायची की नाही आपल्याला खुप खंबीर राहव लागणार आहे. काहीतरी ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे; थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. कोणतीही गोष्ट लगेच, आपल्याला हवी तशी होणारी असती तर जगण्याला काय अर्थ ऊरला असता. मला या सगळ्या गोष्टींतून काहीतरी शिकता यायला हवं. या परिस्थीतीला किंवा आपल्या माणसांना दोष न देता मला या परिस्थितीचा स्विकार करून मगच त्यातून मार्ग काढायला हवा.

रियाच मन रियाला सांगत असतं की ती आता वेदला सोडून जाॅबवर पूर्णपणे लक्ष नाही देऊ शकणार. मग ठीक आहे आपण जाॅब सोडूया...असही जाॅब कशासाठी करणार आहोत पैशासाठी, स्वतला स्वावलंबी बनवण्यासाठीच ना??...मग पैसा पुन्हा मिळवू शकतो पण वेदच बालपण, त्याच्यावर केले जाणारे बालसंस्कार पुन्हा करता येणार नाहीत. राहता-राहिला स्वतला स्वावलंबी बनवण्याचा प्रश्न तर आपण करू काहीतरी. नवीन जाॅब मिळवू अथवा आणखी काहीतरी करू....असा विचार करून रिया कंपनीला रिझाइन लेटर पाठवून देते.

हे सर्व खूप कठिण होत रियासाठी. तरीही ती निर्णय घेते. महत्त्वाच म्हणजे घरातील कोणाचीही साथ नव्हती तिला. ती पूर्णपणे घरातील जबाबदारी स्विकारते. जाॅबचा विषय  डोक्यातून काढून टाकते. रिया वेदप्रती आणि घराप्रती पूर्णपणे स्वतला झोकून देते....

रिया पुर्णपणे सगळ्या जबाबदार्‍या पेलून वेदवरती चांगले संस्कार करत होती....पण म्हणतात ना आयुष्य एवढं सोप नसत. रिया घरातल्या सर्वांच करतच होती तरीही सासू-सासरे तिला टोकायचेच छोट्या-छोट्या गोष्टींवरून. राघवही तिला बोलायचाच, तिच्या चूका काढायचा. सासू-सासर्‍यांकडे दूर्लक्ष करायचीही रिया परंतु निदान राघवने तरी तिला समजून घ्याव अस तिला वाटायच. 

आता तर वेद चांगला पाच वर्षांचा झाला होता. या काळात खूप सहन केल रियाने. तिच आर्थिक स्वातंञ तर जाॅब सोडल्यापासून गेलच होत पण बाकी घरातले निर्णयही राघवच घेत होता. एखादवेळी रियाने ऊलट प्रश्न केलाच तर तुला दिवसभर काय काम असते म्हणून राघव रियाचा अपमान करायचा. रियाला खूप खुप मनस्ताप व्हायचा "तु दिवसभर काय करतेस" या वाक्याचा. ज्या नवर्‍यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी, मुलासाठी मी माझ करिअर सोडल, घरी बसले, त्याने मला हा-असा प्रश्न विचारावा..,या गोष्टीने तीला खूप वाईट वाटायच...आतून तुटल्यासारख व्हायचं तिला. खूप रडून घ्यायची रिया....पण पर्याय काहीच दिसायचा नाही...कधी-कधी तर "हे घर माझ आहे, तुला जमत नसेल, इथे पटवून घ्यायच तर तू जावू शकतेस" अशा भाषेत बोलायचा राघव.

राघवच्या अशा वागण्याने रियाला कळून चुकल की स्वावलंबी होण किती महत्त्वाच आहे. कोणत्याच स्ञीला स्वतच घर, संसार, मुलं सोडून जाॅब करण्याची हौस नसते. एव्हाना जरी ती घराबाहेर पडलीच तरी तिच संपूर्ण लक्ष तिच्या घराकडे असतं. परिस्थितीनुसार, गरजेला, अडचणीला अथवा स्वावलंबनासाठी ती घराबाहेर पडत असते.

त्यातलीच एक रिया.... पुन्हा एकदा काहीतरी करायला हव, घरातून बाहेर पडायला हवं असे विचार रियाला करणं भाग पडत होत. असही वेद आता शाळेत जावू लागला होता. आयुष्याला वेगळ वळण द्यायची वेळ आता आली आहे; अस मनोमन ठरवून रिया पुन्हा एकदा स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करू लागली.

रियाला कळत होत की, पुन्हा सुरूवात करणे अवघड होते. जाॅबमध्ये गॅप पडल्यामुळे जाॅब मिळण कठीण होत आणि मिळालाच तरी हवा तसा मिळणार नव्हता. स्वतच अस काहीतरी कराव तर ते काय कराव? कुठून सुरूवात करावी? पण काहीतरी करायला हव होत. रियाला सुरूवातीपासून ज्वेलरी डिझाईन मध्ये रस होता. तशी ती आॅलराऊंडर होती. रांगोळी काढण्यापासून ते ज्वेलरी डिझाईनपर्यंत सगळ्यात ती निपूण होती. पण सर्वांत जास्त तिला आवडत होत ते ज्वेलरी डिझाईन करणे...ती खुप रीसर्च करते.  तेव्हा तीला त्यातून समजते की आपल्याला जी गोष्ट आवडते त्यातच पुढे करिअर केल्यास यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

ज्वेलरी डिझाईन च्या तिच्या पॅशनला ती नवीन वळण द्यायच ठरवते. त्यातच पुढे व्यवसाय करून स्वतला स्वावलंबी बनवण्याच ठरवते. रियाला खूप बर वाटत होत की निदान तिला काय करायच ते तरी नक्की झाल होत. आता प्रश्न हाच होता की सुरूवात कुठून आणि कशी करायची .....क्रमश:

चला तर मग पाहूया पुढच्या भागात....आईपण आणि गृहिणीपद स्विकारलेली रिया कशाप्रकारे  आत्मनिर्भर ऊद्योजिका बनते. कदाचित तिचा हा प्रवास आपल्या आजुबाजूच्या, आपल्यातीलच काही करू पाहणार्‍या गृहिणींना ऊपयोगी पडू शकतो....रिया घर आणि आर्थिकदृृृृष्ट्या स्वावलंबन या दोन्हीमध्ये कशाप्रकारे बॅलन्स साधते आणि आपल यशाच शिखर गाठते हा बॅलन्सही आपल्याला वेगवेगळ्या क्षेञांत खूप ऊपयोगी पडणारा आहे.

पुढील भाग वाचण्यासाठी माझे रंग आयुष्याचे हेे फेसबुक पेज लााईक कराा....thank you..!!

Post a comment

0 Comments