आपलचं ज्ञान आपल्यालाच सांगितल जात तेव्हा....!

गोष्ट वारंवार घडणारी....आणि बर्‍याच जणांच्या  बाबतीत घडलेली. गौरी च्या बाबतीत तर कहरच केला या गोष्टीने. गोरीच्याच काही गोष्टी गौरीलाच ऊपदेश करून सांगितल्या जातात तेव्हा गौरी स्वत:चे काही अनुभव आपल्याला सांगतेय.

गौरी "थोडक्यात सांगायच झाल तर जेव्हा आपलच ज्ञान आपल्याला सांगितल जात; तेही आपल्याला काहीच माहीत नाही अस समजून तेव्हा आपसूकच मला राग येतो आणि त्या सांगणार्‍या माणसाची कीवही येते. 

ठीक आहे ना तुमच ज्ञान ज्याला त्या गोष्टीतल माही नाही अशा एखाद्या अज्ञान व्यक्तीला सांगा ना ज्याने तुम्हाला  ते सांगितलय त्यालाच परत कशाला सांगताय? स्वत: किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी की समोरच्याला काहीच माहीत नाही हे दाखवण्यासाठी? तस पाहील तर हे ज्ञान म्हणजे खूप काही मोठ वैगेरे नाही पण थोडक्यात रोजच्या आयुष्यात येणारे छोटे-मोठे अनुभव...!"

तर मागू पाहुया गौरीचे अनुभव गौरीच्याच शब्दात...

पहिला अनुभव : मी आणि माझा दोन वर्षांचा मुलगा आम्ही दोघेजण संध्याकाळी सोसायटीच्या गार्डन मध्ये खेळत होतो. अचानक माझी शेजारीण मैञिण रिमा हीचा मुलगा पडून त्याच्या कपाळाला भल मोठ टेंगूळ आणि लागलेल्या जागेला सूज येते. म्हणून मी तिला खोबरेल तेलात हळद कडवून सूज आलेल्या ठिकाणी लाव म्हटल व तिनेही तो ऊपाय केला; कारण दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तीनेच सांगितल होत खूप चांगला फरक पडला तू सांगितलेल्या घरगुती ऊपायाचा. बर ईथपर्यंत सगळ ठीक होत खरी गंम्मत तेव्हा वाटली मला जेव्हा एक सहा महिन्याने सेम गोष्ट माझ्या मुलाबाबत घडते की तो पडून त्याला गुडघ्याला लागत आणि हे रिमाला समजल असता ती मला फोन करून तेल व हळदीचा ऊपाय सांगते व वरून नक्की कर हा बर वाटल तुझ्या मुलाला अस सांंगते तेव्हा माञ मला आश्चर्यच वाटत की माझाच ऊपाय मलाच....?


दुसरा अनुभव : हा तर कायमच येत असतो कारण हा घरातलाच आहे ना. माझ्या सासुबाईंना माझ नवीन लग्न झाल तेव्हा मीच सांगितल होत की कणीक मळल्यानंतर ती  झाकून ठेवावी व थोड्यावेळाने चपात्या केल्या असता त्या कणेकेच्या चपात्या छान होतात....कारण माझ्या अगोदर सासूबाई काम ऊरकण्याच्या नादात कणीक मळली की लगेच लाटायला सुरूवात.....पण आता मी जेव्हा गावी जाते तेव्हा त्याच मला कणीक मळायला घेतेय नाही तोपर्यंत लगेच झाकून ठेवून थोड्यावेळाने लाटण्याची आॅर्डर देतात आणि मी बिचारी पुन्हा एकदा मला सगळ माहीत असूनही "हो मीच सांगितलय तुम्हाला" अस न म्हणताच गप्प ऐकून घेते....


तिसरा अनुभव : सुट्टीत आम्ही सर्वजण बहिणी माहेरी जमतो. झाल अस की मी माझ्या मुलाला शिरा चारत होते आणि तो खात नव्हता. माझी चूलत बहिण जवळच होती. ती  मला म्हणते कशी अग डोळे मिटून घास घेतलेला हात पुढ करून म्हण; माझ्या हातातला घास कोण चोर खाणार? मग बरोबर तो खाईल...काय करू या माझ्या बहिणीला कारण मागच्या वर्षी असच सुट्टीत आम्ही जमलेलो तेव्हा मी हीच आईडिया वापरून माझ्या मुलाला चारत होते आणि तीने मला काॅंम्पिमेंटही दिली होती, की भारी आईडिया आहे म्हणून आणि आज तीच बहिण मला ती वालीच आईडिया सांगतेय.... माझ मनच मला अशा लोकांच अवघड आहे अस म्हणून शांत करतं...


चौथा अनुभव : यापासून तर माझा नवराही अपवाद नसतो. तोदेखील बर्‍याचवेळा माझीच आईडिया मला देत असतो. मग ती कपड्याला ईस्ञी करताना असो वा बेडवरच बेडसीट नीट लावताना असो....तर कधी मुलाचे हात धुणे असो वा त्याला औषध देण असो.
गोष्टी खूप छोट्या आहेत. पण ईरिटेट होत अशा गोष्टींमुळ. 

पाचवा अनुभव: आता साडी आणि स्ञी यांच नात तर आपणाला चांगलच माहित आहे.....तर झाल अस की माझ्या मैञिणीला माझी एक साडी खूप आवडली....तशी साडी साधीच होती पण डिझाईन आणि रंग खूप सुंदर होता...बरर मग पुढे... तर ऐका. 

 पाहताक्षणी आवडलेल्या साडीचा मागोवा घेत तीने ती साडी कोणत्या शाॅप मधून आणली पासून किंमतीपर्यंत सगळ विचारून घेतल. फक्त मला ती साडी छान दिसतेय अस तेवढी म्हटली नाही....बिचारी मी!!

एक वर्ष गेल असेल; मॅडम दिवाळीला आल्या की खरेदी करून. मग काय साडी घालून मिरवायला लागल्या माझ्यासमोरून....कारण नवीन घातलेली साडी नवर्‍याला दाखवण्यापेक्षाही शेजारणीसमोर मिरवण्यातच खरी गंमत असते बरोबर ना? बर मिही तिला छान आहे साडी वैगेरे म्हटल....तर मॅडम लगेच अग खूप छान-छान साड्या आहेत त्या शाॅपमध्ये....तुला खरेदी करायची असेल तर सांग पत्ता पाठवते तुला whatsup वरती...मी ठीक आहे म्हटलं पाठव.

मोबाईल ब्लींक झाला तस पाहते तर तो पत्ता तोच त्या शाॅप चा....मी कपाळावर हात  मारणार तोच ती माझ्याकडे पाहत असलेल लक्षात येऊन हात तसाच बाजूला घेत पुढे आलेली केसांची बट कानामागे सारली...आणि पुन्हा एकदा स्वतला शांत करत घर गाठलं....!!

एकतर आपल्याकडूनच समजलेल्या गोष्टी आपल्यालाच ऊपदेश देवून तर कधी ऊपहासात्मक तर कधी स्वत: किती हुशार आहे हे दाखवून सांगितल्या जातात.....तस बघायला गेलो तर त्यात फायदा किंवा तोटा असा काहीच नसतो पण एका ठराविक मर्यादेनंतर वैताग येतो या सार्‍या ज्ञान वाटणार्‍यांचा. तुम्हालाही असे अनुभव नक्कीच आले असणार याबद्दल माझी खाञी आहे...तर असेच काही अंशी हास्यास्पद तर काहीवेळा ईरिटेट करणारे तुमचे अनुभव कमेंन्ट करून नक्की कळवा.......धन्यवाद !

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

रंग आयुष्याचे 

  या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा...

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.


Post a comment

0 Comments