हो_संवाद_व्हायलाच_हवा...!!


सुरेशराव बिझनेसमन....मानव आणि राघव ही त्यांची मुल.....राघव मस्त वेल सेट्लड झालेला....गव्हर्मेंट जाॅब होता त्याला...तेही क्लास वन पोस्ट....मानव ईंजिनीअरिंगच्या लास्ट ईअरला होता आणि त्याचही एका एमएनसी कंपनीत कॅंम्पस सिलेक्शन झाल होत...त्यामुळे जाॅब कन्फर्म होता....मीनाक्षी त्यांची मुलगी बीएचएमएसच्या दुसर्‍या वर्षाला होती....एकुणच घरात सगळे एज्युकेटेड होते.....आणि पुढचे सगळे मार्ग ठरलेले, सेटल होते....


एकच गोष्ट खुप ह्द्यद्रावक घडली ती म्हणजे सुरेशरावांची पत्नी; एका अपघातात देवाघरी गेली....ऐन भरभराटीच्या आणि मुल रांकेला लागायच्या दिवसात राघव, मानव आणि मीनाक्षी पोरके झाले....आणि घरातील पूर्ण वातावरणच बदलून गेल....हसतखेळत कुटूंब खट्टू झाल...अशा काळात एकमेकांंचा तर सोडाच पण निदान सुरेशरावांचा तरी आधार बनायच सोडून, एकमेकांपासून जास्तच दूर झालं......


सर्वांत जास्त आतुन तुटले ते सुरेशराव....एवढे वर्ष साथ दिलेली त्यांची साथीदार त्यांना मधेच सोडून गेली......दोघांनी मिळून मुलांची लग्न करून त्यांचे थाटात चाललेले संसार पाहयचे अशी स्वप्न पाहिली होती......पण आता सगळीच स्वप्न स्वप्न  राहिली होती....आयुष्यभर दोघांनी मिळून मुलांच्या शिक्षणासाठी खुप कष्ट केल होत आणि आता त्या  कष्टाच  फळ मिळायच्या वेळी हे अस अघटित घडल होत...
याचाच परिणाम की काय सुरेशराव एकटे-एकटे राहू लागले.......दुख विसरण्यासाठी स्वत: ला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेऊ लागले. 

ईकडे मुलांचही असच झाल होत....आई गेलेल दुख त्यांनाही सहन होत नव्हत......ती तिघदेखील दुख विसरण्यासाठी स्वत:चे मिञ, मैञिणी, सहकारी यांच्याबरोबर बिझी राहू लागले.....घरी आल की आईची आठवण येते, घर खायला ऊठत अशी परिस्थिती झालेली सर्वांचीच.....सुरेशरावही मुलांना काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.....पण यामुळे घरातील घरपण हरवलेल....कोणीच कोणाला आपल्याला येणारे प्राॅब्लेम सांगत नव्हते...एकमेकांशी बोलल्यावर दुख हलक होत म्हणतात पण या सर्वांना अस वाटत होत की आपण एकमेकांशी बोलल्यावर आईच्या आठवणी बाहेर येतील....आणि सर्वजण जास्तच दुखी होईल.....


या घरातील वातावरणामुळेच की काय सुरेशराव खुप आजारी पडतात.....कारण पत्नीच्या मृत्युबरोबरच त्यांच्या मनात कुठेतरी वयात आलेल्या आणि तरूण मुलांची काळजीही होतीच....ते आजारी पडल्याच त्यांच्या बहिणीला सुधाताईंना समजताच त्या लागलीच स्वत:च्या संसारातून वेळ काढून सुरेशरावांना भेटायला येतात......आपल्या बहिणीला आलेल पाहून सुरेशरावांना बर वाटत...आपली भावजय नसल्याने सुधाताई आल्या बरोबर,घरातील सगळी सुञे आपल्या हातात घेतात.....

कोणाला काय हव नको, प्रत्येकाचा चहा, नाश्ता, जेवण, सुरेशरावांची औषधे, पथ्ये.....सगळ त्या बघतात नाही म्हणायला घरात नोकर-चाकर होतेच...फक्त आस्थेने काळजी घेणारच कोणी नव्हत....


एक-दोन दिवसातच घरातील वातावरण सुधाताईंच्या लक्षात येत. सगळेजण कशे आपल्याच विश्वात असतात ते.....नाश्ता-जेवणाच्या प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या तेही स्वत:च्याच बेडरूममध्ये....एकञ नाहीच. यावरूनच सुधाताईंना सुरेशरावांच्या आजारीपणाच कारण समजत....पण आपण हे बदलूया...घरात संवाद घडवून आणूयात, या विश्वासानेच सुधाताई अगोदर स्वत: घरातील प्रत्येकाशी संवाद साधायचा ठरवतात.


पहिल्यांदा जाॅब करत असलेल्या राघवशी बोलतात व त्याला सांगतात की राघव तु घरात मोठा आहेस, तुच असा अबोला ठेवून वागलास तर कस होणार? तु तुझ्या लहान भावंडांचा आधार बनायला हव अशा दुखाच्यावेळी ना की मिञ, सहकारी यांच्यात दंग....राघवलाही पटत ते व एवढे दिवस मनात ठेवलेल दुख तो आत्याच्या जवळ रडून मोकळ करतो. 

दुसर्‍या दिवशी राघव मानवशी संवाद साधून त्याचही दुख मोकळ होण्यास मदत करतो...इकडे आत्या मानसीला बोलतात, मानसी घरात तुच एकटी मुलगी आहेस, पण आता तुला सर्वांची आई बनायच आहे....आणि एक लक्षात ठेव घरात संवाद घडवून आणायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतेय...हो मान्य आहे तुम्ही सर्वजण खुप बिझी असतात...पण तुमच्यात बोलण व्हायला हव, एकमेकांची मत, विचार ऐकून घ्यायला हवेत तुम्ही... एका कुटूंबाला याच गोष्टी बांधून ठेवतात....मानसीला खुप छान वाटत आणि पटतही आत्याच बोलण.


हळूहळू घरातील वातावरण बदलू लागत....सगळेजण एकञ नाश्ता करू लागतात.....मानसी आवर्जून सर्वांना एकञ जेवण करण्यासाठी हाका मारून बोलवत असते...आणि बाकीचेही आलो, पाच मिनीटांत आलो असा रिस्पाॅन्स देत असतात....आपसुकच घरात संवाद घडायला सुरूवात होते....जेवताना, चहा घेताना एकमेकांची चेष्टा-मस्करी चालते....त्यात सुधाताई असतातच हास्याचे फवारे ऊडवायला.....आता राघव, मानव व मानसी मिळून सुरेशरावांची औषधे, पथ्ये, त्यांची डाॅक्टरांकडे व्हिझीट इ. काळजी घेऊ लागतात.
शांत आणि दुखी घर पुन्हा एकदा हसत-खेळत झालेल पाहून जणू सुरेशरावांच आजारपण पळून जात....ते मनोमन आपली बहिण सुधाचे आभार मानतात. सुधाताईही मी एका बहिणीच कर्तव्य पार पडल म्हणून भावाला स्वत:ची काळजी घेण्यास बजावतात.

कुटूंबात संवाद असण खुप गरजेच आहे.....पैसा तर येत-जात असतो, सुख-दुखही येतात तशीच जातात पण माणुस-माणसासाठी असेेल तर सर्वच बाबी सोप्या बनून जातात बरोबर ना?


©माधुरी सोनवलकर-पाटील( माधुरी दिपक पाटील )

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

फोटो_साभार_

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

 "रंग आयुष्याचे" https://www.facebook.com/hernewinning/ या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments