इथे_फक्त_तुच_तुझी....!


निशा गडबडीतच होती सकाळपासून....हे आवरू की ते आवरू...ह्याच्या हातात काही नेऊन देऊ की त्याच्या हातात...तोवर तिचा नवरा राम तिला आवाज देतो "निशा झाल का? आवर ग...दे पटकन तो डबा.

निशा धावतत "हो हो देतेय..." म्हणतच डबा आणि पाण्याची बाॅटल घेऊन येते. राम "रूमाल कोण देणार? तुला सगळ कस सांगावच लागत ग...एकतर ऊशीर झालाय.."

निशा काहीच मनावर न घेता सरळसरळ कपाटातून रूमाल काढून देते. "अहो ऐका ना, येताना माझी पिको-फाॅलची साडी तेवढी आणा..आठवणीने."

"बघू...लक्षात राहील, वेळ मिळाला तर आणेन."

"पण मला ती लागणार आहे ऊद्या...शेजारी डोहाळजेवणाचा कार्यक्रम आहे."

"दुसरी कुठलीतरी घाल मग....बाकी साड्या नाहित का?"

"बरर..." एवढच म्हणून निशा गप्प बसते...तिलाही सवय झाली होती या सगळ्याची. तिला ज्यावेळी जी वस्तू लागत असायची; ती त्यावेळी कधीच नाही मिळायची. कायम वेळ निघून गेल्यावर...एकतर तिची सगळी कामे रामवरती अवलंबून असायची....त्यामुळे राम ती करेपर्यंत वाट बघत बसणे अथवा घरी असेल त्या गोष्टींवर काम चालवणे अस असायच...निशा खुपवेळा म्हणायची की माझी कामे मी करते ऊगीच तुम्ही कशाला एवढा लोड घेताय पण नाही रामला तेही पटायच नाही. त्याला ती स्वतच करायची असायची...कदाचित आपली बायको आपल्यावर डिपेंन्ड असावी अस त्याच मत असाव अथवा बायको घराबाहेर पडली तर आपले जास्त पैसे खर्च होतील असही असेल...त्यालाच माहीत. पण निशाच्या हातात माञ कायमच निराशा येई.

राम जातो निघून आॅफिसला...निशाही त्याला बाय करून मागे फिरते...घरभर पसाराच पसारा असतो. एक मुलगा आदित्य आणि मुलगी रेवा असते दोघांना. मुलगा दहावीत आणि मुलगी आठवीत. ती दोघेही सकाळीच क्लासला घराबाहेर पडलेली. अकरा वाजता माघारी यायचे आणि परत शाळेसाठी कसबस फास्ट आवरून निघायचे ते डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजताच घरी. घरात सासु-सासरेही होते...पण तेही थकलेले. त्यांच औषधपाणी, पथ्ये, जेवणाच्या वेळा हे वेगळच असायच. सासु-सासरे दोघेही रिटायॅर्ड शिक्षक होते...आयुष्यभर नोकरी केलेली त्यामुळे तेही घरात बसत नव्हते. काहीना काही कारण काढून रीक्षाने प्रवास करून घरातून काढता पाय घेत. भटकुन दुपारी जेवायला येत व जेवण करून झोप काढत...चार वाजता ऊठल की परत हास्यक्लब, कुठे कुणाचा वाढदिवस असा टाईमपास होताच त्यांच्याकडे.

निशा एकटी माञ दिवसराञ घरात एकटी....सगळ्यांच्या आल्या-गेल्याच्या वेळा सांभाळत, पसारा आवरत, चहा-नाश्ता बनवत बसायची....साधा आई-वडीलांचा फोन आला तरी तिला ऊसंत नसायची फोन रिसीव्ह करायची अथवा रिटर्न काॅल करायची....आईवडीलही आपली मुलगी संसारात पार बुडालेय म्हणून समजून घ्यायचे. माञ सासरी,
घरातल्या बाकी कोणाचा काॅल आला आणि निशाने ऊचलायला उशीर लावला अथवा थोड्यावेळाने केला तरी तिला कितीतरी प्रश्नांची ऊत्तरे द्यावी लागायची. एवढा वेळ का लागला फोन ऊचलायला? काय करत होतीस? मी कितीवेळ झालो वाट पाहतोय फोनची वैगेरे. माञ निशालाही या गोष्टींची सवय झाली होती. तिला मुळात हेच लक्षात येत नव्हत की तिला स्वतंञ अस नाहीच घरात. ती स्वतसाठी जगतच नाही. ती जगतेय घरातल्या बाकी लोकांसाठी...ज्यांनी की तिला गृहीत धरलं आहे....आणि कुठे ना कुठे यालाही जबाबदार निशाच आहे कारण तीने समोरच्याला तशी परवानगी दिली आहे गृहीत धरण्याची.

आज निशाला सकाळपासूनच जरा कणकणी आल्याच जाणवत होत. ती रामला तस सांगणार होती पण राम घाईतच होता सकाळी....ऊशीर झालाय अस म्हणत होता. त्यामूळे नाही सांगितल त्यालाही.

दुपारचे साडेबारा वाजले होते तिला सगळ आवरायला...सकाळपासून फक्त एका चहाच्या कपावर होती ती. अंगात तापही होता तिच्या. मुल शाळेत गेलेली पण त्यांनी क्लासवरून आल्यावर बदलेले कपडे, बुक्स, नोटबुकस् तसेच पडले होते...कशीबशी तेपण आवरून घेते निशा....
तोपर्यंत सासु-सासरे पारायण संपवून येतात; फ्रेश होतात व तिला जेवायला वाढ अस म्हणतात. निशा सगळ देते जेवायला त्यांना. त्या दोघा-नवरा बायकोच्या गप्पा चालू असतात...अस झाल ना-तस व्हायला हव होत पारायणात...निशा तिथेच ऊभी होती; त्यांना काय हव नको ते पाहयला....पण ते साधी दखलही घेत नाहीत; की निशा तु जेवलीस का? जेव आमच्याबरोबर, अस काहीच नाही.
निशालाच आॅकवर्ड फील होत, ती जाते बेडरूममध्ये...तिला तिथे उभाही राहवत नव्हत एवढा वीकनेसपणा जाणवत होता तरीही आई-बाबांना काही हव नको ते पाहयला थांबली होती ती...आणि ती दोघ नवरा-बायको निवांत गप्पा मारत होते....मी आणि राम माञ बसलोय आमची कर्तव्ये करत..असा विचार मनात येउन निशाचे डोळे गच्च भरतात पाण्याने.

खुप रडून घेते निशा...नवीन लग्न होऊन सासरी आली नी जणू जबाबदार्‍या, कर्तव्ये यांना जुंपल गेल तिला. राम आणि निशाच लग्न झाल होत तेव्हा राम दुसर्‍या गावी होता नोकरीला पण तो नीशाला बरोबर घेउन गेला नाही....आणि सासु-सासरेही म्हटले नाहीत की तुमचे नव्याचे-गुलाबी दिवस आहेत...तुम्ही एकञ रहा. नाही म्हणायला रामचं निशावर खुप प्रेम पण पहिली प्रायोरीटी कायमच आई-वडीलांना. आपल्या आई-वडीलांना खुपच एकट वाटेल, आपण दोघेही दुसरीकडे राहील्यावर म्हणून त्याने निशाला स्वतच्या आईवडीलांजवळच ठेवले...ऊलट निशा तिथे राहिल तर आपलही सारख येण-जाण होईल घरी...आई-बाबांना भेटता येईल, त्यांना बरं वाटल तेवढच असा विचार होता रामचा निशाला घरी ठेवण्यामागे....म्हणजे सुरूवातीचे नवे दिवसही निशाचे सासु-सासर्‍यांच्या सेवेतच गेले ते आजतागायत मुल मोठी झाली तरी तेच...निशाला आज ते सगळे नवे दिवस आठवत होते...सासु-सासरे तेव्हा रिटायर्ड नव्हते...ते दोघे दिवसभर नोकरीत माञ निशा दिवसभर एकटीच घरी. नवीनच ती...घर खायला ऊठे तिला...संध्याकाळी दोघे आले तरी त्यांच्याच नोकरी ठिकाणच्या गप्पा...राम येई आठ-पंधरा दिवसांतून दोन दिवस सुट्टीच्यावेळी...पण ते दोन दिवस भुररर्कन ऊडून जात आणि परत तिला ते घर खायला ऊठे. मनात असंख्य विचार, नुसते विचार....सासु-सासरे एवढे सुशिक्षीत तेही कधी म्हटले नाहीत काहीतरी कर, क्लास लाव. तसही निशाने क्लास लावला तर मग यांची सेवा कोण करणार...

लग्न होऊन दोन वर्षे अशीच गेली निशाची....आठ-पंधरा दिवस राम येण्याची वाट पाहण्यात....रामने स्वतची ट्रन्सफर करून घेतली आता...पण तोपर्यंत निशा आई होणार होती...म्हणजे आता दोघे जवळ असूनही त्यांना बाहेर फिरता येणार नव्हत. आणखी एक जबाबदारी त्यांच्या डोक्यावर पडणार होती....निशाच्या डोळ्यांसमोरून एक-एक गोष्टी सरकत होत्या. तिच मन खुप हळहळत होत; ज्या-त्या गोष्टी त्या-त्या वेळीच करायला हव्यात आता ते नवीन दिवस थोडीना माघारी येणार आहेत....राम कायमच स्वतच्या अंगावर जबाबदार्‍या घेत राहिला आणि मलाही त्यात ओढत राहिला....गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी...असा विचार करतच न जेवताच तिची झोप लागली.

चार वाजता दचकूनच उठली निशा "बापरे कितीवेळ झोपलो होतो आपण?आई-बाबा(सासु-सासरे) काय म्हणतील? आवरायला हव पटपट...चहाची वाट पाहत असतील ते दोघ..." म्हणतच निशा फ्रेश होऊन किचनकडे वळते. चहा ठेवते व हाॅलमध्ये, इकडेतिकडे पाहते पण तिला नेहमीचीच शांतता आणि त्यात ती एकटीच दिसते. आईंना काॅल करते तर त्या बोलतात आम्ही हास्यक्लबला आलोय...इकडेच चहा घेऊ म्हणून फोन ठेऊन देतात. निशा च्या मनातील विचारांचे वादळ पुन्हा सुरू होते...म्हणजे माझ्या चहाला काहीच किंमत नाही. मीच ऊगीच दचकते, गडबड करते, स्वतचा विचार करत नाही. कारण रामदेखील एखादं दिवस उशीर झाला मला ऊठायला...डबा बनवायला तर लगेच म्हणतो राहूदे तुझ कधी व्हायच मी हाॅटेलमध्ये खाईन...मुलदेखील त्यांच्या आवडीची भाजी नसेल तर भरून ठेवलेला टिफीन इथेच ठेवून जातात आणि आम्ही खाऊ कॅंन्टिनमध्ये म्हणतात.

निशा हातात चहाचा कप घेउन बाल्कनीत बसते आणि स्वतशीच ...."म्हणजे जर सर्वांची सोय होत असेल कुठेही तर मग मी एवढा आटापिटा कशासाठी करतेय...एखाद्यादिवशी मी ऊशीरा ऊठल तर चालेल ना? खरच चालेल का पण...मुल, राम, आई-बाबा काय म्हणतील? मला आळशी तर म्हणणार नाहीत ना? अस करून मी माझी जबाबदारी तर नाही ना टाळत? स्वतचा विचार करून मी स्वार्थी तर नाही ना ठरणार?"

निशा आता पुरती गोंधळली होती पण निदान ऊशीरा का होईना तिच्यामनात स्वतचा विचार तरी डोकावला होता...मुल येतातच तोवर शाळेतून. त्यांच्या आवाजाने निशा पुन्हा भानावर येते आणि स्वतचा विचार पुन्हा मागे पडुन तिच्यातील आईपण धाव घेतं मुलांकडे....

"काय मग आजचा दिवस कसा गेला...? खायला काय बनवू दे तुम्हाला...." निशा

आदित्य "ठीक-ठाकच गेला गं...तुला सांगून काय बदलणार आहे का? काहीतरीच विचारतेस"

रेवा "काय बनवणार आहेस तु? ते तसले जाड पराठे बनवणार असशील तर प्लीज नको हा...मम्मी"

आदी आणि रेवाची ऊत्तर ऐकून निशाला मनातुन वाईट वाटत पण तिच्या समोर शाळेतुन कंटाळून आलेली तिची मुल असतात. शेवटी आईच ती.

सकाळीच राम बोललेला "तुला सगळच सांगाव लागत का?" आदी "तुला सांगुन काय उपयोग" रेवा "तसले जाड पराठे" निशाला आठवत सगळं... सासु-सासर्‍यांच तर विश्वच वेगळ होत...ते तिला कधी ञास देत नव्हते पण स्वतंञही देत नव्हते. फक्त कामापुरते बोलायचे तिच्याशी.

निशाला खूप ऊशीरा ऊमगू लागल्या सर्व गोष्टी पण आपण स्ञिया कशा असतो ना घरातल्या कोणी काही बोललं तरी वाईट वाटून घ्यायच नी ते मनाच्या एका कोपर्‍यात बंद करून टाकायच...आणि व्हायच पुन्हा तयार सर्वांच्या सेवेला तेही हसत.

मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा लागते त्यांच्या नाश्त्याच्या तयारीला. सकाळपासून ऊपाशीच होती, बारीक ताप येऊन गेला होता, कणकणी होती अंगात हेही ती विसरली होती ती मुलांचे चेहरे पाहून...मुलदेखील कधी विचारत नव्हती "तु जेवलीस का? तुझी तब्येत ठीक आहे ना?" वैगेरे. तसही सर्वांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांना कुठे वेळ होता निशाची काळजी करायला...इथे फक्त निशाच होती मोकळी सगळ्यांच करायला.

निशासाठी चालू होता रोजचा दिसव सारखाच...मन एवढ घट्ट झाल होत की आता कोणाकडुनच काही अपेक्षा राहिली नव्हती....अशातच  एकदिवस तिची एक मैञीण त्यांच्याच सोसायटीत रहायला येते....तिच्या मिस्टरांची ट्रन्सफर झाली होती इकडे.....नंदिनी तीच नाव. नंदिनी आल्यादिवशीच निशाला भोटायला येते आणि कडकडून मिठी मारते. निशाची बालमैञीणच नव्हे तर बेस्टफ्रेंडदेखील होती नंदिनी.....निशालाही खुप भारी वाटत कीतीदिवसांतुन कोणीतरी जवळच भेटल होत आणि आता शेजारीपण म्हणजे रोज भेटू शकत होतो....

निशाला भेटल्या-भेटल्याच आणि तिच्या घरी गेल्यावरती नंदिनीला निशाच तिच्या घरात काय स्थान आहे हे समजत...नंदिनीला खुप वाईट वाटत. ती निशाला लगेच काही विचारत नाही पण मनातून ठरवते आपली अगोदरची निशा परत आणायची. निशाला या सगळ्या घुसमटीतून बाहेर काढायच.

प्रिय वाचकहो तुम्ही देत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत. त्यामूळे लाईक, कमेंन्ट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.....चला तर मग पाहूयात पुढच्या भागात निशाच्या मनात स्वतच्या अस्तित्त्वाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांना नंदिनी कशी पुढे नेतेय? निशा खरच स्वतची जागा घरात दाखवून देतेय का? आणि दिलीच तर ती कशी? ....पुढच्या भागाचे नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या फेसबुक पेजलाा लाईक करा म्हणजे पुढचा भाग तुम्हाला लगेच वाचता येईल....धन्यवाद !

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

 "रंग आयुष्याचे" https://www.facebook.com/hernewinning/या फेसबुक पेजला नक्की लाईक करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments