मी सक्षम आहे... प्रत्येक गोष्ट निभावण्यासाठी


"तुला काही गरज नाही एवढे दिवस आई-वडीलांकडे राहण्याची. त्यांच ते बघून घेतील. " समीर

"अरे पण आत्ता त्यांना गरज आहे माझी. निदान त्यांना थोड चालायला येईपर्यंत तरी मला राहव लागेल तिकडे." समीधा

"ठिक आहे मग रहा कायमचीच तिकडे....परत येऊ नकोस माघारी."

"तुला परिस्थिती समजूनच घ्यायची नसेल तर मी तरी काय करणार....पण मला जाव लागेलच" अस म्हणून समीधा बॅग भरते आणि मुलगा मिहिरला घेऊन घराबाहेर पडते.

समीर आणि समीधा दोघे नवरा-बायको व मिहिर त्यांचा चार वर्षांचा मुलगा.....दोघेही जाॅब करत होते. समीधाला एक बहीण आणि आईवडील होते. बहीण रेश्मा तीचही लग्न झाल होत.....दोन दिवसांपूर्वीच समीधाच्या आईवडीलांचा फार मोठा कार अपघात झाला होता.....वडील आणि आई आय.सी.यु. त होते.....समीधाला तर फार मोठा धक्का बसतो....ती आणि तिची बहीण रेश्मा आईवडीलांना पाहून येतात....खुप मुक्का मार बसला होता आईवडिलांना.....पूर्ववत स्थिती कव्हर व्हायला निदान महिनाभर तरी जाईल आणि खुप काळजी घ्यावी लागेल अस डाॅक्टरांच मत होत.....त्यामुळे समीधाने स्वत माहेरी राहून आईबाबांची काळजी घ्याययच ठरवल होत.... तिची बहीण रेश्माही राहु शकत नव्हती कारण तिच बाळ खुप लहान म्हणजेच सहा महीन्याच होत....आणि तिकडे जाण्याची परवानगी समीधा समिरला मागत होती....पण समीरने परवानगी न दिल्याने समीधा मुलाला घेऊन निघून जाते आईबाबांकडे......कारण ती सगळ सांभाळायला सक्षम आहे हे तिलाही माहित होत.

समीधा आईबाबांच्या घरी येते. आईबाबा बेडवरती झोपून असतात. त्यातूनही ते म्हणतात "समीधा अग कशाला आलीस तू नर्स ठेवता आली असती आमच्यासाठी....तुला कस जमेल हे सगळ? त्यात तुझा जाॅब, छोटा मिहिर...."

"बाबा तुम्ही काळजी करू नकात...मी सक्षम आहे सगळ करण्यासाठी....माझ्या आईवडीलांसाठी आणि माझ्या मुलासाठी देखील." समीधा

"अग पण जावईबापू काय म्हणतील?"

"म्हणू दे काहीही....आजवर मी त्याच्या आईवडीलांची सगळी दुखणी काढली, अजूनही करतेय...आणि मग माझ्या आईबाबांची वेळ आली की लगेच तो नाही म्हटला. असो मला कोणावरही अवलंबून नाही राहयच."

"ठीक आहे समीधा....पण आमची तब्येत बरी झाली की तु लगेच माघारी जाशील?"

"हो हो तुम्ही नकात काळजी करू...समीर न्यायला आला तर जाईन नाहीतर ईथच राहीन."

अस म्हणून समीधा लगेच घरातल्या तयारीला लागते.....रोजचा दिनक्रम चालू होतो....ती एक महिन्याची रजा टाकते.....आईबाबांची औषध, व्यायाम,पथ्ये, वेळेवर नाश्ता, जेवण, मिहिरची आवराआवरी सगळ ती व्यवस्थित करत होती...मधुनमधून डाॅक्टरांकडे आईबाबांना घेऊन चेकअप साठी जाव लागे......जणू ती त्यांची आईच झालेली !

या मधल्या काळात तिने समीरला काॅलही केला नव्हता आणि त्याचा काॅल रिसिव्ह देखील केला  नव्हता.....तिच्या आईबाबांची तब्येत देखील पूर्ववत झालेली. पण समीधा काही सासरी गेली नाही.....एकदिवस समीरच येतो घरी आणि तिला परत आपल्या घरी चलण्यासाठी विनंती करतो....पण समीधा नकार देते....समीरला खरच त्याची चूक समजली होती....कारण त्याच घर समीधामुळेच तर सक्षम होत. समीरची आई आजारी पडली होती. 

आईवडीलांच आजारपण काढण्याची वेळ समीधामुळे समीरवर कधी आलीच नव्हती....त्याची आई बेशुद्ध अवस्थेत सारख समीधाचच नाव घेत होती....हे जेव्हा समीधाला तीचे सासरे फोन करून सांगतात तेव्हाच समीधा  सासरी येते....समीर पुन्हा एकदा तिची माफी मागून, आईसाठी ती लगेच धावून आली म्हणून तिचे आभार व्यक्त करतो....पण मुळातच समीधाला कोणाच्या आभाराची वा माफीची कधा गरजच भासली नव्हती....कारण ती नेहमीच तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम होती.

आज समीधाने पुन्हा एकदा एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून आणि एक पत्नी म्हणून ती पुर्णपणे कशी सक्षम आहे हे दाखवून दिल होत.

प्रिय वाचकहो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंन्ट करून नक्की कळवा. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळेच लिहायला प्रोत्साहन मिळत.....

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments