असेही_असतात_सासरे...!


"तुम्हाला काय करायच ते करा पण मी ती शेती अशीच पाडून नाही ठेवू शकत..." प्रतापराव

"अहो पण पप्पा...विनाकारण त्या शेतीत एवढे पैसे गुंतवण्याची गरज आहे का?" सुधीर

"माझे पैसे, मी काय करायच ते माझ मी ठरवेन...तु मला शिकवू नकोस." अस म्हणून प्रतापराव घरातून बाहेर पडतात.

रमाताईंना या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती...पण लग्न होऊन सहा महिने झालेल्या मानसीला हे सगळ नवीनच होत...प्रतापराव हे मानसीचे सासरे आणि रिटायर्ड आर्मी आॅफिसर होते...तर सुधीर मानसीचा नवरा आय.टी. कंपनीत जाॅॅब करत होता. रमाताई मानसीच्या सासूबाई हाऊसवाईफच होत्या......मानसीला दोन नणंदाही होत्या. त्यांची लग्न होऊन त्याही त्याच शहरात स्थित होत्या. त्यामुळे वरचेवर घरी येण-जाण असायच त्यांच. एकंदरीत प्रतापरावांचा मुलगा आणि मुलीही वेल सेट्लड होत्या. पण घरात कायम किरकीर असायची ती अाण्णांमुळे(प्रतापराव). याला जबाबदार होता त्यांचा हेकेखोर, कडक आणि मुद्दामहून समोरच्याची परीक्षा पाहण्याचा स्वभाव.

सुधीर आणि रमाताईंना या सगळ्याची सवय होतीच....सुधीर तर जन्मापासून पाहत आला होता आपल्या वडीलांना पण शेवटी जन्मदाञे आणि आपलेच दात नी आपलेच ओठ अशी अवस्था झाली होती त्यांंची. पण मानसीशी माञ तिचे सासरे व्यवस्थित बोलायचे...तिने पुढे कोणतातरी कोर्स करावा अशी त्यांची ईच्छा होती....मानसीला तर वाटल आपण खुपच नशीबवान आहोत की लग्नानंतर आपणाला शिकायला मिळत आहे...सुधीर नको म्हणत होता मानसीला पण प्रतापरावांपुढे गप्प बसला...नाहीतरी सुधीरला माहितच होत अशा एका वर्षाच्या कोर्सचा काही फायदा ना तोटा ऊगीच पैसे आणि वेळेचा अपव्यय....मानसीनेही माझा घरात बसून वेळ जात नाही अशी भुणभूण लावली होती मग सुधीर ठीक आहे कर तू कोर्स म्हणून परवानगी देऊन टाकतो....रमाताई काहीच बोलत नाहीत कारण त्यांना आपल्या नवर्‍याचा स्वभाव चांगला माहीत होता...आपला नवरा हे सगळ स्वतची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी म्हणजेच चार-चौघांत आम्ही आमच्या सुनेला शिकायला संधी देतोय, आमची सून किती हूशार आहे हे दाखवण्यासाठी करत आहे हे रमाताई जाणून होत्या.....पण बोलणार कोण? लग्न झाल्यापासून त्या स्वतच्या नवर्‍याच्या कोणत्याच निर्णयाबाहेर गेल्या नव्हत्या....नवरा म्हणेल तीच पूर्व दिशा अस होत त्यांच....

रमाताईंना अस वाटल की ठीक आहे यातूनही काहीतरी सकारात्मक घडेल....निदान आपल्या सूनेला घराबाहेर पडायची परवानगी तरी मिळतेय.....आपल्यासारख आयुष्यभर नवरा घेऊन गेला तरच बाहेर असतरी नाही होणार सूनेच्या बाबतीत...दिवस जातात तसे मानसीच अॅडमिशन घेतल जात फूड प्रोसेसिंगच्या कोर्ससाठी....त्यासाठी लागणारे पैसेही भरतात प्रतापराव. बघता-बघता सहा महिने पूर्ण होतात कोर्सला....पण अचानक एक दिवस मानसी क्लासला जाऊन येते आणि घरी आल्यावर तिच्या ऊलट्या होतात, थोडासा तापही आलेला असतो....सुधीर  डाॅक्टर कडे घेऊन जातो तर समजत की गुडन्यूज आहे....लवकरच घरात एक छोटा पाहूणा येणार आहे.....सुधीर आणि मानसी खूप खुष होतात....हाॅस्पीटलमध्ये असतात तोच रमाताईंचा फोन येतो; मानसी कशी आहे? यावर सुधीर आईला गोड बातमी सांगतो....रमाताईही खूप खुष होतात...कारण असही आता सूधीर आणि मानसीच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेल होत....रमाताई ही आनंदाची बातमी प्रतापरावांना सांगतात तोच प्रतापराव खूप भडकतात.....रमाताईंना काहीच समजत नाही, आपला नवरा खूष व्हायच ठेऊन चिडला का आहे असा प्रश्न त्यांना पडतो....तोवर मानसी आणि सुधीर येतात. त्या दोघांना पाहिल्यावर तर प्रतापराव जास्तच चिडतात....."काय चांगली बातमी दिलीत हा....बर आता त्या कोर्सच काय करताय? नाही पैसे भरल्यात तिकडे म्हणून विचारल.....अजून सहा महीने थांबता आल नाही का तुम्हाला....लगेच आई-बाप बनायची काय गरज होती?"

सुधीर यावर काहीच बोलत नाही.....मानसीला तर रडूच कोसळत...रमाताई मानसीला बेडरूम मध्ये जायला सांगतात...मागोमाग सुधीरलाही पाठवतात....तर लगेच प्रतापराव रमाताईंना "हो हो तुम्ही लाडवून ठेवल आहे लेक आणि सूनेला....पाठी घालताय त्यांना...."

रमाताई काहीच न बोलता किचनमध्ये निघून जातात...इकडे सुधीर मानसीला समजावत असतो "अग तु हा विषय डोक्यातून काढून टाक....तु आण्णांना पुरत ओळखल नाहीस...त्या कोर्सला अॅडमिशन घेण्याअगोदरच मी तुला नको म्हणत होत पण तु ऐकल नाहीस...मग मीही जाऊदे म्हटल...तेवढाच तुझा टाईमपास होईल..."

"अरे सुधीर पण मला काय माहीत अण्णा असे चिडतील....ऊलट ते आजोबा होणार आहेत म्हटल्यावर त्यांंनी किती खूष व्हायला हवं..." मानसी

"अग त्यांना त्या आनंदापेक्षा त्यांची प्रतिष्ठा खूप महत्त्वाची वाटते....तुला समजेल हळुहळू ...चल तु आता मस्त फ्रेश हो...हे सगळ डोक्यातून काढून टाक...कारण आता तु एकटी नाहीस...आपल बाळही आहे...त्याला भूक लागली असेल...ऊठ बघू आवर..."

मानसीही डोळे पुसून फ्रेश होऊन किचनमध्ये निघून जाते.....तिच्या मनात सासर्‍याबद्दल असंख्य प्रश्न असतात पण वरून ती न दाखवता सासुबाईंशी बोलायला सुरूवात करते....रमाताईदेखील तिला अाण्णांकडे लक्ष देऊ नकोस अस सांगतात.

मानसी आता कोर्स मधुनच सोडला होता....डाॅक्टरांनी तिला रेस्ट घ्यायला सांगितल होती...आपण आत्या होणार ही बातमी तिच्या नणंदेला समजल्यावर त्या दोघीही एकेदिवशी मानसीला भेटायला येतात....त्यादिवशी घरी मानसी एकटीच होती...आण्णा कुठेतरी सभेला आणि सुधीर आईला घेऊन दवाखान्यात गेला होता....गेल्या दहा वर्षांपासून रमाताईंना मनक्याचा ञास सुरू झाला होता.

दोघी नणंदा शारदा आणि संगिता घरी आल्यावर मानसीला मस्त शुभेच्छा देतात....तिला थोड चिडवतातही....पण मानसी जरा नाराज आहे हेही त्यांना समजत...याच कारण विचारल असता मानसी परवा झालेला प्रकार सांगते.....तशा दोघी नणंदाही तू लक्ष देऊ नकोस....आईचा पाठीचा मणका खराब होण्यामागेही आण्णाच कारणीभूत असल्याच सांगतात....

पाहूया पुढच्या भागात स्वतच्या बायकोच्या आजाराला प्रतापरावच कसे जबाबदार आहेत....पुढे मानसीबाबतीतही असच घडतय की आणखी काय? पुढच्या भागाचे नोटिफिकेशन येण्यासाठी आणि अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

 "रंग आयुष्याचे"  या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

Post a comment

0 Comments