घरातील_लहान_मुल_ही-सर्वांचीच_जबाबदारी


"आले रे पिल्लू" म्हणतच मानसी तिची दोन वर्षांची मुलगी ईशाला कडेवर ऊचलून घेते. ईशा नुकतीच झोपेतून ऊठलेली असते आणि झोपेतुन ऊठल की तिला समोर मम्मी हवी असते.....मम्मी दिसली नाही की ईशा रडून पूर्ण घर डोक्यावर घ्यायची.....मग मानसीला हातातल काम अर्ध्यावरच सोडाव लागयच नी ईशाला घ्याव लागयच....


घरात मानसीचा नवरा राघव, सासुबाई, सासरे, दीर मानव असे  बाकीचे लोकही होतेच की परंतु ईशाला झोपेतुन ऊठल्याक्षणी आई हवी असायची. पप्पांनकडे पण जायची ती पण मूडवर होत ईशाच्या...त्यामुळे सासुबाई जरा चिडायच्याच ईशावर. कारण तिच्या या हट्टामुळे मानसीला घरात करत असलेल काम अर्धवट सोडाव लागायच. नाही म्हणायला ईशाला शांत करून मानसी परत राहिलेल काम स्वत:च आवरायची. पण सासुबाईंना सगळी काम वेळेत पूर्ण व्हावी अस वाटायच.


ईशा राघवची म्हणजेच तिच्या पप्पांचीही खुप लाडकी होती....पण ईशाला मानसी सारखी समोर दिसायला हवी तरच ती दुसर्‍या कोणाबरोबर खेळायची....मानसीला सोडून एक तासाच्यावर ती राहयची नाही...मग सकाळ-संध्याकाळ स्वयंपाकाच्यावेळी तिचा दंगा ठरलेला असायचा. कारण घरातील सर्व माणसांचा चहा, नाश्ता, जेवण एका तासात तर होऊ शकत नाही ना....तरीही मानसी खुप काळजी घ्यायची ईशाने रडू नये म्हणून.....तिला स्वयंपाक करण्या अगोदर खायला घालीी जेणेकरून तीची कामे आटपेपर्यंत तीने खेळाव...कारण पोट भरलेल असल्यास सहसा मुल रडत नाहीत.....


हेही तितकच खर आहे की मुल पोटभरून खातीलच असही नाही, कधीकधी ती तेवढच थोड पोटाला आधार होईल एवढ खातात...मग थोड्यावेळाने आणखी भूक लागली की परत रडू लागतात.....छोटी ईशाही अशीच कधी पोटभर खायची तर कधी अशीच पोटाला रिकाम ठेवून रडायची...त्यात आजारी वैगेरे पडली की मग बोलायलाच नको....जेवणाकडे ढुंकूनही पाहयची नाही....आणि तिला अशा अवस्थेत पाहून मानसीलाही जेवण जायच नाही.....शेवटी आईच ती!


याबतीत सासुबाई, सासरे, राघव आणि मानव हे ईशाची जबाबदारी कधीच पूर्णपणे घेत नव्हते.....राघव मदत करायचा मानसीला पण मानसी पूर्णत: ईशासाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकत नव्हती. सासुबाईं शेजारी-पाजारी, नातेवाईक यांच्या समोर खुप तोर्‍यात सांगायच्या ही माझी नात ईशा....अशी करते, तशी खेळते, देवाने मला मुलगी दिली नाही पण मुलीच्या रूपात पहिली नात दिली वैगेरे. 

पण प्रत्यक्षात ईशाला घ्यायची, तिला सांभाळायची, काही खावू घालायची वेळ आली की सासुबाईंचे बहाणे चालू व्हायचे.....माझ डोकच दुखतय, ती माझ्याकडे जास्त वेळ थांबत नाही, पटपट खात नाही वैगेरे....तस पाहील तर लहान मुलं अशा ठिकाणी लगेच लगौत करतात ज्याठिकाणी त्यांची काळजी घेतली जाते, त्यांचे लाड केले जातात...मग बाहेर आजी-आजोबा म्हणून मिरवणारे सासु-सासरे वेळ आल्यावर नातीची काळजी का नाहीत घेत...का तिला चार घास भरवत नाहीत; असा प्रश्न मानसीला कायम पडे. पण या प्रश्नाला ऊत्तर कोणच द्यायच नाही फक्त पळवाट काढायचे सर्वजण.

मानसी माञ ईशाच करून सगळ्यांच सगळ करी...हे सगळ करताना तिची खूप दमछाक व्हायची पण बोलणार कोणला...आणि महत्त्वाच म्हणजे ऐकणार कोण? धुणी-भांडी करायला कामवाल्या काकू होत्या...पण घरात त्या व्यतिरिक्त काय कराव लागत नाही? चहा-नाश्ता आला, जेवण आल, त्यासाठी लागणारी तयारी आलीच, भाज्या निवडणे, धान्य नीट करून दळायला देणे, दुध घेणे, ते तापवणे, सगळ्यांना त्यांच्या वेळेनुसार आणि आवडीनुसार जेवण-खाण, वरचेवर चहा गरम करून देणे...वरचेवर ईशाबाळाच शी-शू, अंघोळ, फ्रेश होण, खाऊ भरवण....एक ना अनेक...दिवस ऊगवायचा कधी नी मावळायचा कधी समजायचच नाही मानसीला.

एकदिवस मानसीला कणकणीच येते, तापही आलेला असतो भरपूर....राघव पाहतो तर मानसीला नीट चालताही येत नव्हत तरी ती कशीबशी ईशासाठी शिरा बनवत असते....आणि शिरा घेऊन माग वळतच होती की तिला चक्कर येऊन खाली पडू लागते तोवर राघव तिला पकडतो.... मानसीच अंग तापाने फणफणत होत. तो तिला हाॅॅस्पिटलमध्ये नेतो तर डाॅक्टर मानसीला अॅडमीट करून घेतात. तीला प्रचंड वीकनेस आलेला.....मानसीलाय अॅडमीट केल खर राघवपुढे ईशाचा प्रश्न होता....याअगौदर मानसी ईशाला सोडून कधीच राहिली नव्हती....आणि मानसीला पाच दिवसतरी सलाईन लावावी लागणार होती हे डाॅक्टरांच मत. राघव मानसीच्या आईला बोलावून घेतो; मानसीजवळ थांबायला....कारण आता ईशाची संपूर्णत: त्याच्यावर पडली होती व घरचे बाकीचे लोक ईशाला किती नि कशे सांभाळणार होते हे माहीतच होत राघवला....


राघव घरी जातो तर ईशाने रडून गोंधळ घातलेला असतो...अक्षरश: हुंदके देऊन रडत होती ती..तिचे कपडे ओले झाले होते बहुधा तीने शु केला होता...बाजूला राघवचे आई-बाबा, मानव होतेच पण त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले....जे की ईशाच काही करायच म्हटल की नेहमीच वाजायचे....आई बडबडतच होती कसली हट्टी पोरगी आहे ही, जराही ऐकत नाही....आता यांना कोण सांगणार लहान मुल अशीच असतात त्यात ती फक्त दोन वर्षांची.....ईशाची केविलवाणी अवस्था नि आपल्या घरच्यांच हेकट वागण पाहून राघवला भरून येत.....पण तो स्वत:ला सावरून पहिला ईशाला शांत करतो...मनात स्वतला दोष देतो...या सगळ्याला मीच जबाबदार आहे....मानसीची घर आणि ईशाला सांभाळत असताना होणारी तारांबळ मला दिसत होती...तरीही मी दूर्लक्ष करायचो....आणि घरच्यांनाही कधी म्हटलो नाही की तुम्ही थोडफार तरी ईशाला सांभाळून मानसीला मदत करत जा.....पण यापुढे बाकी कोणी करो वा ना करो मी तरी मानसीला मदत करणार....ईशा ही माझीही जबाबदारी आहे.

राघव खुप थकून जात असतो ईशाच करून....आता त्याला कळत होत की मुल सांभाळण किती कठिण असत ते. राघवची ही अवस्था पाहून त्याच्या आईवडिलांना खुप वाईट वाटत, की बाबा आमच्या मुलाला एवढ काम पडतय....राघव बोलतो त्यांना की मला होत असलेला ञास तुम्हाला दिसत आहे मग मानसीही तुमची सुनच आहे की तिला रोज होत असलेला ञास तुम्ही का नाही समजू शकत? यावर त्याच्या आईवडिलांनाही त्यांची चूक लक्षात येते.

मानसीची तब्येत ठीक झाली आहे अस सांगून डाॅक्टर तिला डिस्चार्ज देतात.....राघव मानसीला घरु आणतो...आणि घरी येत असतानाच मानसीची मनापासून माफी मागतो....व ईशाने पाच-सहा दिवस काय-काय बाललीला केल्या ते सांगून दोघे मनमोकळेपणाने हसतात....घरी आल्यावर सासुबाई मानसीला ओवाळून स्मितहास्याने तिचे स्वागत करतात...मानसीचे डोळे ईशाला शोधत असतात, पाहते तर काय ईशा तिच्या आजोबांबरोबर खेळत होती आणि तिचा काका मानव तिला ऊपमा भरवत असतो......हे दृष्य बघून मानसी राघवकडे पाहते; राघव  तिच्याकडे डोळेभरून पाहत तिला जणू सांगत होता की, ईशा ही सर्वांचीच जबाबदारी आहे.....ज्याप्रमाणे तु आमच्यासाठी राबून आम्हा सर्वांची जबाबदारी घेतेस त्याचप्रमाणे घरातील सर्वजण ईशाची जबाबदारी घेणार आहेत.

.....बर्‍याच घरात अशा गोष्टी घडत असतात...आपण एका घरात राहतोय, कुटूंबाचे सदस्य आहे म्हटल्यावर प्रत्येकाला समजून घेऊन मदत करावी...ना की ही काय आपली जबाबदारी नाही म्हणून अंग काढून घेता कामा नये. महत्त्वाच म्हणजे जबाबदारी वाटून घेतल्यावर कोणा एकावर त्याचा ताण येत नाही.....हो ना??


©माधुरी सोनवलकर-पाटील(माधुरी दिपक पाटील)

फोटो_साभार_

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या

  या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments