"लोका सांंगे ब्रम्हज्ञान आपण माञ कोरडे पाषाण"


"लोका सांंगे ब्रम्हज्ञान आपण माञ कोरडे पाषाण"

"अरे यश केवढा तो टी.व्ही चा आवाज.....जरा कमी कर ..." अस म्हणून राघव यश ला ओरडतो.
पाचवीत असणारा यश पप्पांच ऐकतो नि टि.व्ही चा आवाज कमी करतो....पण तो तोंड फुगवून किचनमध्ये जातो...

यश "मम्मी पप्पा ओरडले मला....स्वत:तर किती मोठ्या आवाजात पहात असतात टि.व्ही..."
मानसी काय समजायच ते समजते व मी बोलते पप्पांशी म्हणून यशला समजावते.

तोच सासुबाई, राघव व मानव या आपल्या मुलांना "काय ही मुल चहा पितात  आणि साधे कपसुद्धा ऊचलून किचनमध्ये ठेवत नाहीत. वाळुन जातात कप आणि मग चहाचे व्रण तशेच ऊठतात कपामध्ये........"
तेव्हड्यात मानव त्याच्या रूममधून बाहेर येतो. "मानव ठेव बर ते कप तिकडे...किचनमध्ये."

मानव "मी एकट्याने थोडीना ठेवलाय.....राघवदादाचा पण कप आहेच की तिथे" म्हणून मानव कप तर ठेवत नाहीच नाही पण आईशी वाद घालून बाहेर निघून जातो.

मानसीला किचनमध्ये सर्व ऐकू येत असते....खरतर सासुबाई रोजच हाॅलमध्ये सिरीयल बघत चहा पितात आणि कप तिथेच बाजूला सारतात. मीच भांडी घासायच्यावेळी तो ऊचलून आणते आणि त्याच राघव व मानव ला नियम सांगतायेत.....पण जावूदे सगळे सारखेच आणि हे काय रोजचच आहे म्हणून मानसी दुसर्‍या कानाने सोडून देते....

तोपर्यंत सासर्‍यांचा बाल्कनीत बसून वेगळाच दंगा चालू झालेला....."कितीवेळा सांगितलय वर्तमानपञ वाचून झाल की त्याची पाने नीट लावून ठेवत जा....आणि वाचतानाही चुरगळणार नाही याची काळजी घेत चला...काय ग सुवर्णा तुच वाचलेला ना मघाशी पेपर ? मग नीट ठेवला का नाही?"

सासुबाई "अहो मी काही नाही वाचला....मी आलेच नाही बाल्कनीत...व दुसरे कोणीही गेले नाही तुमच्या पेपरला. तुम्हीच तर सकाळपासून पाने चाळून तसा केलाय पेपर.....स्मृती भ्रष्ट होत चाललेय दिवसेंदिवस..."

"काय काय म्हणालीस? कोण स्मृती?"

"काही नाही...वाचा पेपर."

मानसीला तर हसूच येत सासू-सासर्‍यांच संभाषण ऐकून.

दुपारची वेळ....
मानव राघवला "दादा तुला कितीवेळा म्हटलय रे साॅक्स रोजचे-रोज धुवायला टाकत जा....बघ ना केवढा वास येतोय तो...."

राघव "काय रे आता तु शिकव मला स्वत: तर कधी-कधी अंघोळ न करता फसफस डिओ मारून जातोस काॅलेजला."

"दादा इथे साॅक्सचा विषय चालू आहे."

मानसी तिथेच कपड्यांच्या घड्या घालत सगळ ऐकून हसते....त्यामुळे राघव व मानव दोघांनाही चुक कोणाची आहे ते समजत....कारण विषय कोणता आहे यापेक्षा दोघेही ऐकमेकांना ऊपदेश करून स्वत:च तसे होते हा होता.

मानसी " तर वाचकहो, तुम्हाला एव्हाना समजलच असेल हे सगळ काय चाललय तर 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण माञ कोरडे पाषाण.'


घरातील पालकवर्ग असा करत असेल तर त्या बिचार्‍या यशने काय आणि कशा शिकायच्या चांगल्या सवयी?
आपण पाहिल ऐरवी राघव मोठ्या आवाजात टी.व्ही पाहत असतो आणि तोच यशला कमी आवाजात टीव्ही पायला सांगतोय......सासुबाईंचही असच स्वत: चहा पिणार तिथेच कप ठेवणार. सासरे तर काय बोलूच नकात....सहसा त्यांच्या व्ययतिरिक्त पेपरला कोणी जात नाही, एवढा वेळही नसतो कोणाकडे तेही मोबाईलच्या जमान्यात.....स्वत:च दिवसभर एवढ्यावेळा तो पेपर हाताळतात आणि बाकीच्यांनाच बोलतायेत.....राघव व मंदार पाहिलच तुम्ही....ते काही वेगळ सांगायला नकोच...."

तस पाहिल तर या गोष्टी वारंवार घडत असतात.....फक्त घरातच नाही तर बाहेर, कामाच्या ठिकाणीही असेप्रकार घडत असतात. समोरच्याला तत्त्वज्ञान सांगायच आणि आपण बरोबर तेच करायच...तर तुमच्याही बाबतीत असे प्रकार घडत असतील तर कमेंन्ट करून नक्की कळवा....मलाही आवडेल वाचायला....

©माधुरी सोनवलकर-पाटील (माधुरी दिपक पाटील)

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 

रंग आयुष्याचे 

  या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

0 Comments