असेही_असतात_सासरे...भाग २


आपल्या नणंदांकडून आण्णांबद्दल बर्‍याच गोष्टींचा ऊलघडा होतो मानसीला....शारदा आणि संगिता मानसीला हे सगळ सांगतात कारण मानसी प्रेग्नेंट असते....ऊगीच सारख आण्णांबद्दल विचार करून त्याचा परीणाम बाळावर व्हायला नको अस त्यांना वाटत.....शेवटी होणार्‍या बाळाच्या आत्या होत्या त्या....रक्तच रक्ताची ओढ घेत ना...नाहीतर एवढे दिवस झाले होते लग्न होउन मानसीच पण त्या दोघीही कधी काही बोलल्या नव्हत्या या विषयावर...पण निदान त्या होणार्‍या बाळामुळे का होईना मानसीला आण्णांच्या गूढ स्वभावाबद्दल बरचं काही समजत.

शारदा "आण्णांचा स्वभावच आहे तो, तु लक्ष नको देऊस"

संगिता "अग आईने तर खूप सहन केल आहे आयुष्यभर....तरीही आण्णांमध्ये तसूभरही फरक पडला नाही...ऊलट दिवसेंदिवस त्यांचा हेकेखोरपणा वाढतच गेला पण कमी नाही.."

मानसी "हो नाही लक्ष देणार मी त्यांच्याकडे...पण आईंच्या आजारपणाला आण्णा कसे जबाबदार? मला नाही समजल."

शारदा "अग आण्णा आर्मी सर्व्हिस करत होते... ते घरी फोन करायचे; त्यांना आमची आठवण आली की...तेव्हा काही मोबाईल नव्हते घेऊन फिरायला...लॅंन्डलाईनचा जमाना तो...घरी एक लॅंन्डलाईन होता. मग आण्णांच कस होत की फोन केला रे केला पहिली रिंग झाली की दुसरी रिंग होण्याअगोदर फोन ऊचलायलाच हवा....नाहीतर नको-नको ते बोलायचे आईला. आई पहिल्यापासूनच शांत स्वभावाची...गप्प ऐकून घ्यायची सगळ....आम्ही शाळेतून घरी असलो की ऊचलायचो पटकन पण आम्ही घरी नसलो म्हणजे वेळ व्हायचा फोन ऊचलायला आणि ते साहजिकच आहे....घरात काही ना काही कामे चालूच असायची आईची...अग अशात फोन आल्यावर; निदान हातातल काम बाजूला ठेऊन फोन ऊचलेपर्यंत तरी वेळ जाणारच ना? पण आण्णा अजिबात समजून घ्यायचे नाहीत. आम्हालाही हे सगळ समजत होत पण आम्ही तेव्हा लहान कस बोलणार ऊलट त्यांना...."

मानसी "बापरे....असेही असतात पुरूष? पहिल्यांदाच ऐकतेय मी अस....पुढे मग"

संगिता "पुढे काय....एकदिवस असाच फोन आला, आई किचनमध्ये काहीतरी करत होती , फोनच्या दोन तीन रिंग वाजून गेल्या त्यामूळे आई आण्णांच्या भितीने पळत गेली फोन ऊचलायला तोवर फरशीवर सांडलेल्या पाण्यावर पाय घसरून बरोबर कमरेवर पडली...आणि मुका मार लागला व मणक्याच हाड मोडून आॅपरेशन झाल मणक्याच व तेव्हापासून तिला पाठीच्या मणक्याचा ञास सुरू झाला."

मानसीच्या तर डोळ्यात पाणीच येत सासूबाईंचे झालेले हाल ऐकून....तिला आता समजत की आई एवढ्या शांत-शांत का असतात ते. माणसाने भूतकाळात खुप काही सहन केल असेल आणि वर्तमानकाळातही तेच चालू असेल व भविष्यातही ती परिस्थिती सूधारण्याची शक्यता नसेल तर माणूस आतुन तुटुन जातो. जणू सवयच होऊन जाते त्या दुखण्याची....असच काहीस झाल असाव आईंच्या बाबतीत याची खाञी होते मानसीला.

मानसी मनातून ठरवते की काहीही झाल तरी आपण आण्णांच्या स्वभावापुढे झुकायचं नाही....आजवर आई, सुधीर, दोघी नणंदा सगळ सहन करत आले म्हणून आण्णांना जास्तच भर मिळाली. आज माझ्यावरही ते त्यांची मत लादू पाहतायेत...न जाणो ऊद्या माझ्या मुलावरही?? नाही मी मुळीच अस होऊ देणार नाही.

आण्णांना बदलाव लागेल....त्यांचा स्वभाव बदलेल की नाही माहित नाही कारण म्हणतात स्वभाव हा बदलत नसतो पण त्यांना स्वतच्या सवयी बदलाव्या लागतील...दुसर्‍यांवर स्वतची मत लादण्याअगोदर समोरच्याच्या मनाचा विचार त्यांना करावाच लागेल.

तोवर शारदा आणि संगिता मानसीला आम्ही निघतो...आई आणि सुधीरला भेटायला पुढच्या रविवारी येऊ म्हणून निघतात. तोच दरवाज्यात आण्णा....

त्या दोघींना बघून आण्णा खूष व्हायच सोडून....तुम्ही कशाला आला होतात? सासु-सासर्‍यांची परवानगी घेऊन आला होतात का? अस विचारतात.....त्यावर दोघीही नुसत हो म्हणून काढता पाय घेतात.

पण इकडे मानसीला हा प्रश्न पडतो आण्णा हेकेखोर आहेत पण मग स्वतच्या मुलींच्या सासरबद्दल एवढा आदर कसा....मानसीच्या मनात जास्तच गोंधळ वाढतो....

पण त्याही प्रश्नाच ऊत्तर तिला लवकरच मिळत; काय ते पाहूया पुढच्या भागात....माञ 
पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की लाईक करा..https://www.facebook.com/hernewinning/ म्हणजे तुम्हाला त्या भागाचे नोटिफिकेशन येऊन तो भाग तुम्हाला लगेच वाचता येईल....धन्यवाद !

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल


Post a comment

0 Comments