काय म्हणाव अशा जगण्याला....भाग २(अंतिम)

भाग १:- प्रसंग पहिला

प्रसंग दुृसरा:-

पस्तीस वर्षांची कुसूम ही एक चार घरी धुणी-भांडी करून जगणारी....घरात खाणारी सहा तोंड.....तीन मुली, एक मुलगा, कुसुम आणि तिचा नवरा. नवरा दारू पिणारा व बायकोच्या जीवावर जगणारा. त्याला बोलून आणि समजावून कुसूम थकून गेली होती...शेवटी तीनेच चार घरच धुणीभांडी करून संसाराचा रहाटगाडा सांभाळाला.

ज्याठिकाणी कामाला जायची तिथ प्रामाणिक असायची. घरातल्या मालकीणींशी आदरयूक्त असायची. कामावर नेहमीच वेळेवर येणार....पण मालकीन सोडताना कधीच वेळेवर सोडायची नाही....ज्या ठिकाणी कामाला जायची तिथ सगळ्याच मालकिणी अशा नव्हत्या...पण एक दोघी अशाच कुसूम कडून जास्तीच काम करून घ्यायच्या....पण आपण ज्या ठिकाणी कामाला जातोय, ते ठिकाण सुरक्षित होत.....त्या ठिकाणची स्ञी-पुरूष लोक सभ्य होती म्हणून ती काम सोडू शकत नव्हती. कारण ऊद्या काही बर्‍यावाईट प्रसंगाला सामोर जाव लागल तर तीच्या मागे तीच्या तीन मुली होत्या.....पण कदाचित तीची ही मजबूरी ती कामावर जात असणार्‍या काही मालक लोकांना माहित असावी त्यामुळे त्यांना माहित होत की कुसूम काही काम सोडून जाणार नाही म्हणून तेही तिच्या प्रामाणिक पणाचा फायदा घेऊन तिच्याकडून जास्तीच काम करून घेत असावेत....पण ठीक आहे एरवी कुसूम करायचीही कामं पण लाॅकडाऊनच्या काळात सगळच बिघडूृन बसल होत. ना तिला कामावर जाता येत होत ना घरात किराणा भरता येत होता....

आपल्या प्रामाणिक पणाला जागून कदाचित आपल्याला या अडचणीच्यावेळी, आपण कामाला जात होतो त्या घरच्या मालकीणबाई आपल्याला मदत करतील या आशेने कुसूम फोन लावून पैशाची मदत मागते आणि आता मला मदत करा, मी लाॅकडाऊन संपल की तुमचे पैसे परत करते अस म्हणते....पण त्यातले काहीजण मदत करतो अस म्हणतात तर काही जण आमचेच पगार झाले नाहीत म्हणून हात झटकून रिकामे होतात. आता एका बाईला कामाला लावू शकतात ही लोक तर नक्कीच यांची आर्थिक परिस्थिती चांगली असणार....तरीही अशी काही माणस हातावर पोट असणार्‍या लोकांना मदत करण्यास नकार देतात, तेव्हा प्रश्नच पडतो की यात दोष कुणाचा? मालकाच्या घरी प्रामाणिकपणे काम करणार्‍या लोकांचा की मदत करण्यास नकार देणार्‍या मालकाचा.


प्रसंग तिसरा:-


कामगार लोक मग त्यात कारखान्यात काम करणारे, हाॅटेलमध्ये काम करणारे वेटर असो वा कपड्यांच्या दुकानात काम करणारे मजूर असो वा मूर्ती बनवणारे, रंगकाम करणारे मजूर असो....या लोकांचीही तीच अवस्था बिकटच असते....मालकाला पैसा मिळवून देणार्‍या या लोकांचा देखील फायदा घेतला जातो.....त्यांना हव तेव्हा मालक कामावरून काढून टाकतो आणि गरज लागली की बोलावतो....या लाॅकडाऊनच्या काळात तर ज्या कंञाटदारांनी त्यांना महाराष्र्टात आणलय तेच पळून गेले आणि हे मजुर लोक आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी पायी प्रवास करतायेत.....ज्या घरी भाड्याने राहत होते लोक त्या घरमालकांनी देखील द्यया दाखवली नाही. घरभाड दिल नसल्याने त्यांना घराबाहेर काढल. ज्याठिकाणी काम  करत होते त्यांनी साध त्यांना परतीच्या प्रवासासाठी पैसे देखील दिले नाहीत....अशावेळी प्रश्न पडतो स्वतच पोट भरण्यासाठी काम करणारे श्रमिक चूकीचे की जे मालकांवर पोटासाठी लगेच विश्वास ठेवून काम करतात की श्रमिकांच्या कष्टावर मोठे होणारे मालक चूकीजे जे की स्वतच्या मालमत्तेतला थोडाफार पैसा श्रमिकांसाठी खर्चू शकत नाही.

प्रसंग एक, दोन व तीन वरून सांगायचा मुद्दा हाच की मालकवर्ग आणि श्रमिकवर्ग यांच्यातली दरी आर्थिकदृष्ट्या भरून येणार नाहीच पण निदान माणुसकीच्या दृष्टीने ती भरून यावी....निदान संकटाच्या काळाततरी. असही मरताना कोणीही पैसे वर घेऊन जाणार नाही मग जिवंत असताना त्या पैशांचा ऊपयोग हातावर पोट भरणार्‍या लोकांसाठी केला तर बिघडल कुठ? ऊलट जेवढ तुम्ही गोर-गरीबांना द्याल तेवढ तुमच्याजवळच पुण्य वाढेल.

असे प्रसंग लिहण्यास कारण एकच की आपणही या समाजाचा एक भाग आहोत....या समाजाच काहीतरी देण लागतो....असे बरेच प्रसंग आपल्या आजुबाजूला, आपल्या डोळ्यादेखत घडत असतात. निदान पुढे जावून आपल्यासमोर असे प्रसंग आले तर या माणसांनबद्दल सहानभुती दाखवूयात...शेवटी ती देखील माणस आहेत, आपल्यातीलच आणि आपल्यासारखीच....धन्यवाद !

©माधुरी दिपक पाटील

प्रिय वाचकहो अशाच सामाजिक, कौटुंबिक कथा वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे फेसबुक पेजला नक्की लाईक करा.

Post a comment

0 Comments