शेजारीणबाई.......!!!!

"अहो आहे का कोणी घरात? बाहेर या लवकर.....एक भारी न्यूज आहे." शिंदे बाई राधाच्या दाराजवळ येवून आवाज देतात.

गोदाआजी घरातून बाहेर येवू लागतात व हळळू आवाजात  मनाशीच बडबडतात "आता ही आणखी नवीन घेऊन आलेय काय माहीत, नुसतं माझ्या राधाचं डोक खाते." राधा ही गोदाआजींची नातसून. त्यांची सून आणि मुलगा एका गाडीच्या अपघातात गेलेले असतात. घरात गोदा आजी, राधा आणि नातू रमेश तीघे असतात. रमेश आणि राधाच लग्न होऊन नवीनच दोन नहीने झालेले असतात.

शिंदे बाई त्याच्या शेजारिणबाई. वय ४०-४५ च्या आसपास. सुशीक्षीत मराठी शाळेत शिक्षीका. एवढं वय आणि अनुभव बरोबर असूनही स्वभावातला ' मीच जास्त शहाणी ' हा गुण काही कमी झाला नव्हता. म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं तसच काहीस ! त्यांच्या याच स्वभावामुळे गोदा आजीला तीच फारस पटायच नाही. गोदा आजीच याऊलट असायच . त्यांच्या मते, माणसाला एखाद्या गोष्टीची पूर्णपणे माहीती असेल तरच शहाणपणा मिरवावा किंवा थोडेफार गुण असतील तर ऊगीच जास्त बढाया मारू नयेत थोडक्यात काय तर उथळ पाण्याला फार खळखळाट असून काही ऊपयोग नाही !

पण बदलतील त्या शिंदे बाई कसल्या ! त्यांच्या आवाजाने आजी पाठोपाठ राधापन बाहेर आली.

राधा : " या आत येवून बसा आणि मग बोला काकू . कसली न्यूज आहे ? सांगा तोपर्यंत तुम्हाला चहा टाकते."

शिंदे बाई : " हा लवकर टाक चहा मला आणखी बायकांना पण या स्पर्धेची कल्पना द्यायची आहे. अगं आपल्या तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्ञियांसाठी एक स्पर्धा आयोजित केलेय."

राधा : "अरे वा ! पण स्पर्धेचं स्वरूप कसं आहे." ( राधा,शिंदे काकूंना आणि गोदा आजींना चहा देते. गोदा आजीही बाईंच बोलण ऐकत असतात.)

शिंदे बाई : " एकूण तीन राऊंड असतील. पहिल्या राऊंड मध्ये ते एक पाककृती देतील, ती कृती त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करायची आहे. दुसर्‍या राऊंंडमध्ये कपल डान्स असणार आहे. तिसरर्‍या राऊंडमध्ये आपल आवडत गाण म्हणायच आहे आणि बक्षिस पाच हजार रूपये रोख रक्कम."

राधा :  "स्पर्धा तर खूप छान आहे. आजी मी घेऊ का हो भाग?"

गोदा आजी : "हो घे गं पण स्पर्धेच्या अटींची  नीट चौकशी कर बाई."( गोदा आजीने शिंदे बाईंकडे कटाक्ष टाकत जणू राधाला दक्ष राहण्याचा इशारा दिला.)

शिंदे बाई(जरा ठसक्यातच): " नाही हो आजी मी सगळी व्यवस्थित चौकशी करूनच सांगतेय सगळ. राधा गं चल लाग तयारीला, मी आपल्या सोसायटीतील बाकी बायकांना सांगते." (शिंदे बाई निघून जातात.)

संध्याकाळची वेळ असते. रमेश office वरून आल्याबरोबर राधा ही त्याला स्पर्धेची सर्व माहीती देते आणि त्याचा होकार मिळवते.  नवीनच लग्न झालेल असतं दोघांच उगीच कशाला हिरमोड त्यांचा म्हणून गोदा आजीही परवानगी देतात. राधा प्रक्टीस करायला सुरूवात करते. टाईम लाऊन पदार्थ बनवणे, संध्याकाळी रमेश आला की डान्स प्रक्टिस अस तीच सुरू होत. ' लग जा गले' हे गाण ती म्हणनार होती.

स्पर्धेचा दिवस उजाडतो. सोसायटीतील सर्व बायका स्पर्धेच्या ठिकाणी पोहचतात. सर्वांत पुढे शिंदेबाई होत्या. तालुका level असल्याने बर्‍याच बायका आल्या होत्या.

स्पर्धा सुरु होते..........पदार्थ बनवण्याचा  राऊंड......शिंदे बाई, राधा तयार असतात पण तिथं गेल्यावर त्यांना समजत की इथ फक्त south indian dish बनवायची अट आहे. त्यामूळे त्यांच्या सोसायटीचा पूर्ण group चं बाहेर पडतो.......दुसरा राऊंड छान पार पडतो....... पण तिसर्‍या राऊंडचा पण तोच problem होतो अपूरी माहीती त्यात फक्त मराठी गाणचं allow केलेल असतं........त्यातून पण बाहेर पडतात. झालं एकंदरीतच सोसायटीतील बायका शिंदेबाईंना मनातून शिव्या घालत होत्या.........पण आता काय ऊपयोग.......!

राधा घरी येवून आजीला सगळा प्रकार सांगते........बिचारी खूप नाराज असते. रमेश तर कपल डान्स करून परत office ला निघून जातो.......गोदा आजी राधाची समजुत काढतात....." मला माहितचं  होत त्या शिंदेबाईचं......मेलीचं शहांणपण असतं एवढसं आणि बढाया मारते इतक्या सार्‍या..........उथळ पाण्याला खळखळाट फार हेच खरं बाई........."

तुम्हाला अशा लोकांचा अनुभव नक्कीच आला असेल तर comment करून नक्की कळवा मलाही तो ऐकायला आवडेल......समाप्त !

©माधुरी दिपक पाटील

विषय:-ऊथळ पाण्याला खळखळाट फार

फोटो_साभार_google & pixabay

Post a comment

0 Comments