एवढीच तर अपेक्षा असते....!!

"काय ग राधा झाली का तुझी कटकट सुरू"....दिनेश जरा रागातच.....

"हो तुम्हाला माझी कटकटच दिसते. मला होणारा ञास नाही का दिसत." राधा

"कसला ञास होतो ग तुला ? जेव्हा बघाव तेव्हा माझ्या घरच्यांची तक्रार करत असते. "

"तक्रार करत नाही मी....फक्त थोड स्पष्ट बोलते." राधा

"हो पण मी म्हणतोय काय गरज आहे....बोलायचचं नाही ना त्यापेक्षा...म्हणजे वाद घालण्याचा प्रश्नच येत नाही."

"पण मला ञास होत असेल तर मी बोलणारच ना?? महत्त्वाच म्हणजे माझ्याकडून घरातील कोणाला ञास होणार नाही याची मी काळजी घेते; त्यामुळे तुम्हा कोणाला माझा कसलाच ञास होत नाही. मग तुम्ही, घरचे कसे बोलाल मला?? पण माझ्या एकटीवर लोड पडतो कामाचा...म्हणून मी बोलते....तर तुला मी बोललेलं, कटकट केलेली दिसते.मला तरी काय हौस नाही कटकट करायची." बोलता-बोलताच राधाचे डोळे पाण्याने गच्च होतात.

राधाचे पाण्याने भरलेले डोळे पाहूनही दिनेश न पाहिल्यासारख करून "हे बघ तुला बदलाव लागेल. या घरातील सगळ्या गोष्टींशी जमवून घ्याव लागेल." अस म्हणून बेडरूम मधून निघून जातो. 

दिनेश असा तडकाफडकी गेलेला पाहून खूप कष्टाने आवरलेल्या राधाच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. ती मनातून खूप दुखी होते. की मी या घरासाठी एवढ सगळ करूनही माझ्या पदरी निराशाच? निदान दिनेशने तरी मला समजून घ्याव एवढीच तर अपेक्षा आहे माझी.....पण नाही मला कोणीच समजू शकत नाही हेच खर...अस स्वतच्या मनाला बोलतच राधा संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते. कारण तिला माहीत होतेच तिलाच सुरूवात करायला हवी स्वयंपाकाला. सासूबाई काही सुरूवात करणार नाहीत....मदतीलाही मनात आलं तर येतील नाहीतर नाही.

राधाला खुप ञास होत असतो दिनेशच्या बोलण्याचा....तो तिला समजून घेईना याचा.....राधाच्या मते सासरी बाकी कोणी समजून घेऊ वा ना घेऊ पण नवर्‍याने समजून घ्याव....खुप बरं वाटत बायकोला. राधाला हेही समजत नव्हत की लग्न झाल्या-झाल्या तर दिनेश खुप काळजी घ्यायचा. तुला हव तस रहा, हव तस वाग म्हणायचा आणि आता लग्नाला दोन वर्षे झाली नाही तोवर 'तुला घरातील सर्व गोष्टींशी जमवून घ्यावच लागेल' अस बोलतोय......म्हणजे बाकी लोक म्हणतात नव्याचे नऊ दिवस तेच खर म्हणायच का?...नवरा-बायकोतील प्रेम हळुहळू कमी होत जात?? नाही आमच्यामध्ये अस होणार नाही, अस व्हायला नको आहे....असे एक-ना-अनेक विचार राधाच्या मनात येत होते.

राधाच्या मनातील ही घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती....त्या विचारातच ती राञीचा स्वयंपाकही करते. मनात चाललेल्या हे विचार बोलून तरी कोणाला दाखवावे. मुळातच समजूतदार असलेली राधा आई-वडीलांना सासरचे मतभेद सांगून ऊगीच टेंन्शन देऊ इच्छित नव्हती. तिला माहीतही होत दिनेशही खूप समजूतदार आहे...पण तो तिच्याकडून अशा अपेक्षा का करत होता हेच तिला समजेना झाल होत. तिने तर कधी अशी अपेक्षा केली नव्हती की नवर्‍याने तिच्यासाठी बदलावं....ती तिच घर, माणस, करिअर सर्व सोडून सासरच्या लोकांमध्ये समरस झाली होती....ती कधी दिनेशला म्हटली नव्हती की तुही तूझ्या घरच्यांना सोड....ऊलट लग्न झाल्यापासून जणूकाही ती याच घरची असल्यासारखी राहत होती. स्वतला पूर्णपणे विसरून दिवसराञ सर्वांच्या आवडी-निवडी जपत होती.
मग तरीही दिनेश अस का तुटकं-तुटक वागतोय माझ्याशी हेच समजत नव्हत राधाला....आपण दिनेश कडून स्वतच्या कौतुकाची तर अपेक्षा करत नाही ना? असा विचार राधाच्या मनात येतो....आणि तो योग्यही असतो. कारण मनापासून काम करणार्‍या प्रत्येकाला अस वाटण साहजिकच आहे की आपण ज्यांच्यासाठी करतोय त्याने आपल कौतुक कराव. पण तरीही हा विचार मनातून झटकून लावत राधा झोपी गेली.

दुसर्‍या दिवशी सकाळीही दिनेश आणि राधाच्यातील अबोला संपला नव्हता....दिनेशच्या आॅफिसला सुट्टीच होती त्यादिवशी. सकाळच्या वेळी दिनेश, राधा, सासू-सासरे, दिनेशचा भाऊ मानव सगळेजण नाश्ता करत होते. तेव्हड्यात दाराची बेल वाजते. अर्थातच नाश्ता मध्येच सोडून राधा दार ऊघडते आणि समोर असतात त्या गोदा अक्का. म्हणजेच दिनेशच्या आत्या. राधा हसून गोदा अक्कांच स्वागत करते. स्ञी असतेच अशी नवर्‍यात आणि तिच्यात कितीही मतभेद झाले तरी बाकी लोकांपुढे ती चेहर्‍यावर हसूच आणते.

गोदाअक्काला अस अचानक आलेल पाहून घरातले सगळेजण खूष होतात. दिनेशचे बाबा कारण विचारतात तेव्हा समजत की गोदा अक्का या शहरातील एका डाॅक्टरकडे ट्रिटमेंटसाठी आली आहे. गोदा अक्काही फ्रेश होऊन नाश्ता करतात. एक आठवडा राहणार होत्या त्या. ऐक-दोन दिवस जातात. 

गोदा अक्कांना दिनेश आणि राधाच काहीतरी बिनसलय हे समजायला वेळ लागत नाही. अनुभवाने केस पांढरे झाले होते त्यांचे ते काय ऊगीच....दिनेशच्या राधाशी फटकून वागण्याने व राधाच्या शांत-शांत वागण्याने अबोला असल्याच कारण नक्की काय असाव याचा अंदाज गोदाअक्काला आला होता. गोदाअक्कांना हेही माहित होत की दिनेशची आई म्हणजेच राधाची सासू तर काही दोघांमध्ये पडणार नाही...तेव्हा आपणच काही तरी करूयात अस म्हणून त्या राधाच्या मनातल काढून घेण्याचा प्रयत्न करतात. गोदाअक्का नेहमी यायच्या त्यामुळे राधाला त्यांचा स्वभाव मनमोकळा आहे हे माहित होत.

 म्हणूनच राधाही त्यांना सांगते की; "बाकी काही नाही पण निदान दिनेशने मी केलेल्या कामाच कौतुक कराव एवढीच अपेक्षा आहे माझी....पण कौतुक तर नाहीच पण तो मलाच बोलतोय."

गोदाअक्कांनाही समजत की राधाची अपेक्षा रास्तच आहे. त्या राधाला मी दिनेशशी बोलते म्हणून समजावतात. 

राञी जेवण झाल्यानंतर बाहेर जरा फेरफटका मारून येऊयात म्हणून गोदाअक्का दिनेशला बरोबर चल म्हणतात. म्हणजे तेवढच व्यवस्थित बोलता येईल. 

दिनेश आत्याचा लाडका भाचा तोही होकार देतो.

घरापासून जरा दूर गेल्यावर गोदाअक्का डायरेक्ट विषयाला हात घालतात. 

"दिनू तुला म्हणून सांगते....तुझे मामा खुप कौतुक करायचे माझं....ते जेवढ जास्त कौतुक करायचे तेवढ मी काम भरपूर करायचे आणि तितकच जास्त सासरच्या लोकांची सेवा करायचे."

"हो आत्या, मामा तुझा खूप लाड करायचे पण तुही कधी कोणत्या गोष्टीत मागे नव्हतीस...मिही पाहिल आहे आणि बाबाही सांगतात..." दिनेश

"लग्न झाल्या-झाल्या मलाही नव्हत जमत रे....घरातलं सगळ करायला, ऊरकायला. सासरच्या सवयी वेगळ्या; माझ्या सवयी वेगळ्या...आवडी-निवडीही वेगळ्याच...असणारच म्हणा वेगळ्या एवढे वर्ष माझ घर दुसर आणि लग्नानंतर दुसर्‍या घरी राहयच, सासरच्यांशी जमवून घ्यायला थोड अवघडच जायचं...... पण हळुहळू मी कधी त्या घरात मिसळून गेले हेही समजल नाही....हे सर्व शक्य झाल कारण तुझे मामा प्रत्येक गोष्टीत माझ करत असलेल कौतुक आणि एकदिवस ही आपल्या घराला तीचचं घर मानेल हा त्यांचा माझ्यावरचा विश्वास."


"कसल भारी ग......तुमच नात काही वेगळच होत नाही?" 

"अरे वेगळ वैगेरे काही नाही....नवरा-बायकोच नात असच असत. तुज माझ जमेना तुझ्यावाचून करमेना. यात अबोला तेव्हाच येतो जेव्हा तुमचा अहंकार मध्ये येतो."

दिनूला आत्याच्या बोलण्याचा रोख समजतो पण तो न समजल्यासारख दाखवतो.

पण गोदाअक्का त्याला बरोबर पकडतात.

"हे बघ दिनू मला माहित आहे तु आणि राधा चार-पाच दिवस झाले बोलत नाही आहात. पण अरे न बोलून थोडी ना प्रश्न सुटतात. राधा समजूतदार मुलगी आहे."

"म्हणजे मी काही समजूतदार नाही का? माझही तिच्यावर तेवढच प्रेम आहे." 

"हो दिनू मान्य आहे! तुझ राधावर आणि राधाच तुझ्यावर खुप प्रेम आहे....पण हे प्रेम व्यक्तही करता यायला हव. अरे आम्हा बायकांना जास्त काही नको असत....नवर्‍याने घेतलेल्या सोन्याच्या हारापेक्षाही आम्हाला मोगर्‍याच्या फुलांचा न सांगता आणलेला गजराच जास्त भावतो. सिनेमा पाहयला घेऊन जाण्यापेक्षाही किचनमध्ये नवर्‍याने केलेली लुडबूडच जास्त आवडते. नवर्‍याने केलेल्या स्वयंपाकाच्या कौतुकानेच आम्हा स्ञियांना ढेकर येते. आपल्या मुलांवर तू खूप चांगले संस्कार केलेत अस म्हटल्यावर तर तिच्या आईपणाच आणि बायको पणाच सार्थकच होत. जास्त काही नाही रे पण बायकोच तोंडभरून कौतुक कर बघ बायको कशी दशावतार धारण करून घराची भरभराट करतेय. शेवटी काय तर घरातली लक्ष्मी खुष असेल तरच घरात लक्ष्मी येते...!!!"

"हो ते माञ आहे अक्का....जेव्हा केव्हा राधाशी माझ भांडण होत तेव्हा माझ कशातच लक्ष लागत नाही. ना कोणत्या गोष्टीत माला यश येतं...एरवी तिच्याशी अबोला धरला की मलाही समजत नाही माझ काय चाललयं...महत्त्वाच म्हणजे खरचं राधा समजूतदार आहे....माझच चुकल...स्ञी मन समजण कठीण आहे अस लोक म्हणतात खर पण स्ञी मन समजून घेण खुप सोप आहे आणि ते मन जपन त्याहूनही सोप आहे. कारण या स्ञीमनाच्या अपेक्षा खूपच हळव्या आणि करूणामय असतात. 

ज्याप्रमाणे राधाने मला, माझ्या घराला आपलस केल त्याचप्रमाणे मिही तिला आपलस कराव एवढीच तर अपेक्षा आहे तिची. मी ती नक्की पूर्ण करेन. राधाला खूष कस करायच ते मला ऊमगल आहे..." 

"आता कस....शहाण माझ पोर ते..." अस म्हणून गोदाअक्का दिनेशच्या डोक्यावरून हात फिरवून; जणू त्याला स्ञीमनाच गुपीतच प्रदान करतात.

"आत्या खुप थॅंन्क्यू..." दिनेश

बोलत-बोलतच गोदाअक्का आणि दिनेश घरी कधी पोहचतात समजतही नाही.

घरी पोहचताच दिनेश मस्त फ्रेश होतो. एव्हाना राञीचे दहा वाजुन गेले होते. दिनेश बेडरूम मध्ये जातो...राधा ऊगीच खिडकीत ऊभी राहून बाहेर आकाशाला न्याहळत होती. दिनेश मागून हळूच येऊन राधाचे डोळे झाकतो आणि हात पुढे कर म्हणून हातात आईसक्रीम ठेवतो आणि राधाच्या डोळ्यावरचा हात बाजूला घेतो. राधा पाहते तर राधाच फेव्हरेट कसाटा आईसक्रीम होतं....राधा खूप खुष होते अचानक अस आईसक्रीम पाहून तेही न सांगता...ऊडीच मारायची बाकी होती तिने पण तेव्हड्यात दोघांमध्ये असणारा अबोला आठवतो आणि ऊगीच गाल फुगवून दिनेशच्या विरूध्द दिशेला तोंड फिरवते. 

"मॅडमचा राग अजून गेलेला दिसत नाही....साॅरी बायको" म्हणून...दिनेश राधाला जवळ ओढतो आणि तीचे गुलाबी गाल ओढतो. तशी राधाही मनातला रूसवा विसरून दिनेशला गच्च मीठी मारते.

आपल्या मिठीतली राधा दिनेशला नाजूक, निरागस  भासते.... किती हळवी असते स्ञी....केवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींत तिला आनंद मिळतो आणी ऊगीच आपण हामपणा घेऊन बायकोला धारेवर धरतो....काहीतरीच...म्हणून दिनेश स्वतचीच चूक मान्य करतो.

दिनेशला तर स्ञीमनाची कवाडे ऊघडणारी गुरूकिल्ली सापडली होती.....पण वाचकहो तुम्हालाही स्ञीमनाची कवाडे ऊघडणारी गुरूकिल्ली सापडली असेलच की....लाईक, शेअर, कमेंन्ट करेन नक्की कळवा....धन्यवाद...!!!

आणि हो अशाच छान कथा वाचण्यासाठी
 'रंग आयुष्याचे' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा...!

©माधुरी दिपक पाटील

All copy rights are reserved.


Post a comment

0 Comments