कोणावर_गेलेय_काय_माहित.....भाग२(अंतिम)


"पिल्लू आले गं"म्हणून समीधा मिनूच्या रूममध्ये जाते.सकाळची वेळ अर्थातच कामाची वेळ.समीधाची काम ऊरकायची गडबड त्यात मिनु चा उठून गोंधळ तेव्हड्यात सासूबाईंचा आवाज येतो,'अरे कोणी चहा देईल का मला?'समीधा एका हातात चहा आणि दुसर्‍या हातात चहा घेऊन येते व सासूबाईंना देते.लगेच सासूबाई "बाई बाई केवढा तो थंड चहा,थंडीच्या दिवसांत सुध्दा गरम चहा मिळत नाही.माझचं नशीब खोट दुसरं करणार काय.मी माझ्या सासूला किती जपल बाई!माझी मुलपण तेवढीच गुणी होती बरं" झालं इकडे सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. समीधा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि मिनूच आवरायलासुरूवात करते,सगळ शी-शू,अंघोळ,पावडर,कपडे घालुन मस्त तयार झालेली असते.समीधाही शिफाॅनची पिंक कलरची साडी त्यावर फेंट पिंक कलरचा ब्लाऊज घालून तयार होते कारण तो दिवस होता रविवार.समीधाचा नवरा मानवला सुट्टी असते.त्यांनी महाबळेश्वर ला one day trip जायच ठरवल होत.                      

    एव्हाना11 वाजले होते.सासूबाईंची सकाळ 11 वाजताच झालेली.मिनु फार खुष असते कारण मानवने तिला राञीच उद्या फिरायला जायच ते समजावल होत.बाहेर फिरायला जायच म्हटलं की स्वारी खुष असायची.सासूबाई टि.व्ही पाहत  होत्या,समीधा मिनुला त्यांच्या जवळ सोफ्यावर बसवते आणि मिनूचा खाऊ आणायला किचनमध्ये जाते.मानव " मी गाडीत डिझेल टाकुन अर्ध्या तासात येतो , तोपर्यंत तुम्ही दोघी आवरून बाहेर गेटजवळ येऊन थांबा"अस म्हणून घराबाहेर पडतो.                                                                              सासूबाई मानव गेलेला पाहून तोंड चालू करतात "काय ग मिनुबाळ एरवी किती रडारडी करत असतीस तू ? आणि आज फिरायला जायचं म्हटल की कशी शहाण्या बाळासारखी बसली आहेस !"समिधाने सासूबाईंच सर्व बोलण किचनमधून ऐकलेल असत.तिला ऐकू जाण्यासारखच ते बोललं गेलं होत म्हणा......समीधा मिनुला कडेवर घेऊन "चला मिनू मॅडम आज तुमचा दिवस आहे.मज्जा करायची हं"असं बोलत असते तोवर सासूबाई सुरूच करतात,"आत्तापासूनच पोरीच एवढ लाड करू नकोस बाई आणि तिला खर्च करायची सवयही लावू नकोस नंतर डोक्यावर बसेल आणि बापाला भीक मागायला लावेल"         

                आत्तामाञ समीधाची सहनशक्ती संपते.ती बोलायला सुरूच करते "काय हो आई(सासूबाईंना)मिनु खूप लहान आहे,दोन वर्षांची आहे फक्त. नीट बोलताही येत नाही तिला,किती निरागस आहे माझ पिल्लु!आणि तूम्ही माञ तिला काहीही बोलत असतात. ठीक आहे तुम्हाला मला टोमणे मारायचे असतात,तर मग मला direct बोलतं जा सं मिनूवरून कशाला बोलायलि हवं.प्रत्येकवेळी वाद नको घालायला म्हणून मी दूर्लश करते पण तुमचं आपल वाढतच चाललय.तुमच्या अशा बोलण्याचा मिनुवर काय परिणाम होत असेल? ती आत्ता लहान आहे पण मोठी झाल्यावर.....आणि राहीला खर्चाचा प्रश्न तर आज आम्ही सहा महिन्यांनी शहर सोडून बाहेर चाललो आहे,तेही फक्त एक दिवस.....फिरायला चाललेलो दिसतोय तुम्हाला आणि घरात रोज काम केललं नाही दिसत तुम्हाला? पाळीच्या चार दिवसात सुध्दा कोणी म्हणत नाही 'राहूदे तु विश्रांती घे'. जाॅब सोडला कोणासाठी घरासाठीचं ना?                                                                              

    मी तुम्हाला प्रतित्तर देत नाही कारण माझ्या आई-वडिलांनी खूप चांगले संस्कार केले आहेत माझ्यावर...ईथूनपुढे तुम्ही तुमचे टोमणे मारणे बंद करा आणि तो वेळ मिनु ला खेळवण्यात घालवत जा.तिला जेवू घालत जा,एवढी मिनू दोन वर्षांची झाली तरी एक घास तरी कधी भरवला का? तिचं रडण दिसत फक्त! ती खेळत असेल तर खेळवता , रडायला लागली की  माझ्याकडे देणार,मी हातातलं काम टाकून तिला घ्यायच आणि मग तिला शांत करून काम करायच. बस्स झाल खुप झाल ! माझी मुलगी रडली-पडली तर तीला पहायला मी समर्थ आहे. तुम्ही तुमच बघा.....आजपासून एक टाईमचा स्वयंपाक मी करेन एक टाईम तुम्ही करा नाहीतरी मैञिणींबर गप्पा मारायला,बिशी पार्टी करायला वेळ असतो तुम्हाला."

हे सगळ ऐकून सासूबाई मनातून चांगल्याच खजील होऊन मान खाली घालतात. तोपर्यंत बाहेर मानव गाडीचा हाॅर्न वाजवतो.समीधा मिनूला घेऊन घराबाहेर पडते......समाप्त!

©माधुरी दिपक पाटील

असेच छान छान ब्लाॅग्ज वाचण्यासाठी माझ्या 

रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की लाईक करा

Post a comment

0 Comments