कोणावर गेलेय काय माहित...भाग१


सकाळची वेळ समीधा आपली लवकर उठून काम आवरत असते कारण तिला माहीत होत एकदा का तिची मुलगी ऊठली की तिला काही करू देणार नव्हती...घरातली बाकी मंडळीही हळूहळू उठून स्वत:च आवरत होते.

तेव्हड्यात मिनू(तिची मुलगी) उठून रडायला लागली.झोपेतून उठल की पहिल तिला मम्मी हवी असायची.मिनू दोन वर्षांची होती तशी खूप गुणी बाळ होती,बोललेल सर्व समजायच तिला फक्त बोलता येत नव्हत.आणखी एक म्हणजे मम्मी पप्पांनच्या बाबतीत no compramise पाहिजे म्हणजे पाहिजे.

"पिल्लू आले "म्हणून समीधा हातातल काम सोडून मिनू कडे पळत गेली.तोपर्यंत मिनू बाळाचा पारा चढलेला कारण झोपेतून उठल की पुढच्या क्षणी तिला मम्मी हवी असायची....डोळ्यातून धारा,रडून नाक गळायला सुरू झालेल,गाल लाल झालेले मिनू मॅडमचे.....समीधा तिची कशीतरी समजूत घालत तिला कडेवर घेऊन इकडे-तिकडे फिरवत असते....तोर्पंत इकडे घरातले सदस्य मिनूच्या रडण्याने तोंड टाकायचे,"सकाळी-सकाळी काय रडत असते ही ! बाकी शेजारी-पाजारी मूल नाहीत का?ती कशी हसत ऊठतात,कशी मम्मी ला सोडून खेळतात......" समीधाच्या जाईल अस बोलायचे.एकीकडे मिनूचा दंगा आणि एकीकडे घरातले सर्वजण.समीधा निमूटपणे ऐकून घ्यायची सगळ्यांच(कारण उलट ऊत्तर देणे तिच्या संस्कारात बसत नव्हत)  हे सगळ रोजचच झालेल समीधाला.                                                                 एव्हाना मिनू शांत झालेली असायची.मग समीधा तिला खाऊ चारून सासूबाईंनकडे द्यायची आणि परत घरकामाला लागायची.झाल आणि थोड्यावेळाने खेळून मिनूला भूक लागली की परत तीच रडण सुरू होई.शेवटी लहान मूलच ते रडणार ,पडणार ,खाणार ,पिणार आणि परत खेळणार पण सासूबाईंना कोण समजवणार?त्या लगेच तोंड चालू करत "कोणावर गेलेय ही काय माहीत,आमची पोर एवढी लहानाची मोठी केली पण कोणी एवढा ञास नाही दिला....आपल्या घरात तर कोण नाही असं मग ही कोणावर गेलेय काय माहीत"सासूबाईंच्या बोलण्याचा कल समीधाच्या माहेरच्यांनकडे असायचा.....

समीधाला सासूच हे बोलण सहन कराव लागायच कारण मानव घरातल्या गोष्टींमधे लक्ष घालत नसायचा. समीधा ही सासूबाईंकडे दूर्लश करण्याचा प्रयत्न करायची.त्यांच ते नेहमीचचं असायच"मिनू व्यवस्थित वागली की सासरच्या लोकांवर गेलेय आणि ती रडली ,हट्ट केला की माहेरच्या लोकांची सावली पडलेय" अस म्हणून समीधाला टोमणे द्यायचे.. शेवटी समीधाही एक माणूसच होती,रोजच्या टोमण्यांना कंटाळलेली,स्वाभिमानी  आणि सुशिक्षीत होती ती.केवळ आज ना उद्या सासूबाईंत सुधारणा होईल म्हणून शांत होती पण त्यांच अस वागण वाढतच चाललं होत.

..चला तर मग बघूया समीधा कशाप्रकारे सासूबाईंना प्रतिउत्तर देतेय?आणि तिच्या उत्तराने सासूबाई कशा सुधारतायेत की समीधाला जास्तच ञास देतायेत?पुढील भागात.पण पुढील भाग लिहण्यासाठी like share आणि comment करून मला तूमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.....धन्यवाद!

Post a comment

0 Comments