असेही_असतात_सासरे....भाग ३


मानसी विचारातच होती तोवर सुधीर आणि रमाताई हाॅॅस्पीटलमधून घरी येतात. प्रतापराव टि.व्ही. लावून बसलेच होते राजकारणाच्या बातम्या पाहत.
खरतर रमाताईंना त्यांनीच न्यायला हवे होते डाॅक्टरांकडे पण ते कधीच बायकोला घेऊन कुठे जात नव्हते. असही नव्हत की त्यांच वय झालय किंवा थकल्यात...चांगले ठणठणीत होते. पण तरीही का तर बायकोला बरोबर फिरवल्यावर लोक नावे ठेवतात. बायकोच ऐकतोय, बायकोवर याचा जराही धाक नाही अस म्हणतात.......बघा कसा बायकोला घेऊन फिरतोय, बायकोचा बैल वैगेरे असे एक ना अनेक नाहक, वायफळ प्रश्न त्यांच्या मनात असायचे समाजाला घेऊन.

असो पण रमाताई तरी कुठे त्यांच्या विश्वासावर बसत; त्यांनाही सवय  झाली होती या सगळ्याची. शिवाय सुधीर सारखा प्रेमळ मुलगा होता त्यांच्याजवळ...जो नेहमीच आईच मन राखत होता...

रमाताई आणि सुधीर आल्यावर मानसी त्यांना पाणी देते. शारदाताई आणि संगिताताई येऊन गेल्याच सांगते...तेव्हा रमाताई बोलतात अग मग थांबल्या का नाहीत त्या निदान आम्ही येईपर्यंत तरी. त्यावर मानसी आण्णांकडे एक कटाक्ष टाकते व काहीच न बोलता चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते...रमाताईं काय समजायच ते समजून जातात....

मानसी व रमाताई स्वयंपाक आवरतात व सगळे लगेच जेऊन घेतात कारण दुसर्‍यादिवशी सोमवार म्हणजे सुधीरच आॅफिस....लवकर झोपून लवकर ऊठल म्हणजे लवकर आवरत सगळ अस मानसीच  मत....तिच्यामते आठवड्याची सुरूवात म्हणजे सोमवार चांंगली व्हायला हवी नाहीतर मग पूर्ण आठवडा तसाच जातो....घाई-गडबडीत.....महत्त्वाच म्हणजे घरातली कामे जेवढी लवकर आवरतील तेवढा स्वतसाठी जास्त टाईम मिळतो.

जेवण आटोपल्यावर मानसी आणि रमाताई टेरेसवर जातात जरा शतपावली करण्यासाठी. तेव्हा मानसी विचारते आण्णा असे का वागतात माहेरी आलेल्या स्वतच्या मुलींशीही?
त्यावर रमाताई स्मित हास्य करत "अग आण्णा पहिल्यापासूनच प्रतिष्ठेचे पुजारी.....मुली या परक्याच धन अस त्यांच मत...लग्न झाल की दिल्या घरी तू सुखी रहा अशी त्यांची विचारसरणी...त्यामुळे मुलींनी तिच्या सासरी सगळ्यांच ऐकाव, सर्वांंची सेवा करावी असे त्यांचे संस्कार."

"अहो पण आई....निदान माहेरी आल्यावर तरी त्यांना रहा म्हणाव, त्यांच्याशी बोलाव, विचारपुस करावी ना? नंतर त्यांच्या सासरी आहेच की त्यांच सासरपण" मानसी

"हो...पण त्यांंना मुलींच्या सासरीदेखील मोठेपणा मिरवायचा असतो की बघा माझ्या मुली किती संस्कारी आहेत...त्या तुमच्या(सासरच्या) शब्दाबाहेर जात नाहीत...माझे संस्कारच आहेत तसे...मुलींना वरचेवर त्यांच एकच सांगण असत की सासु-सासर्‍यांची काळजी घ्या....पण कधीही अस विचारत नाहीत की मुलींनो तुम्ही कशा आहात? सासरचे लोक चांगलेच आहेत ग त्या दोघींच्याही...पण आण्णांच्या अशा वागण्याने सासरच्या लोकांनाही हे समजल आहे की यांच्या मुलींना आपण ऊद्या काही बोललो तरी त्यांना माहेरच सपोर्ट करणार कोण नाही..."

"म्हणजे आण्णांनी स्वतच्याच मुलींच्या स्वातंंञ्याची चावी स्वतच त्यांच्या सासरच्यांकडे दिली आहे तर....अवघडच आहे..." मानसी

"तेच तर....ते लोकही मग ऊगीच आण्णा खरचं तुमचे संस्कार भारी अस म्हणून आण्णांना झाडावर चढवतात आणि आण्णाही चढतात पण कोंडी होते ती माझ्या मुलींची.." रमाताईंचे डोळे पाण्याने गच्च भरतात..

मानसी "आई...तुम्ही कशाला वाईट वाटून घेत आहात...एक ना एक दिवस आण्णांना कळेल त्यांची चूक."

"अग चूक कळायला....अगोदर त्यांंना ती चूक आहे की नाही हे तरी समजायला हव ना?"

"हे माञ आहे...खरचं आई तुम्ही कस सहन केल आयुष्यभरर माहीत नाही..."

"काय करणार होते मी....आई-वडीलांची परिस्थिती गरीब. कसतरी माझ लग्न करून दिल. तेव्हाच्या परिस्थितीने माझच स्थळ चांगल म्हणायच त्यामूळे कोणीच जास्त विचार केला नाही....पण लग्न झाल्यावर हळुहळू त्यांचा स्वभाव समजत गेला....मानसी तु खूप भाग्यवान आहेस सुधीर सारखा शांत नवरा भेटला तुला....असो चल ऊशीर झाला आहे खुप ऊद्या लवकर ऊठायचय ना...चल खाली जावूयात." रमाताईंनाही जरा मन मोकळ झाल्यासारख वाटत मानसीशी बोलून....आणि मानसीलाही आण्णा स्वतच्याच मुलींशी अस का बोलतायेत हे समजत.

"हो आई" म्हणून दोघी खाली जातात....तोच आण्णा कोणाशी तर फोनवर मोठ्याने बोलत असतात आणि बोलत-बोलतच "काय? अस कसं होऊ शकत?" म्हणतच ते खाली कोसळतात फोन हातातून पडतो...मानसी आणि रमाताई तर भेदरूनच जातात. त्यांना काहीच नाही समजत....मानसीला तु हळू चाल कारण मानसी प्रेग्नेंट... म्हणून रमाताई पळत जातात प्रतापरावांजवळ.....

प्रिय वाचकहो चला तर मग पाहुया पुढच्या भागात एवढे धीरगंभीर, धाडसी असणारे आण्णा असे अचानक खाली का कोसळतात? कोणाचा फोन होता? आणि या सगळ्याचा मानसीवर काय परीणाम होतो?

पुढचा आणि अगोदरचा भाग वाचण्यासाठी https://www.facebook.com/hernewinning/ या फेसबुक पेजला लाईक करा.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 

"रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!

Post a comment

0 Comments