सासुबाई "मानसी तु नाश्ता कर तोपर्यंत मी करंजी करण्यासाठी पीठ मळते....आज स्वयंपाक लवकर आवरूया म्हणजे करंजी करायला येतील."
मानसी "अहो आई पण आता काही दिवस आहेत का करंजी करायचे...ऊन्हाळा किती वाढला आहे....आणि नाश्ता बनवलाय...जेवणही बनवायच आहे मग हा करंजीचा आटापिटा कशासाठी?"
"ते काही नाही करंज्या तर बनवाव्याच लागतील...मी पीठही मळल आहे नि सारण करायच साहित्यही काढल आहे..."
"अहो पण ऊन्हाळ्यात एवढावेळ किचनमध्ये थांबणे, मला सहन नाही होत...."
"मानसी अस म्हणून कस चालेल? घरात पोरठोर आहेत...दुपारची भूक लागते त्यांना..."
मानसी घरातील मोठी सून....बाकी घरात तिचा नवरा राघव, दोन दीर, सासु नि सासरे एवढे सददस्य. ऊन्हाळा सुट्टीच्या निमित्ताने एकञ आलेले....मानसीच्या दोन्ही दिरांची लग्न अजून व्हायची होती....त्यामुळे अर्थातच घरात मानसीवर कामाचा ताण पडे.....
सासुबाईंनी मुलांना सगळ हातात आयत द्यायची सवय लावलेली...त्यांच एकच म्हणन मुल बाहेर जाॅब करतात, त्यांना बाहेरच खाव लागत...मग घरी आल्यावर त्यांना वेगवेगळे पदार्थ नको का करून घालायला...पण मानसी आणि राघवचही नवीनच लग्न झालेल...मानसी शरीराने खुपच नाजूक होती.....अस नाही कि तिला काम होत नव्हत पण कामाचा ताणही सहन व्हायचा नाही.....तिच म्हणन असायच की जेवढ्यास तेवढ आणि प्रमाणातच काम कराव....ऊगीच स्वत:ला ञास करून घेऊन आजारी पडू नये....
माञ सासुबाईंच याऊलट असे. त्यांच म्हणन असायच की सगळ जिथल्या तिथे असाव...घर कस आरश्यासारख लख्ख ठेवाव.....आणि त्यांच्या मुलांना कोणत्याही बाबतीत काहीही कमी पडू नये...बाया-माणसांच कामच आहे घरातली काम करणे मग दिवसभर करायला लागल तरी ते कराव.....रोजची रोज फरशी पुसावी, फर्निचर पुसून काढाव, वरचेवर डबे-भरण्या घासाव्या, ऊशीचे कव्हर, खिडकीचे पडदे, बेडसीट्स चार दिवसाला धुवून टाकावे.....येणार्या-जाणार्याचा पाहुणचार करावा. रोजचे रोज भांड्याचे कपाट पुसावे, आठवड्याला त्यावरील पेपर बदलावे. मानसीची पाळी येवून गेली की घरातील सर्व कपडे धुवून काढावी...मग ती कपडे जुनी असो वा नवी...एकुणएक कपडा महिन्याला धुवायला काढायचा.
मानसी तर अक्षरश: वैतागायची या अति आणि बिनाकामाच्या स्वच्छतेला....थकून जायची. एकदा तर मानसी खुप आजारी पडली. तिच हिमोग्लोबीन खुप कमी झालेल. डाॅक्टरांनी तिला रक्त चढवल....डायटचार्टच बनवून दिला.....या सगळ्याला कारण म्हणजे सासुबाई. दिवसभर ना त्या स्वत: शांत बसायच्या ना मानसीला शांत बसू द्यायच्या....त्यामुळे एवढी काम केल्यावर भुक लागून जावून नंतर मानसीची काही खाण्याची ईच्छाच रहायची नाही. मग कसतरी दोन घास पोटात घालायची..
..हे सगळ कशामुळे झालय ते राघवच्याही लक्षात आल त्यालाही मानसीची ही हालत बघवली नाही....पण आईपुढे तो तरी काय बोलणार....मानसीलाही राघवची घुसमट समजत होती. त्यामुळे मानसी ठरवते की आईंची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी अस नाही.....हळुहळू मानसी स्वत:साठी वेळ देवू लागली. सासुबाईंनी सांगितलेली महत्त्वाची काम ती पटकन करून रिकामी व्हायची.....पण महत्त्वाची नसणारी आणि विनाकारण वारंवार करावी लागणारी कामे ती टाळायची....कारण स्वत:च्या तब्येतीची काळजी स्वत:च घ्यावी लागणार होती....
घरातील बेडसीट्स, ऊशीचे कव्हर धुवून-धुवून अक्षरश: फाटायचेच बाकी होते. स्टीलच्या भांड्यांचीही तीच अवस्था....त्यावर घासून-घासून स्र्क्यच पडले होते....हळुहळू मानसी या सगळ्या गोष्टी सासुबाईंच्या ध्यानात आणून देते....तेव्हा त्यांना आपली चूक समजते व ऊमगते की प्रत्येकच गोष्ट रोच करून त्याचा अतिरेक करायला नको आहे.
सांगायच तात्पर्य म्हणजे बर्याच गृहिणींना ही सवय असते की विनाकारण घरातली काम काढायची नी स्वत:चे हाल करून घ्यायचे.....त्यापेक्षा कोणती कामे महत्त्वाची आहेत, कोणती कामे रोज करण्यासारखी नाहीत, त्यानुसार कामाचे विभाजन करून कामे आटपल्यास सोप पडेल....व राहिलेला वेळ स्वतसाठी देता येईल.
©माधुरी सोनवलकर (माधुरी दिपक पाटील)
फोटो_साभार_
अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या
रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा....धन्यवाद!
0 Comments